वांद्र्यातून वरुण सरदेसाईंची उमेदवारी जाहीर होताच झिशान सिद्दीकींचा घणाघात, म्हणाले “यांच्या रक्तात…”

वांद्रे पूर्व मतदारसंघातून वरुण सरदेसाई यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आता यावर काँग्रेसच्या झिशान सिद्दीकींनी प्रतिक्रिया दिली आहे.

वांद्र्यातून वरुण सरदेसाईंची उमेदवारी जाहीर होताच झिशान सिद्दीकींचा घणाघात, म्हणाले यांच्या रक्तात...
झिशान सिद्दिकीImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Oct 24, 2024 | 3:39 PM

Zeeshan Siddique On Varun sardesai : महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकांची धामधूम पाहायला मिळत आहे. सर्वच पक्षांकडून उमेदवारी यादीची घोषणा करण्यात आली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने महाराष्ट्र विधानसभेसाठी 65 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात वरळी विधानसभेतून आदित्य ठाकरे, कोपरी – पाचपाखडी मतदारसंघातून केदार दिघे, ठाणे मतदारसंघात माजी खासदार राजन विचारे यांसह अनेक दिग्गजांना संधी देण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंनी जाहीर केलेल्या यादीत अनेक नव्या आणि जुन्या चेहऱ्यांना संधी देण्यात आळी आहे. पण या यादीत एका उमेदवाराच्या नावाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. वांद्रे पूर्व मतदारसंघातून वरुण सरदेसाई यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आता यावर काँग्रेसच्या झिशान सिद्दीकींनी प्रतिक्रिया दिली आहे.

वांद्रे पूर्व मतदारसंघ शिवेसनेचा बालेकिल्ला

उद्धव ठाकरेंचे मातोश्री निवासस्थान असलेल्या वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून वरुण सरदेसाई यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वरुण सरदेसाई यांना उद्धव ठाकरेंनी एबी फॉर्मही दिला आहे. वांद्रे पूर्व हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघावर सुरुवातीपासून शिवसेनेची पकड आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान याच मतदारसंघात आहे. २०१९ च्या निवडणुकीत हा मतदारसंघ शिवसेनेच्या हातून निसटल्याने काँग्रेसच्या ताब्यात गेला होता. सध्या या मतदारसंघात काँग्रेसचे झिशान सिद्दीकी हे विद्यमान आमदार आहेत.

झिशान सिद्दीकी काय म्हणाले?

गेल्या काही दिवसांपासून झिशान सिद्दीकी हे महायुतीतील अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यातच आता वरुण सरदेसाई यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे झिशान सिद्दीकी यांनी ट्वीटरवर एक ट्वीट केले आहे. “जुन्या मित्रांनी वांद्रे पूर्व मतदारसंघात त्यांचा उमेदवार जाहीर केला आहे. एखाद्याची साथ देणं हे यांच्या रक्तातच नाही. त्यामुळे नातं त्याच्यासोबतच ठेवा जो आदर आणि सन्मान देईल. फक्त फायद्यांसाठी जमलेल्या गर्दीचा काहीच फायदा नाही. आता जनता निर्णय घेईल!” असे झिशान सिद्दीकी यांनी म्हटले.

दरम्यान झिशान सिद्दीकी हे वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. सध्या ते महायुतीच्या वाटेवर असल्याचे बोललं जात आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या वडिलांची म्हणजेच माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यात आली होती. या दुःखातून सावरत झिशान सिद्दिकी हे निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. पण मविआकडून त्यांचं तिकीट कापण्यात य़आले आहे. त्यामुळे आता झिशान सिद्दिकी अजित पवार गटातून निवडणूक लढवतात का, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.