राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना गुरुवारी मोठा दिलासा, महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांची tv9 ला माहिती

राज्यात अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानाची पाहणी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेत्यांसह अनेक नेत्यांनी केली. पण राज्य सरकारकडून अद्याप कुठल्याही मदतीची घोषणा करण्यात आलेली नाही. त्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होऊन गुरुवारी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना गुरुवारी मोठा दिलासा, महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांची tv9 ला माहिती
Follow us
| Updated on: Oct 20, 2020 | 12:02 PM

मुंबई: ‘अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री सोमवारी सोलापूर दौऱ्यावर होते. उद्या ते उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या नुकसानाचा आढावा घेणार आहेत. हा दौरा झाल्यानंतर गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीत याविषयावर चर्चा करुन शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला जाईल’, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी tv9 मराठीला दिली आहे. मुख्यमंत्री सोलापूरच्या पाहणी दौऱ्यावर असताना बाळासाहेब थोरातही त्यांच्यासोबत होते. (Balasaheb thorat on help for heavy rain affected farmers)

राज्यात परतीच्या पावसामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. अशावेळी केंद्र सरकारनंही राज्याला मदत दिली पाहीजे, असं मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं आहे. केंद्र सरकारकडे महाराष्ट्राचे 30 हजार कोटी रुपये बाकी आहेत. ते केंद्रानं राज्याला द्यावे, अशी मागणीही थोरातांनी केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कर्ज काढून शेतकऱ्यांना मदत करा अशी मागणी केली आहे. त्यावर बोलताना शेतकऱ्यांना कर्ज काढून मदत करायची की अजून कशी ते आम्ही पाहू, असं थोरात म्हणालेत.

जलयुक्त शिवारची चौकशी विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी नाही- थोरात

देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात राज्यभरात जलयुक्त शिवार योजना मोठ्या दिमाखात राबवण्यात आली. या योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारकडून करण्यात येत आहे. त्यावर बोलताना फडणवीस यांनी जलयुक्त शिवारची चौकशी ही विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे. फडणवीसांचे हे आरोप फेटाळून लावताना, ही चौकशी विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी नसल्याचं म्हटलंय. लेखा परीक्षण विभाग अर्थात कॅगने जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार झाल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे ही चौकशी करण्यात येत असल्याचं थोरात म्हणाले.

माझं तोंड बंद करता येईल, हा सरकारचा गैरसमज- फडणवीस

जलयुक्त शिवार योजनेची चौकशी लावून विरोधी पक्षनेत्याचे तोंड बंद करता येईल, असे सरकारला वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे. मी जनतेचा सेवक आहे. जलयुक्त शिवारमुळे शेतकऱ्यांना कसा फायदा झाला, हे लवकरच सर्वांना दाखवून देईन, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी उस्मानाबादेतील पत्रकार परिषदेत केला आहे. जलयुक्त शिवार योजनेतंर्गत एकूण सहा लाख कामे झाली. यापैकी मोजक्या कामांबद्दलच तक्रारी आल्या. सरकारी योजनेतील तक्रारींचा टक्का पाहता हे प्रमाण खूपच कमी असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

फडणवीसांकडून ‘लाव रे तो व्हिडीओ’!, जुने दाखले देत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न

नुकसान भरपाईचा निर्णय घाईघाईत घेणार नाही; पंचनामे झाल्यानंतरच मदत मिळेल- मुख्यमंत्री

Balasaheb thorat on help for heavy rain affected farmers

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.