BARC Fake TRP Racket | टीआरपी घोटाळा, रिपब्लिक चॅनेलच्या वरिष्ठ पत्रकाराची चौकशी
टीआरपी घोटाळा प्रकरणात आज रिपब्लिक चॅनेलचे कार्यकारी संपादक निरंजन नारायण यांना आज चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.
मुंबई : टीआरपी घोटाळा प्रकरणात आज रिपब्लिक चॅनेलचे कार्यकारी संपादक निरंजन नारायण (BARC Fake TRP Racket) यांना आज चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. चौकशीसाठी निरंजन आज सकाळी 12 वाजता हजर झाले. त्यानंतर त्यांची चौकशी सुरु झाली (BARC Fake TRP Racket).
10 ऑक्टोबर रोजी रिपब्लिक चॅनेलवर एक कार्यक्रम दाखवला होता. या कार्यक्रमात काही कागदपत्र दाखवण्यात आले होते. ही कागदपत्र हंसा कंपनीची असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, ही कागदपत्र हंसा कंपनीची नाहीत. खोटी कागदपत्र दाखवून टीआरपीबाबत चुकीची माहिती दाखवल्याबाबत ही चौकशी होत आहे.
तर रिपब्लिक चॅनेलचं वरिष्ठ संपादक अभिषेक कपूर यांना ही चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. हे आज चार वाजता चौकशीसाठी हजर होतील. त्याच प्रमाणे आज बीएआरसी आणि हंसा चॅनेलच्या काही अधिकाऱ्यांची चौकशी होणार आहे.
टीआरपी म्हणजे काय?
टीआरपीचा अर्थ टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट (Television Rating Point ) असा होतो. यावरुन प्रेक्षक कोणते टेलिव्हिजन चॅनेल जास्त पाहतात, हे ठरवले जाते. टेलिव्हिजन विश्वात कोणती मालिका किंवा वृत्तवाहिन्यांवरील कोणता शो सर्वात जास्त लोकप्रिय आहे, याचे मोजमापही टीआरपीच्या आधारेच केले जाते. सध्याच्या स्पर्धेच्या युगात जाहिराती मिळवण्यासाठी टीआरपी रेटिंग अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
‘त्या’ चोरांना आता महाराष्ट्राने सोडू नये; टीआरपी घोटाळ्यावर शिवसेना आक्रमकhttps://t.co/un3kbJIfRj#shivsena #sanjayraut #TRPFraud #TRPScam @rautsanjay61 @ShivSena
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 11, 2020
BARC Fake TRP Racket
संबंधित बातम्या :
‘असत्यमेव जयते’, टीआरपी घोटाळ्यावरुन संजय राऊत यांचा रिपब्लिक टीव्हीवर हल्लाबोल