Video: …आणि बघता बघता तो वाहून गेला! यवतमाळमधील अंगावर काटा आणणारी घटना कॅमेऱ्यात कैद, पाहा नेमकं काय घडलं?
Yavatmal Youth Drowned : किनारी उभा असलेला एक मित्र मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड करत होता.
पावसाळ्याच्या दिवसात नदीत, तलावात किंवा धबधब्यावर पोहण्याचा आनंद घेण्यासाठी पाण्यात उतरणाऱ्यांनी खबरदारी बाळगणं गरजेचं आहे. पण कधी कधी पोहण्याचा आत्मविश्वास असूनही नको ते धाडस जीवावर बेतू शकतं, हे अधोरेखित करणारी घटना नुकतीच नाशिक जिल्ह्यामधून समोर आली होती. एका तरुणाचा स्टटंबाजी करताना व्हिडीओ (Nashik Stunt Video) समोर आला होता. त्या स्टंटबाजी पाण्यात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह चार दिवसांनी अखेर हाती लागला. ही घटना ताजी असतानाच आता यवतमाळमधून (Yavatmal News) धक्कादायक प्रकार समोर आला आह. एका तरुणाचा पाण्यात पोहोताना व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओमध्ये तरुण पाण्यात पोहताना दिसतो. पण त्यानंतर बघता बघता तो पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून जातो आणि पाण्यातच दिसेनाला होता. सोबतच्या लोकांना त्याला वाचवण्यासाठी संधीही मिळत नाही. लोक त्याला वाचवण्यासाठी धडपड करतात. पण तोपर्यंत वेळ निघून जाते आणि तरुण पाहण्यात वाहून जातो.
ही धक्कादायक घटना यवतमाळच्या बेंबळा धरण इथं घडली आहे. सचिद बडोद (Sachin Badod youth drowned) या तरुणाचा पाण्यात वाहून जातानाचा हा व्हिडीओ असून आता हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामुळे पोहण्यासाठी पाण्यात उतरण्याचं धाडस करणाऱ्यांनी शंभरवेळा विचार करण्याची गरज यानिमित्तानं व्यक्त केली जातेय.
प्रवाह वाढला, सचिन वाहून गेला..
यवतमाळच्या बेंबळा धरण प्रकल्पात सचिन पोहण्यासाठी उतरला. त्यासोबत त्याचे इतर मित्रही धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरले होते. सचिन आधी खोलवर डुबकी लगावत होता. व्हिडीओमध्ये तो पाण्याच्या मध्यभागी असल्याचं दिसून येतं. पावसाचा आनंद लुटण्यासाठी पाण्यात उतरलेल्या सचिनला पुढे आपण वाहून जाऊ, अशी कोणतीही शक्यता वाटत नव्हती. पण नेमकं तेच घडलं.
घटना कॅमेऱ्यात कैद
मित्रांचा पोहतानाचा व्हिडीओ किनारी उभा असलेला एक मित्र मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत होता. नेमक्या याच व्हिडीओ सचिन वाहून जाताना कॅमेऱ्यात कैद झाला. या घटनेनं सगळ्यांना धक्का बसला. तर पोहण्याचा आनंद घेण्यासाठी आलेले मित्रही धास्तावले. सचिन वाहून जाण्याआधी एक मित्र नुकताच पाण्यातून बाहेर आलेला असतो. तो कठड्यावरुन सचिनला बाहेर काढण्यासाठी धडपडत असल्याचंही दिसतं. पण तोपर्यंत पाण्याचा प्रवाह वाढतो. सचिनला पाण्याच्या वाढत्या प्रवाहाचा अंदाज येत नाही. तो प्रवाहासोबत खेचला जातो आणि बघता बघता पाण्यात गायब होऊन वाहून जातो.
पाहा व्हिडीओ :
#Watch : खतरनाक! तुम्हाला एकवेळ पोहता येतही असेल, पण काळ त्याहीपेक्षा वाईट असतो, पाण्याचा प्रवाह कधी आत खेचून घेऊन जाईल, हे सांगण कठीण.. त्यामुळे नको तिथे अतिउत्साह टाळलेलाच बरा, यवमाळचा हा #Video अंगावर काटा आणणार #Drown #Yavatmal #ViralVideo pic.twitter.com/r774IOwTkS
— Siddhesh Sawant (@ssidsawant) July 17, 2022
दरम्यान, चार दिवसांपूर्वी एका तरुणाची पुलावरुन नदीच्या प्रचंड प्रवाही पाण्याती उडी मारण्याची स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद झाली होती. पाण्यात हा तरुण वाहून गेला आणि त्याचाही मृत्यू झाला. चार दिवसांनी या तरुणाचा मृतदेह हाती लागला होता. मालेगावात ही घटना घडली होती.
त्यानंतर आता यवतमाळमधील हा धक्कादायक व्हिडीओ अंगावर काटा आणणारा आहे. या दोन्ही घटनांनी धरणाच्या, तलाव्याच्या किंवा प्रवाही नदीच्या पाण्यात पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी उतरणं जीवघेणं ठरु शकतं, हे अधोरेखित केलंय.