‘नॉटी’ पुरुषांची घाण समाजातून ‘फ्लश’ करु, पुरुष दिन आणि टॉयलेट डेनिमित्त अमृता फडणवीसांच्या भन्नाट शुभेच्छा

अमृता फडणवीस राजकारणापासून अलिप्त असल्या तरी राज्यातील आणि देशातील वेगवेगळ्या मुद्यांवर त्या भूमिका मांडतात. | Amruta Fadnavis

'नॉटी' पुरुषांची घाण समाजातून 'फ्लश' करु, पुरुष दिन आणि टॉयलेट डेनिमित्त अमृता फडणवीसांच्या भन्नाट शुभेच्छा
Follow us
| Updated on: Nov 19, 2020 | 3:12 PM

मुंबई: राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना डिवचले आहे. अमृता फडणवीस यांनी गुरुवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून #InternationalMensDay2020 आणि #WorldToiletDay2020 निमित्त एक मेसेज केला. यामध्ये अमृता फडणवीस यांनी संजय राऊतांना त्यांच्याच एका आक्षेपार्ह वक्तव्यावरुन अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले. (Amruta Fadnavis takes a dig at Sanjay Raut)

आज आंतरराष्ट्रीय पुरूष दिवस आहे आणि जागतिक शौचालय दिनही आहे. यानिमित्ताने मी देशातील सर्व राष्ट्रभक्त पुरुषांना एक सर्वसामान्य स्त्री म्हणून आवाहन करते की, आपण सगळ्यांनी एकत्र येऊन वाईट विचारांच्या काही मोजक्या ‘नॉटी’ पुरूषांच्या आचार विचारांची घाण फ्लश करून महाराष्ट्र स्वच्छ करण्यासाठी मदत करावी, असे अमृता फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा रोख संजय राऊत यांच्या दिशेने असल्याची चर्चा आहे.

काय आहे नेमका वाद? शिवसेना नेते संजय राऊत यांनी मध्यंतरी अभिनेत्री कंगना रानौत हिच्यावर टीका केली होती. त्यावेळी संजय राऊत यांनी कंगनाला ‘हरामखोर’, असे संबोधले होते. यावरुन बराच गदारोळ झाल्यानंतर संजय राऊत यांनी सारवासारव केली होती. मला कंगनाला Naughty Girl नॉटी गर्ल म्हणायचे होते, असे संजय राऊत यांनी म्हटले होते.

संबंधित बातम्या:

VIDEO : तिला जगू द्या… अमृता फडणवीसांचं नवं गाणं रिलीज

Special Report | शिवसेनेचा उल्लेख ‘शवसेना’ करून अमृता फडणवीसांनी पुन्हा शिवसेनेला डिवचलं

अल्प बुद्धी दिसतेच आहे, अमृता फडणवीसांच्या ट्वीटला शिवसेनेच्या महिला आमदाराचा टोला

(Amruta Fadnavis takes a dig at Sanjay Raut)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.