Money9: Zomato च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण

देशातील महत्वपूर्ण फूड डिलीव्हरी कंपनीपैकी एक असलेल्या झोमॅटोच्या शेअर्समध्ये सोमवारी मोठी घसरण झाल्याचे दिसून आले. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज अर्थात BSE वर हा शेअर घसरून 46 रुपयांच्या नीचांकी पातळीवर बंद झाला.

Money9: Zomato च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण
झोमॅटोचे शेअर्स घसरले Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jul 26, 2022 | 3:03 PM

झोमॅटो (Zomato) ही देशातील महत्वपूर्ण फूड डिलीव्हरी कंपनीपैकी एक आहे. मात्र कंपनीच्या शेअर्समध्ये सोमवारी मोठी घसरण झाल्याचे दिसून आले. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज अर्थात BSE (Bombay Stock Exchange)वर झोमॅटोच्या शेअर 46 रुपयांच्या आतापर्यंतच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून झोमॅटोच्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण दिसून येत होती. मात्र सोमवारी शेअर्सचा लॉक-इन कालावधी संपताच त्यात मोठी घसरण होऊन बाजार बंद होताना झोमॅटोचा शेअर सर्वात नीचांकावर पोहोचला. एका वर्षापूर्वी शेअर बाजारात (Share market) 65 टक्के प्रीमिअमवर शेअरचे लिस्टिंग झाले होते. आणि नोव्हेंबर 2021 मध्ये झोमॅटोच्या शेअर्सची किंमत 169 रुपयांच्या आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर पोहोचली होती.

रेकॉर्ड करणाऱ्या उच्चांकी पातळीनंतर 73 टक्क्यांची घसरण

मात्र त्यानंतर झोमॅटोचे दिवस फिरले आणि शेअर्सची सातत्याने घसरण होऊ लागली. सध्याच्या परिस्थितीनुसार, झोमॅटोचे शेअर्स उच्चांकावरून 73 टक्के खाली घसरले आहेत. सोमवारी झोमॅटोच्या शेअरचा भाव 46 रुपये होता, जो आजपर्यंतचा सर्वात कमी दर आहे. विशेष म्हणजे, सोमवारीच झोमॅटोचे प्रमोटर, कर्मचारी आणि गुंतवणूकदारांसाठी, शेअर्समधील लॉक-इन कालावधी संपला. आणि शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली. लॉक-इन कालावधी ठराविक गुंतवणूकदारांसाठी असतो. तो संपल्यानंतर गुंतवणूकदार त्यांचे शेअर्स विकू शकतात. मात्र लॉक-इन कालावधी सुरू असताना ते शेअर विकू शकत नाहीत. अशा स्थितीत जर त्यांनी शेअर्स विकायला सुरूवात केली, तर शेअर्सच्या किमतीत मोठी घसरण होऊ शकते. गेल्या तीन महिन्यांपासून झोमॅटोच्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण होताना दिसत आहे.

झोमॅटोबद्दल आणखी माहिती जाणून घ्यायची असेल तर मनी 9 ॲप्लीकेशन या लिंकद्वारे डाऊनलोड करू शकता –

https://onelink.to/gjbxhu. या मुद्यावर तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर Money9 ॲप डाऊनलोड करा आणि मनीसेंट्रल कार्यक्रम जरूर पहा. तेथे तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल.

हे सुद्धा वाचा

काय आहे Money9?

Money9 चे OTT ॲप आता गूगल प्ले आणि IOS वर उपलब्ध आहे. या ॲपमध्ये सात भाषा असून अर्थ व्यवहारासंबंधी सर्व माहिती मिळू शकते. शेअर बाजार, म्युच्युअल फंड, प्रॉपर्टी टॅक्स, अर्थविषयक सर्व माहिती, ज्याचा तुमच्या बजेटवर परिणाम होऊ शकेल, अशा सर्व गोष्टी येथे जाणून घेता येतील. त्यामुळे बिलकुल वेळ न घालवता मनी9 ॲप डाऊनलोड करा आणि तुमची अर्थ विषयक समज वाढवा.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....