2 लाख विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा, परीक्षेला बसू न शकणाऱ्यांना पुन्हा संधी देऊ: मुंबई विद्यापीठ
मागील दोन दिवसांत एकूण 2 लाख विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या परीक्षा दिल्याचे विद्यापीठाने सांगितले आहे. तसेच परीक्षेला बसू न शकलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देता येईल. (Mumbai University exams)
मुंबई : ऑनलाईन परीक्षा घेताना ऐनवळी उडालेल्या गोंधळामुळे मुंबई विद्यापीठ चर्चेत आले होते. याच गोंधळाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (8 ऑक्टोबर) झालेल्या ऑनलाईन परीक्षा अत्यंत सुरळीत पार पडल्याचा दावा मुंबई विद्यापीठ प्रशासनाने केला आहे. मागील दोन दिवसांत एकूण 2 लाख विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या परीक्षा दिल्याचे विद्यापीठाने सांगितले. तसेच काही विद्यार्थी काही तांत्रिक अडचणींमुळे परीक्षा देऊ शकले नसतील तर, त्यांनाही पुन्हा परीक्षा देण्याची संधी दिली जाईल, असे विद्यापीठाने सांगितले आहे. (2 lakh students affiliated to Mumbai University appeared for the exam said Mumbai University Administration)
कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्या एकूण 78 हजार 99 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या परीक्षांना एकूण 78 हजार 907 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. तसेच विधी शाखेच्या एकूण 1 हजार 600 तर अभियांत्रिकी शाखेच्या 24 हजार 103 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. काही कारणास्तव काही विद्यार्थी गैरहजर होते. त्यांना पुन्हा परीक्षा देता येईल.
मागील दोन दिवसांत दोन लाख विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा मागील दोन दिवसांत मुंबई विद्यापीठाशी संलग्नीत विद्यालयांच्या एकूण 2 लाख 9 हजार 429 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तसेच बुधवारी अंतिम सत्राच्या झालेल्या कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्या परीक्षांसाठी 1 लाख 1 हजार 530 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या परीक्षांसाठी एकूण 1 लाख 3 हजार 21 विद्यार्थींनी अर्ज भरले होते. त्यापैकी दोन हजार विद्यार्थी परिक्षेला बसू शकले नाहीत.
परीक्षा न देऊ शकणाऱ्यांना पुन्हा संधी मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेच्या दिवशी 9 हजार विद्यार्थ्यांची परीक्षा होती. मात्र, ऐनवेळी परीक्षेच्या दिवशी जवळपास अडीच ते 3 लाख लोकांनी परीक्षेच्या सर्व्हरला भेट दिली होती, अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली होती. त्यामुळे काही तांत्रिक कारणामुळे एखादा विद्यार्थी परीक्षेला बसू शकला नसेल, तर अशा विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पुन्हा संधी दिली जाणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.
संबंंधित बातम्या :
मुंबई विद्यापीठ सायबर क्राईममध्ये तक्रार करणार : प्रदीप सावंत
मुंबई विद्यापीठाच्या रद्द झालेल्या परीक्षांची तारीख जाहीर, परीक्षा मंडळाकडून घोषणा
(2 lakh students affiliated to Mumbai University appeared for the exam said Mumbai University Administration)