नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशातील रोजगार निर्मितीची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. जुलै-सप्टेंबरच्या तिमाहित प्रमुख 9 क्षेत्रांत एकूण 3.10 कोटी रोजगार निर्माण झाले. हे प्रमाण मागील तिमाही एप्रिल-जूनच्या तुलनेत 2 लाखांहून अधिक आहे. श्रम मंत्रालयाने याबाबत माहिती दिली. रोजगार निर्मितीतील संख्या वाढ जुलै-सप्टेंबर तिमाहीतील आर्थिक व्यवहारातील सुधारणेचे निर्देशक असल्याचे मंत्रालयाच्या सूत्रांनी म्हटले आहे. एप्रिल आणि मे महिना कोविडचा दुसऱ्या लाटेमुळे प्रभावित झाला होता. सार्वजनिक वावरावर मोठ्या प्रमाणात निर्बंध होते आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय प्रवासावर निर्बंध होते.
उत्पादन, बांधकाम, व्यापार, ट्रान्सपोर्ट, शिक्षण, आरोग्य, हॉटेल आणि रेस्टॉरंट, आयटी-बीपीओ आणि वित्तीय सेवा, बिगर शेतकी क्षेत्र या 9 क्षेत्रांच्या संबंधित रोजगाराचे आकडे समाविष्ट आहेत. श्रम मंत्रालयाने नुकताच अहवाल सार्वजनिक केला आहे. पहिला अहवाल एप्रिल-जूनच्या तिमाहित जारी करण्यात आला होता. या अहवालात दहा आणि त्याहून अधिक कामगार क्षमतेच्या आस्थापनांचा समावेश करण्यात आला आहे.
ऑक्टोबर-सप्टेंबर तिमाहीसाठी रोजगार संबंधी विभिन्न आकडेवारी समोर आली आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये कर्मचारी भविष्य निधि संघटनेत (EPFO) 12.73 लाख सदस्य समाविष्ट झाले आहेत. ऑक्टोबर 2020 च्या तुलनेत हे प्रमाण 10.22 टक्क्यांहून अधिक आहे. श्रम मंत्रालयाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.
कर्मचारी भविष्य निधीत 7.57 लाख नवे सदस्य समाविष्ट झाले आहेत. श्रम मंत्रालयाच्या माहितीनुसार, वेतनाच्या आकडेवारीच्या विश्लेषणानुसार नवीन नोंदणीत समाविष्ट सदस्यांत 22-25 वर्षातील सदस्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे.
ऑक्टोबर 2021 मध्ये 22-25 वर्षातील 3.37 लाख सदस्य तसेच 18-21 वयोगटातील 2.50 लाख सदस्य नोंदणीकृत झाले. महाराष्ट्र, हरियाणा, गुजरात, तमिळनाडू आणि कर्नाटक राज्यातील 7.72 लाख नव्या सदस्यांचा यामध्ये समावेश आहे. नवीन सदस्यांच्या 60.64 टक्के आहेत. स्त्री-पुरुषांच्या निकषावर विचार केल्यास ऑक्टोबर 2021 मध्ये नवीन नोंदणीकृत खातेधारकांत 2.69 लाख संख्येसह 21.14 टक्के महिला आहेत.
Post office | पोस्टाच्या ‘या’ बचत योजनेत दर महिन्याला कमाईची संधी
HDFC व्यवहाराच्या माहितीसाठी आता प्रति SMS 20 पैसे मोजा, Insta Alert Services च्या नियमांमध्ये बदल