गृह कर्ज घेताना ITR का आहे महत्वाचा ? जाणून घ्या

बँकेत कर्जासाठी अर्ज केला असता मागील 3 वर्षाचा ITR मागितला जातो. त्यानंतरच कर्ज देण्याच्या प्रक्रियेस सुरुवात होते . असे का ? हे जाणून घ्या .

गृह कर्ज घेताना ITR का आहे महत्वाचा ? जाणून घ्या
Follow us
| Updated on: Jan 11, 2023 | 6:30 PM

टेक्स्टाइल कंपनीमध्ये जॉब करणाऱ्या पवन देशमुखांनी पुणे येथे एक जमीन खरेदी केली. याजमिनीवर घर बांधण्यासाठी त्यांच्याकडे अनेक कागदपत्रे मागितली. यामध्ये गेल्या तीन वर्षातील आयकर रिटर्न फाइलचा देखील समावेश आहे. पवनकडे इतर सर्व कागदपत्र आहेत परंतु त्यांनी आजतागायत ITR भरला नाहीये. गृहकर्ज देण्याआधी बँका ITR का मागतात ? ITR न भरता कर्ज कसे मिळेल ? चला या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.

गृहकर्ज हे 10 ते 20 वर्ष अशा दीर्घ कालावधीसाठी असते. ज्या व्यक्ती कर्जाची परतफेड करु शकतात अशा व्यक्तींनाच बँक कर्ज देतात. म्हणजेच ज्या व्यक्तीचे उत्पन्न जास्त आहे त्या व्यक्तीलाच कर्ज मिळते.

ITR हा तुमच्या वार्षिक उत्पन्नाचा लेखाजोगा असतो. हा ITR सर्व सरकारी आणि खासगी कंपन्यांमध्ये एक पुरावा म्हणून स्वीकारला जातो. त्यामुळे मागील 3 वर्षाचा ITR मागितला जातो. जर तुम्ही नियमित ITR भरत असाल तर कर्ज मिळणे सोपे जाते. परंतु जर ITR भरत नसाल तर कर्ज मिळण्यात अडथळे येऊ शकतात.

जर तुमचे उत्पन्न पगाराच्या स्वरूपात नियमित असेल तर दर वर्षी ITR भरावा. जर ITR भरला नसेल तर आपल्या कंपनीतून तसे प्रमाणपत्र घ्यावे. यासोबत पासबुक घेऊन जावे.

जर तुमचे पासबुक अपडेट असेल आणि पुरेशी रक्कम असेल तर बँक तुम्हाला कर्ज देऊ शकते. अशा वेळी तुम्ही कोणत्या कंपनीत काम करता हे देखील महत्वाचे असते.

मोठ्या कर्जासाठी ITR फाइल मागतात. पण पवन आपल्या जमिनीवर घर बांधण्यासाठी कर्ज घेत आहेत. हे कर्ज सुरक्षित कर्ज म्हणून गणले जाते.जर त्यांनी जमिनीच्या किंमतीपेक्षा कमी रकमेचे कर्ज घेत असाल तर तुमचे कर्ज मंजूर होईल.

जर जास्त रकमेचे कर्ज घेत असाल तर बँकेकडे सोने, FD , जीवन विमा या वस्तु किंवा कागदपत्रे तारण म्हणून ठेवाव्या लागतात. या आधारे बँक ITR शिवाय कर्ज मंजूर करू शकते.

कर्ज देताना कर्जाची परतफेड व्यवस्थित व्हावी यासाठी पडताळणी केली जाते. जर तुमच्याकडे ITR नसेल तर जो नियमित ITR भरत आहे अशा सह-अर्जदारचा समावेश करावा. सह-अर्जदाराचे उत्पन्न समाविष्ट झाल्यास तुमचे कर्ज सहज मंजूर होऊ शकते.

देशातील सर्व मोठ्या बँका कर्ज देताना आपल्या नियमांशी तडजोड करत नाहीत. हाऊसिंग फायनान्स, आणि नॉन बँकिंग फायनॅन्शियल कंपनी म्हणजे NBFC या कमी उत्पन्न आणि ITR भरत नसलेल्या व्यक्तीलादेखील कर्ज देतात.

जे ITR भरत नाहीत त्यांनी NBFC मधून कर्ज घेण्यासाठी प्रयत्न करावे. या कंपन्या सोप्या नियम आणि अटींवर कर्ज देतात. परंतु हे कर्ज बँकेच्या तुलनेत महाग असू शकते.

या व्यतिरिक्त जर एखाद्या बँकेत जुने खाते असेल तर तेथील बँक मॅनेजरला भेटावे. ग्राहकाच्या चांगल्या वर्तवणुकीवर देखील कर्ज मिळू शकते. NBFC च्या तुलनेत हे कर्ज स्वस्त असते.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....