Kalyan News: मुलगा 8 वाजता घरातून बाहेर पडला आणि सव्वा दहाला पोलिसांचा फोन आला; रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे कल्याणमध्ये घडली भयानक घटना
अंकित आपल्या आई-वडिलांसह अंबरनाथ येथे राहतो. घणसोली येथील हेल्थ केअर फार्मा कंपनी कामाला होता. तो दररोज आपल्या दुचाकीने अंबरनाथ ते घणसोली असा प्रवास करत कामावर जात होता. आज सकाळी आठ वाजता तो नेहमी प्रमाणे आपल्या दुचाकीने कामासाठी घराबाहेर पडला. यानंतर सुमारे सव्वा दहाच्या सुमारास मनपाडा पोलिसांचा फोन आला आणि त्यांनी अंकितचा अपघाच झाल्याची माहिती त्याच्या कुटुंबियांना दिली.
कल्याण : रस्त्यावरील खड्डे(Pothole) ही गंभीर समस्या बनली आहे. मात्र आता हेच खड्डे जीव घेणे ठरवू लागले आहेत. कल्याण(Kalyan) मध्ये एक विचित्र अपघात(accident) घडला आहे. यात एका 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. मृत तरुणाची दुचाकी खड्ड्यात अडकल्यानंतर तो खाली पडला. यानंतर पाठीमागून येणाऱ्या KDMC बसने त्याला धडक दिल्याने हा अपघात घडला आहे. या धडकेत या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी केडीएमसीच्या बस चालकावर मनपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अंकित राजकुमार थैवा असे मृत तरुणाचे नाव आहे. तो अंबरनाथ येथील आनंद नगर परिसरात राहणारा आहे. त्याचे वडील राजकुमार थैवा यांनी या अपघात प्रकरणी अंकित याच्या दुचाकीला धडक देणारा केडीएमसी बसच्या चालकाविरोधात तक्रार दाखल केली आहे.
अंकित आपल्या आई-वडिलांसह अंबरनाथ येथे राहतो. घणसोली येथील हेल्थ केअर फार्मा कंपनी कामाला होता. तो दररोज आपल्या दुचाकीने अंबरनाथ ते घणसोली असा प्रवास करत कामावर जात होता. आज सकाळी आठ वाजता तो नेहमी प्रमाणे आपल्या दुचाकीने कामासाठी घराबाहेर पडला. यानंतर सुमारे सव्वा दहाच्या सुमारास मनपाडा पोलिसांचा फोन आला आणि त्यांनी अंकितचा अपघाच झाल्याची माहिती त्याच्या कुटुंबियांना दिली.
अंकितच्या कुटूंबियांनी तात्काळ पोलिस ठाण्यात धाव घेतली. अंकित हा बदलापुर रोडने काटई सर्कलकडे जाणा-या कल्याण रोडवर खोणी म्हाडा वसाहत येथे आला असता त्याच्या दुचाकीला अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
रस्त्याच्या मधोमध खड्डा असल्याने अंकितचा तोल जाऊन तो खाली पडला. यावेळी पाठीमागून येणाऱ्या KDMC बसने त्याला धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी होऊन अंकितचा जागीच मृत्यू झाला. KDMC बस चालकच अपघाताला जबाबदार असल्याची तक्रार मृत तरुणाच्या कुटुंबियांनी केली आहे. बेजबाबदारपणे वाहन चालविल्याचा आरोप मृत तरुणाच्या कुटुंबियांनी केला आहे.