स्वस्तात घर खरेदीची ‘अशी’ संधी पुन्हा नाही, PNB करणार देशभरात ताब्यातील घर आणि मालमत्तांचा लिलाव
पंजाब नॅशनल बँकेने देशभरात त्यांच्या ताब्यातील काही मालमत्ता आणि घरांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन राबविली जाणार आहे. या योजनेत तुमचे नशीब फळफळले तर स्वस्तात तुम्हाला घर मिळू शकते. येत्या 31 जानेवारी रोजी तुम्ही या मालमत्ता आणि घरांसाठी ऑनलाईन बोली लावू शकता.
PNB E-Auction : नवीन वर्षात स्वस्तात घर खरेदी करण्याची आयती संधी चालून आली आहे. पंजाब नॅशनल बँकेने देशभरात त्यांच्या ताब्यातील काही मालमत्ता आणि घरांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन राबविली जाणार आहे. या योजनेत तुमचे नशीब फळफळले तर स्वस्तात तुम्हाला घर मिळू शकते. देशाची सरकारी बँक तुम्हाला स्वस्त घर खरेदी करण्याची विशेष ऑफर घेऊन आली आहे. खरे तर पंजाब नॅशनल बँक देशभरात मेगा ई-ऑक्शन (PNB E-Auction) आयोजित करणार आहे. या माध्यमातून तुम्ही 31 जानेवारी 2022 रोजी बोली लावू शकता. पंजाब नॅशनल बँक ज्या मालमत्तेचा लिलाव करणार आहे. त्यात निवासी आणि व्यावसायिक मालमत्तांचा समावेश आहे. या लिलावात जादा बोली लावणा-या व्यक्तीला संबंधित मालमत्तेचा आणि घरांचा ताबा देण्यात येईल. मात्र हा लिलाव असल्याने या ठिकाणी स्वस्तात घर मिळण्याची नामी संधी ग्राहकाला मिळू शकते. विशेष बँकेने दिलेल्या https://ibapi.in या लिंकद्वारे तुम्ही ऑनलाईन या प्रक्रियेत सहभागी होऊ शकता. देशातील कोणत्याही व्यक्तीला या प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.
पीएनबीने केले ट्विट
पंजाब नॅशनल बँकेने या ई-ऑक्शन विषयी ट्विट केले आहे. ट्विटमध्ये लिहिले आहे की, ही देशातील नागरिकांसाठी ही सुवर्णसंधी आहे. ३१ जानेवारी २०२२ रोजी होणाऱ्या या मेगा ई-लिलावामध्ये देशातील नागरिक स्वप्नातील मालमत्ता (निवासी/व्यावसायिक) खरेदी करु शकतो. इच्छुक ग्राहक ३१ जानेवारी रोजी पीएनबी मेगा ई-लिलावात भाग घेऊ शकतात. त्याला निवासी आणि व्यावसायिक मालमत्तेसाठी बोली लावता येऊ शकते. या संपूर्ण लिलाव प्रक्रियेची अधिक माहिती बँकेच्या अधिकृत लिंकवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या लिंक https://ibapi.in ला भेट देऊन तुम्ही पुढील प्रक्रियेची माहिती घेऊ शकता.
वेळोवेळी बँक लिलाव
ई-लिलावात डिफॉल्ट लिस्टमध्ये आलेल्या मालमत्तांची विक्री केल्या जाते, ही प्रक्रिया वेळोवेळी बँक करते. म्हणजे ज्या मालमत्ताधारकांनी वेळेत कर्ज फेडले नाही किंवा कोणत्याही कारणास्तव पैसे देऊ शकले नाहीत अशा सर्व मालमत्ताधारकांची जमीन, मालमत्ता, घर बँकांकडून ताब्यात घेतली जाते आणि मग अशा मालमत्तेचा बँकाकडून वेळोवेळी लिलाव केला जातो. या लिलावात बँक मालमत्ता विकून आपली थकबाकी वसूल करते.
येथे केली जाणार नोंदणी
पंजाब नॅशनल बँकेच्या मेगा ई-लिलावात बोली लावणाऱ्यांना https://ibapi.in/ या ई-सेलर पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. नोंदणीसाठी तुम्हाला पोर्टलवर जाऊन निविदाकार नोंदणीचा पर्याय निवडावा लागेल, तसेच मोबाइल नंबर आणि ईमेल आयडीद्वारे नोंदणी करावी लागेल. ही प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला ई-ऑक्शनमध्ये सहभागी होता येईल.
लॉगिन कसे करू शकते?
जर तुम्ही आधीच ई-सेलर पोर्टल वर https://ibapi.in/ नोंदणी केली असेल, तर तुम्हाला पुन्हा नोंदणी करावी लागणार नाही, फक्त या लिंकवर क्लिक https://www.mstcecommerce.comauctionhome/ibapi/index.jsp करून आपण ईमेल आयडी, पासवर्ड आणि कॅप्चा भरून लॉग-इन करू शकता.निविदा भरण्यासाठी आलेल्या अथवा या लिलावात सहभागी लोकांना त्यांची केवायसी कागदपत्रे (KYC Documents) द्यावी लागतील. ओळख पटविण्यासाठी ही प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे.