धारावीसाठी बीएमसीचा अॅक्शन प्लॅन, 350 खासगी दवाखाने सोमवारपासून सुरु होणार
मुंबईतील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारवीसाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नवी योजना तयार करण्यात आली (clinic open in dharavi for normal and corona suspect patient) आहे.
मुंबई : मुंबईतील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारवीसाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नवी योजना तयार करण्यात आली (clinic open in dharavi for normal and corona suspect patient) आहे. खासदार राहुल शेवाळे यांच्या पुढाकाराने आणि खासगी डॉक्टरांच्या साहाय्याने, धारावीतील 350 खासगी दवाखाने सोमवारपासून (27 एप्रिल) सुरू करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या दवाखान्यांमध्ये नॉन कोविड उपचारांसोबतच, कोरोना संशयितांचीही प्राथमिक चाचणी करण्यात येणार (clinic open in dharavi for normal and corona suspect patient) आहे.
धारावीतील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत, धारावीतील खासगी दवाखाने सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तावाला ‘इंडियन मेडिकल कौन्सिल’ आणि ‘माहीम-धारावी मेडिकल प्रॅक्टीश्नर असोसिएशन’ यांच्या पदाधिकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
खासगी दवाखान्यात आलेल्या नॉन-कोविड नागरिकांवर उपचार केले जातील. तसेच, संशयित रुग्णांना कोरोनाची लक्षणे, कोरोनाची विनामूल्य चाचणी, त्यावरील विनामुल्य उपचार, कोरोनाबाधितांच्या कुटुंबियांना पालिकेकडून देण्यात येणाऱ्या मोफत सुविधा यांबाबतची माहितीही खासगी डॉक्टरांच्या माध्यमातून रुग्णांना दिली जाणार आहे.
संशयित रुग्णांचा तपशील पालिका प्रशासनाला कळवून पुढील कारवाई केली जाणार आहे. या खासगी डॉक्टरांना पीपीई किट, सॅनिटायझर आणि दवाखान्याचे सॅनिटायझेशन या सुविधा महानगरपालिकेकडून पुरविण्यात येणार आहेत. याआधीच धारावीतील सुमारे 50 हजार नागरिकांची घरोघरी जाऊन स्क्रिनिंग केल्याबद्दल मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांच्या हस्ते या डॉक्टरांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.
संबंधित बातम्या :
मुंबईतील धोका वाढला, आधी कोळीवाडा, मग धारावी, आता पवई झोपडपट्टीत ‘कोरोना’ रुग्ण
मुंबई मनपाचं मिशन धारावी, प्रत्येक नागरिकाची कोरोना चाचणी करणार, तब्बल साडेसात लाख लोकांच्या चाचण्या