Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BEST STRIKE : हायकोर्टातही बेस्ट संपावर तोडगा नाहीच

मुंबई : विविध मागण्यांसाठी मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा आजचा चौथा दिवस आहे. तीन दिवस उलटूनही महापालिकेला यावर कुठलाही तोडगा काढता आलेला नाही. गुरुवारी महापौर बंगल्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत सलग सात तास चाललेल्या बैठकीत या संपावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र तो निष्फळ ठरल्याने आज चौथ्या दिवशीही बेस्ट कर्मचारी संपावर आहेत. दुसरीकडे […]

BEST STRIKE : हायकोर्टातही बेस्ट संपावर तोडगा नाहीच
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM

मुंबई : विविध मागण्यांसाठी मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा आजचा चौथा दिवस आहे. तीन दिवस उलटूनही महापालिकेला यावर कुठलाही तोडगा काढता आलेला नाही. गुरुवारी महापौर बंगल्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत सलग सात तास चाललेल्या बैठकीत या संपावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र तो निष्फळ ठरल्याने आज चौथ्या दिवशीही बेस्ट कर्मचारी संपावर आहेत.

दुसरीकडे बेस्ट कर्मचाऱ्यांचा हा संप आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे. वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी बेस्टच्या विद्युत पुरवठा विभागाचे कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत. तर महापालिका कामगार संघटनेनेही या संपाला जाहीर पाठिंबा दिला आहे. जर मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर शनिवारपासून संपावर जाण्याचा इशारा कामगार संघटनेने दिला.

LIVE UPDATE

  • बेस्ट संप – बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे, परिवहन सचिव आशिष कुमार सिंग यांनी मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांची भेट घेतली, बेस्ट संपाबाबत प्राथमिक चर्चा, उद्या 11 वाजता उच्च स्तरीय समितीची मंत्रालयात बैठक होणार
  • बेस्टच्या संपावर आजही तोडगा नाही, बैठक घेऊन निर्णय घ्या – हायकोर्टाचे आदेश, बेस्ट संपाबाबत सोमवारी सुनावणी
  • बेस्टच्या संपावर उच्चस्तरीय समितीची उद्या बैठक, मुख्य सचिवांना बैठक घेण्य़ाचे आदेश, संप मागे घेण्यास संघटनांचा नकार
  • दोन ते तीन तासांच्या संपानंतर मोनो रेलचे कर्मचारी कामावर परतले. सुमारे 200 कामगार संपावर गेल्याने मोनो ठप्प झाली होती
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत दूरध्वनीवर चर्चा. काल देखील चर्चा झाली होती. राज्य सरकार मध्यस्थी करण्यास तयार. राज्य सरकार मार्ग काढण्यासाठी तयार आहे. कोर्टाच्या भूमिकेवर राज्य सरकारची नजर .

आधी बेस्टचा वाहतूक विभाग आणि आता विद्युत विभाग संपावर गेल्याने मुंबईकरांचे मात्र आणखी हाल होणार आहेत. वाहतुकीत येणाऱ्या अडथळ्यांमुळे त्रस्त झालेल्या मुंबईकरांना कदाचित बत्ती गुलचाही त्रास सहन करावा लागू शकतो.

बस बंद असल्याने प्रवाशांना कामावर जाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. त्यातच टॅक्सीचालकांच्या मुजोरीनेही मुंबईकर त्रस्त झाले आहेत. बेस्ट संपाचा गैरफायदा घेत टॅक्सी चालक प्रवाशांकडून मनमानी पैसे घेत असल्याचं चित्र अनेक ठिकाणी बगायला मिळत आहे.

गुरुवारी महापौर बंगल्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुंबईचे महापालिका आयुक्त, बेस्टचे व्यवस्थापक आणि कामगार नेते शशांक राव यांच्यात सलग सात तास चर्चा होऊनही या संपावर तोडगा निघाला नाही.

“आम्ही बैठकीत बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या मांडल्या, मात्र, समोरुन कोणताच प्रस्ताव ठेवला नाही. त्यामुळे आम्ही चर्चा कशावर करणार?” अशी खंत  कामगार नेते शशांक राव यांनी व्यक्त केली. उद्धव ठाकरेंनी येऊन फक्त तोडगा काढण्याचे सांगितले. मात्र, पुढे आयुक्त आणि व्यवस्थापक यांनी कोणताच प्रस्ताव आमच्यासमोर मांडला नाही, असेही शशांक राव यांनी सांगितले.

या बैठकीतील चर्चेची माहिती शुक्रवारी बेस्ट कर्मचाऱ्यांना मेळाव्यात देण्यात येईल, त्यात संपाबाबत पुढील भूमिका अधिक स्पष्ट करु, अशी घोषणाही यावेळी शशांक राव यांनी केली.

संपावर तोडगा निघाला नाही, तर शनिवारपासून सफाई कामगार आणि रुग्णालय कर्मचारीही संपात उतरणार असल्याने बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

काय आहेत बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या

  • ‘बेस्ट’ उपक्रमाचा ‘क’ अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या ‘अ’ अर्थसंकल्पात विलीन करण्याबाबत मंजूर झालेल्या ठरावाची त्वरित अंमलबजावणी करणे.
  • 2007 पासून बेस्टमध्ये भरती झालेल्या कर्मचाऱ्यांची 7,930 रुपयांनी सुरू होणाऱ्या मास्टर ग्रेडमध्ये त्वरीत वेतननिश्चिती करावी.
  • एप्रिल 2016 पासून लागू करावयाच्या नवीन वेतन करारावर तातडीने चर्चा सुरू करावी.
  • 2016-17 आणि 2017-18 करिता पालिका कर्मचाऱ्यांइतकाच बोनस द्यावा.
  • कर्मचारी सेवा निवासस्थानांचा प्रश्न सोडवावा.
  • अनुकंपा भरती तातडीने सुरू करावी.

संबंधीत बातम्या :

सलग सात तासांची बैठक निष्फळ, ‘बेस्ट’चा संपच सुरुच राहणार

संप मिटल्यावर बुके द्या, एकत्र राहा, राज यांचा बेस्ट कर्मचाऱ्यांना सल्ला

संपकरी बेस्ट कर्मचाऱ्यांना घरं खाली करण्याची नोटीस, मेस्माचीही कारवाई

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा दिवस, आजही मुंबईकरांचे हाल

‘बेस्ट’ संपामुळे बेहाल मुंबईकरांसाठी एसटीच्या 55 बस रस्त्यावर

लाडक्या बहिणींनो एप्रिलच्या हफ्त्याची वाट पाहताय? कधी येणार पैसे?
लाडक्या बहिणींनो एप्रिलच्या हफ्त्याची वाट पाहताय? कधी येणार पैसे?.
ट्रम्प यांचं टेरिफ धोरण; भारत-चीनचे संबंध सुधरतील?
ट्रम्प यांचं टेरिफ धोरण; भारत-चीनचे संबंध सुधरतील?.
एका हातात मोबाईल अन् दुसऱ्या हातात स्टेअरिंग... बस चालकाचा बघा प्रताप
एका हातात मोबाईल अन् दुसऱ्या हातात स्टेअरिंग... बस चालकाचा बघा प्रताप.
मनसेची मान्यता रद्द करण्याची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल
मनसेची मान्यता रद्द करण्याची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल.
स्मृती इराणी यांनी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरवं, सिलेंडर आम्ही पुरवू
स्मृती इराणी यांनी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरवं, सिलेंडर आम्ही पुरवू.
टीव्ही 9च्या उपक्रमाचे पंतप्रधान मोदींकडून कौतुक
टीव्ही 9च्या उपक्रमाचे पंतप्रधान मोदींकडून कौतुक.
लाडक्या बहिणींची पात्रता पडताळणी ठप्प
लाडक्या बहिणींची पात्रता पडताळणी ठप्प.
साहेबांच्या कार्यकर्त्याचा आमदार निवासात मृत्यू
साहेबांच्या कार्यकर्त्याचा आमदार निवासात मृत्यू.
सचिन खरात यांची मेधा कुलकर्णी यांच्यावर टीका
सचिन खरात यांची मेधा कुलकर्णी यांच्यावर टीका.
.. तरच आम्ही हे राम राज्य असल्याचं मानू, आदित्य ठाकरेंचं भाजपला चॅलेंज
.. तरच आम्ही हे राम राज्य असल्याचं मानू, आदित्य ठाकरेंचं भाजपला चॅलेंज.