अल्पवयीन तरुणीचा विनयभंग, युवासेनेच्या कार्यकर्त्याला नागरिकांचा चोप

यवतमाळ शहरात एका अल्पवयीन तरुणीशी लगट करण्याचा प्रयत्न करुन, विनयभंग करणाऱ्या युवासेनेच्या (Yavatmals Yuvasena worker molestation) कार्यकर्त्याला चोप देण्यात आला.

अल्पवयीन तरुणीचा विनयभंग, युवासेनेच्या कार्यकर्त्याला नागरिकांचा चोप
Follow us
| Updated on: Dec 25, 2019 | 4:13 PM

यवतमाळ : यवतमाळ शहरात एका अल्पवयीन तरुणीशी लगट करण्याचा प्रयत्न करुन, विनयभंग करणाऱ्या युवासेनेच्या (Yavatmals Yuvasena worker molestation) कार्यकर्त्याला चोप देण्यात आला. यवतमाळच्या आयुर्वेदिक कॉलेज चौकात ही घटना घडली. नेर तालुक्यातील उत्तरवाढोना इथे राहणाऱ्या युवासेनेच्या या कार्यकर्त्यावर विनयभंगाचा आरोप आहे. या कार्यकर्त्याने त्याच्याच गावात राहणाऱ्या एका 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. तो गेली 2 महिन्यांपासून या तरुणीचा पाठलाग करत होता. (Yavatmals Yuvasena worker molestation)

वारंवार फोन करुन भेटण्यासाठी तिला आग्रह करत होता. काल पीडित तरुणी आपल्या महाविद्यालयातून पेपर देऊन गावाकडे जात असताना,  त्याने तिला फोन करून भेटायचे आहे अशी बतावणी केली. त्या तरुणीला आयुर्वेदिक कॉलेज चौकात बोलावले आणि त्या परिसरातील एका ठिकाणी आपल्या चारचाकी गाडीत बसून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला.

याप्रकाराने तरुणीने आरडाओरड करताच नारीशक्ती समितीच्या कार्यकर्त्यांनी त्याठिकाणी धाव घेतली. शिवाय उपस्थित जमावाने आरोपी युवासेनेच्या कार्यकर्त्याला पकडून चोप दिला. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

संबंधित तरुणीची सुटका  करुन आरोपीला पोलिसाच्या स्वाधीन केले. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.