‘कोरोना’लढ्यासाठी सुट्ट्या सोडल्या, सेवानिवृत्तीच्या अखरेच्या क्षणापर्यंत ऑन ड्युटी, यवतमाळच्या पोलिसाला सॅल्युट
35 वर्षांची सेवा बजावल्यानंतर सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अशोक कांबळे यवतमाळच्या लोहारा पोलिस ठाण्यातून निवृत्त झाले (Yawatmal Police on duty till retirement for fight against Corona)
यवतमाळ : ‘कोरोना’ विषाणूचा पराभव करण्यासाठी पोलिस प्रशासन 24 तास रस्त्यावर उभे राहून आपले कर्तव्य बजावत आहे. ‘कोरोना’च्या संकट काळात हे कर्मचारी तहान-भूक कशाचीही तमा बाळगताना दिसत नाही. यातच सेवानिवृत्तीच्या अखरेच्या क्षणापर्यंत पोलिस कर्मचाऱ्याने रस्त्यावर उभे राहून आपले कर्तव्य बजावले. (Yawatmal Police on duty till retirement for fight against Corona)
सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अशोक कांबळे लोहारा पोलिस ठाण्यात कार्यरत होते. पोलिस दलात आयुष्यातील 35 वर्षांची सेवा बजावली. सेवानिवृत्तीच्या आधी तीन महिने रजा मंजूर असतानाही त्यांनी आपल्या कर्तव्याला प्राधान्य दिले.
पोलिस खाते अतिशय शिस्तीचे आहे. सण, उत्सव, सभा, निवडणूक कोणताही कार्यक्रम असला की, पोलिस कर्मचाऱ्यांना आपल्या सुट्ट्यांवर पाणी सोडावे लागते. घरात कुणी आजारी असलं, तरी रुग्णालयात नेण्यास कसरत करावी लागते. कुटुंबासोबत सण-उत्सवही साजरा करु न शकणाऱ्या पोलिसांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन मात्र उपेक्षित आहे.
हेही वाचा : Corona : कोरोना कसा पसरतो? अमोल कोल्हेंनी कोरोनाचा गुणाकार समजावून सांगितला
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदीसह जिल्हा लॉकडाऊन करण्यात आला आहे. एकही नागरिक रस्त्यावर येऊ नये, त्यांनी आपल्या घरात सुरक्षित रहावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून केले जात आहे. आपला देश या संकटातून बाहेर निघावा, यासाठी धडपड सुरु आहे. (Yawatmal Police on duty till retirement for fight against Corona)
सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अशोक कांबळे आपल्या घरी स्वस्थ बसू शकले नाहीत. 35 वर्षांच्या सेवेतील अखेरच्या दिवशी संध्याकाळी ठीक सहा वाजेपर्यंत त्यांनी कर्तव्य बजावले.
वरिष्ठ जिल्हा पोलिस अधीक्षक एम राजकुमार, ठाणेदार सचिन लुले पाटील, सहायक पोलिस निरीक्षक सुजाता बनसोड आणि अशोक कांबळे असे सहकारी कांबळे कर्तव्य बजावत होते, तिथे गेले. सहकाऱ्यांनी गोडधोड खाऊ घातलं, तेव्हा कांबळे यांनाही जड अंत:करणाने सहकाऱ्यांचा निरोप घ्यावा लागला.
Corona | मुंबईत 16 नवे कोरोनाग्रस्त, पुण्यातही बेरीज सुरुच, महाराष्ट्रातील आकडा 320 वर https://t.co/GQWtGs3roZ #CoronaInMaharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 1, 2020
(Yawatmal Police on duty till retirement for fight against Corona)