महाराष्ट्रात यलो अलर्ट; पुणे, सातारा, सांगली, रत्नागिरी आणि… दसऱ्याला धो धो पाऊस पडणार
कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर दसऱ्या दिवशी धो धो पाऊस पडणार आहे.
मुंबई : राज्याच्या हवामान विभागाने (Weather Report) वर्तवलेल्या अंदाजानुसार, आजपासून पुढचे चार दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या अनुषंगाने महाराष्ट्रात यलो अलर्ट(Yellow alert) जारी करण्यात आला आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर दसऱ्या दिवशी धो धो पाऊस पडणार आहे.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. पुढील चार ते पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. मुसळधार पावसाच्या अनुषंगाने प्रशासनाने लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार कोकणातील रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग, पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, पुणे आणि कोल्हापूर आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांत आज मुसळधार पावसाची शक्यता आहे .
4 ऑक्टोबर रोजी नांदेड, परभणी, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर 5 ऑक्टोबर रोजी परभणी, नांदेडसह विदर्भासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
काय आहे मुंबईची स्थिती
मुंबईत आठवडाभर सातत्याने पावसाची रिपरिप सुरुच आहे. मध्ये मध्ये पाऊस विश्रांती घेत असल्याने हवेतील आर्द्रता वाढून उकाडा जाणवत आहे.
मुंबईत पुढील आठवड्यात 5 ऑक्टोबरपर्यंत कमाल तापमान 32 ते 33 अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. मुंबईतही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.