Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वीज बिलाच्या मुद्द्यावरुन मनसे आक्रमक, 26 नोव्हेंबरला राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा

वांद्रे इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयावरही मनसेकडून 26 नोव्हेंबरला मोर्चा काढण्यात येणार आहे. यात मनसेचे नेते आणि कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य नागरिकही सहभागी होणार असल्याची माहिती नांदगावकर यांनी दिली आहे. ज्यांना वीज बिलाचा शॉक बसला आहे, अशा सर्व नागरिकांनी या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन मनसेकडून करण्यात आलं आहे.

वीज बिलाच्या मुद्द्यावरुन मनसे आक्रमक, 26 नोव्हेंबरला राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा
Follow us
| Updated on: Nov 22, 2020 | 3:21 PM

मुंबई: वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावर मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. 26 नोव्हेंबरला राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मनसे मोर्चा काढणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. वीज दरात सवलत देण्याचं आश्वासन राज्य सरकारनं दिलं होतं. पण ते पाळलं गेलं नाही. त्यामुळे जनतेच्या प्रश्नासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागत असल्याचं बाळा नांदगावकर म्हणाले. (MNS’s statewide agitation on November 26 on electricity bill issue)

वांद्रे इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयावरही मनसेकडून 26 नोव्हेंबरला मोर्चा काढण्यात येणार आहे. यात मनसेचे नेते आणि कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य नागरिकही सहभागी होणार असल्याची माहिती नांदगावकर यांनी दिली आहे. ज्यांना वीज बिलाचा शॉक बसला आहे, अशा सर्व नागरिकांनी या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन मनसेकडून करण्यात आलं आहे. मनसेचे राज्यभरातील मोर्चे अत्यंत शांतपणे काढले जातील असं नांदगावकर यांनी आवर्जुन सांगितलं. ‘राज्य सरकारनं वीज दरवाढीत सवलत देण्याचं आश्वासन दिलं होतं. ते पाळलं नाही. आता पुन्हा एकदा 100 युनिटपर्यंत सूट देण्याचं आश्वासन ऊर्जामंत्री देत आहेत. या सरकारमध्ये सगळा सावळा गोंधळ सुरु आहे,’ अशी टीका नांदगावकर यांनी यावेळी केली.

‘माझे लाईट बिल, माझी जबाबदारी’

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही वाढीव वीजबिल माफीचा निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे मनसे आक्रमक झाली आहे. सोमवारनंतर वीज दरवाढी विरोधात आंदोलन करण्याचा निर्धारच मनसेने केला असून दरवाढी विरोधात संपूर्ण दादर-माहीम परिसरात होर्डिंगबाजी केली आहे. ‘माझे कुटुंब,माझी जबाबदारी’ या राज्य सरकारच्या घोषणेलाच टार्गेट करत ‘माझे लाईट बिल, माझी जबाबदारी’, ‘सोमवारी भेटूच शॉकसाठी तयार राहा’, अशी खोचक वाक्यं या होर्डिंगजवर लिहिण्यात आली आहेत. त्यामुळे या होर्डिंग्ज सध्या चर्चेच्या विषय ठरल्या आहेत.

मनसेचे विभाग प्रमुख यशवंत किल्लेदार यांनी हे होर्डिंग लावले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याचे प्रमुख आहे. ते राज्याचे कुटुंबप्रमुख आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचा विचार करणं ही त्यांची जबाबदारी आहे. आम्ही त्यांना केवळ त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देत आहोत, त्यामुळेच ही होर्डिंगबाजी करण्यात आली आहे, असं किल्लेदार यांनी सांगितलं.

‘100 युनिटपर्यंत वीजबिल माफीच्या प्रस्तावावर विचार सुरु’

“काही दिवसांपूर्वी मी 100 युनिटपर्यंत वीज माफी करावी असं मला वाटतं, असं मी म्हटलं होतं. त्यासाठी अभ्यासगटाची समिती स्थापन करण्यात आली. मधल्या काळात कोरोना आल्याने या अभ्यासगटाच्या बैठका झाल्या नाहीत. त्यामुळे समितीचा अहवाल आला नाही”, अशी माहिती उर्जामंत्र्यांनी 21 नोव्हेंबरला दिली आहे.  “आताची महावितरणची आर्थिक स्थिती पाहता 59 हजार कोटींची तफावत आली आहे. मागच्या सरकारनं जे पाप करून ठेवलं आहे. त्याचं निरसन करूनच 100 युनिट वीज माफीचा निर्णय घेण्यात येणार आहे. पण जनतेला 100 युनिट वीज माफी देण्यावर मी ठाम आहे. ही वीज मी माफ केल्याचं तुम्हीही पाहाल,” असं आश्वासनही राऊत यांनी दिलं आहे.

संबंधित बातम्या:

नितीन राऊतांनी राजीनामा देऊन महावितरणमध्ये क्लार्कचं काम करावं!, भाजपाचा हल्लाबोल

‘माझे लाईट बिल, माझी जबाबदारी’, सोमवारी ‘शॉक’साठी तयार राहा; मनसेची माहीम, दादरमध्ये खोचक होर्डिंगबाजी

MNS’s statewide agitation on November 26 on electricity bill issue

नाही मातीत घातला तर मग बोला', दादांचा सज्जड दम देत कोणाला घेतलं फैलावर
नाही मातीत घातला तर मग बोला', दादांचा सज्जड दम देत कोणाला घेतलं फैलावर.
कबुतरांना दाणे टाकताय, मोह आवरा;नाहीतर पडणार महागात, BMCचा निर्णय काय?
कबुतरांना दाणे टाकताय, मोह आवरा;नाहीतर पडणार महागात, BMCचा निर्णय काय?.
जे वाटतं पटतं ते करतो, मी अंधभक्त नाही; उद्धव ठाकरेंनी डागलं टीकास्त्र
जे वाटतं पटतं ते करतो, मी अंधभक्त नाही; उद्धव ठाकरेंनी डागलं टीकास्त्र.
अवकाळीनं राज्याला झोडपलं, बळीराजा हवालदिल; कोणत्या जिल्ह्यांना तडाखा?
अवकाळीनं राज्याला झोडपलं, बळीराजा हवालदिल; कोणत्या जिल्ह्यांना तडाखा?.
हिंदूत्व सोडल का? जिनांनाही लाजवेल अशी भाजपची भाषणं, ठाकरेंचा हल्लाबोल
हिंदूत्व सोडल का? जिनांनाही लाजवेल अशी भाजपची भाषणं, ठाकरेंचा हल्लाबोल.
'यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहे', उद्धव ठाकरेंची टीका
'यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहे', उद्धव ठाकरेंची टीका.
'ढेकर देऊन वक्फ बोर्डाचं बिल मांडलं आणि...', उद्धव ठाकरेंचा निशाणा
'ढेकर देऊन वक्फ बोर्डाचं बिल मांडलं आणि...', उद्धव ठाकरेंचा निशाणा.
त्यांना माना डोलवण्याचा आजार झालाय; शिंदेंच्या विधानावर राऊतांचा टोला
त्यांना माना डोलवण्याचा आजार झालाय; शिंदेंच्या विधानावर राऊतांचा टोला.
पतीसह तिघांकडून मारहाण, विवाहितेचं मुंडन अन् भुवयांवर फिरवला ट्रीमर
पतीसह तिघांकडून मारहाण, विवाहितेचं मुंडन अन् भुवयांवर फिरवला ट्रीमर.
सतीश सालियान यांचा पोलिसांना दिलेला जबाब समोर, 'ती' महिला कोण?
सतीश सालियान यांचा पोलिसांना दिलेला जबाब समोर, 'ती' महिला कोण?.