श्वास घेण्यास त्रास झाल्याने कँटिनमध्येच कंडक्टरचा मृत्यू; मुंबईतल्या बेस्टच्या मरोळ आगारातील घटना
सुदाम जयसिंग माने असं या 38 वर्षीय बेस्ट कंडक्टरचं नाव आहे. ते बस कंडक्टर म्हणून मरोळ आगारात कार्यरत होते
मुंबई : मरोळ येथील कँटिनमध्ये जेवण करण्यासाठी गेले असताना अचानक श्वास घेण्यास (BEST Conductor Death) त्रास झाल्याने बेस्टच्या एका कंडक्टरचा मृत्यू झाला आहे. सुदाम जयसिंग माने असं या 38 वर्षीय बेस्ट कंडक्टरचं नाव आहे. ते बस कंडक्टर म्हणून मरोळ आगारात कार्यरत होते (BEST Conductor Death).
सुदाम जयसिंग माने हे मरोळ आगारात 12.30 वाजता कँटिनमध्ये ऑफ ड्यूटी आले होते. कँटिनमध्ये त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांनी कँटिनवाल्याला सांगितले. कँटिनवाल्याने तिथल्या सिक्युरिटी गार्डला कळविले. सिक्युरिटी गार्डने येऊन पाहिले तेव्हा माने यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे त्यांनी ताबडतोब वरिष्ठ वाहतूक अधिकारी यांना कळविले.
वरिष्ठ वाहतूक अधिकाऱ्यांनी मरोळ यांना कँटिनमध्ये येऊन पाहिले असता सुदाम माने बेशुद्ध असल्याचे आढळले. त्यांनी तात्काळ 108 नंबरला फोन करुन कळवले. ॲम्ब्यूलन्स डेपोत येईपर्यंत सुदाम माने यांचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी सुदाम मोरे यांना मृत घोषित केले. परंतु, त्यांचा मृतदेह रुग्णालयात घेवून जावे लागेल, असेही डॉक्टरांनी सांगितले.
त्याप्रमाणे, सुदाम माने यांचा मृतदेह कूपर रुग्णालयात नेण्यात आला. शवविच्छेदनासाठी त्यांचा मृतदेह कूपर रुग्णालयात ठेवला आहे. मुंबईत ते एकटेच रहात असल्यामुळे सातारा येथे त्यांचे भाऊ दिपक माने यांना कळवण्यात आले आहे.
सांगलीतील 425 एसटी कर्मचारी बेस्ट बससेवेसाठी मुंबईत, 106 जणांना कोरोनाची बाधाhttps://t.co/LHcjsxogCw #Sangli #coronavirus
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 27, 2020
BEST Conductor Death
संबंधित बातम्या :
लॉकडाऊन काळात बेस्टने मंत्र्यांना बिलंच पाठवली नाहीत, माहिती अधिकारातून उघड