सर्वात कमी व्याजदराने देशातील सर्वाधिक कर्ज, ठाकरे सरकारचा जर्मनीच्या केएफडब्ल्यू बँकेशी करार

मुंबईकरांसोबतच ठाणेकरांचाही दररोजचा प्रवास आरामदायी आणि गतिमान होण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या मुंबई मेट्रो मार्गिका 4 आणि 4 अ प्रकल्पाचं काम वेळेत पूर्ण होईल, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे.

सर्वात कमी व्याजदराने देशातील सर्वाधिक कर्ज, ठाकरे सरकारचा जर्मनीच्या केएफडब्ल्यू बँकेशी करार
Follow us
| Updated on: Nov 06, 2020 | 7:43 PM

मुंबई : मुंबईकरांसोबतच ठाणेकरांचाही दररोजचा प्रवास आरामदायी आणि गतिमान होण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या मुंबई मेट्रो मार्गिका 4 आणि 4 अ प्रकल्पाचं काम वेळेत पूर्ण होईल, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. तसेच मुंबई महानगर परिसरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत हा प्रकल्प आमुलाग्र बदल घडवेल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते जर्मनीच्या केएफडब्ल्यू या सरकारी बँकेशी कर्जाबाबत करार केला तेव्हा बोलत होते. विशेष म्हणजे या बँकेने महाराष्ट्राला दिलेले हे कर्ज भारतातील सर्वात मोठं असून त्याचं व्याजदर सर्वात मी आहे (Biggest amount Loan Agreement of Thackeray Government with KFW Bank for Mumbai Metro Track 4).

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “आजचा दिवस महत्वाचा आहे. मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास अधिक सुसह्य होण्यासाठी मेट्रोच्या प्रकल्पांना गती दिली जात आहे. मेट्रो मार्गिका 4 आणि 4 अ साठी केएफडब्ल्यू संस्थेने मंजूर केलेले भारतातील सर्वात जास्त रकमेचे कर्ज असल्याचे त्यांनी सांगितले. सुमारे 2 लाख प्रवाशी दररोज ठाणे मुंबई प्रवास करतात. पुढील काही वर्षात मुंबईतील सार्वजनिक दळणवळण व्यवस्थेत आमुलाग्र बदल होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचं गतिमान प्रवासाचं स्वप्न साकार होणार आहे.”

मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थित मुंबई मेट्रो मार्गिका 4 आणि 4 अ या प्रकल्पासाठी जर्मनीच्या केएफडब्ल्यु विकास बँकेकडून घेण्यात येणाऱ्या कर्ज करारावर स्वाक्षरी करण्यात आली. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या कार्यक्रमात एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव आणि जर्मनीचे मुंबईतील वाणिज्यदूत जे. मोहार्ड यांनीही करारावर स्वाक्षरी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपरमुख्य सचिव आशीषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, वित्त विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, एमएमआरडीएचे अतिरीक्त महानगर आयुक्त डॉ. गोविंदराज आदी उपस्थित होते.

यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “केएफडब्ल्यू संस्था महाराष्ट्रासोबत पहिल्यांदा करार करीत आहे. हा प्रकल्प मुंबई महानगरातील प्रवाशांसाठी वरदान ठरणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबई आणि ठाणे हे दोन महानगरे जोडली जाणार आहेत. कोरोना काळात जम्बो उपचाराच्या सुविधांच्या उभारणीत एमएमआरडीएने महत्वाची भूमिका बजावली.”

मुंबई मेट्रो मार्गिका 4 प्रकल्पाचे वैशिष्ट्य:

  • केएफडब्ल्यु विकास बँकेकडून घेण्यात येणाऱ्या मुंबई मेट्रो मार्गिका 4 व 4-अ या प्रकल्पासाठी कर्ज करार.
  • 545 दशलक्ष युरो कर्ज हे KFW संस्थेने मंजूर केलेले भारतातील सर्वात जास्त रकमेचे कर्ज आहे.
  • भारतातील इतर प्रकल्पासाठी दिलेल्या कर्जपुरवठयापैकी हे कर्ज सर्वात कमी व्याजदराचे आहे.
  • मुंबई मेट्रो मार्गिका ४ वडाळा-कासारवडवली आणि मार्गिका 4-अ कासारवडवली ते गायमुख या मेट्रो मार्गिकांच्या अंमलबजावणीसाठी केएफडब्ल्यू या जर्मन विकास बँकेकडून इंडोजर्मन विकास सहाय्य अंतर्गत एकूण 545 दशलक्ष युरो इतक्या रक्कमेचे कर्ज मंजूर.
  • केएफडब्ल्यु जर्मन सरकारची विकास बँक. केएफडब्ल्यु विकास बँक सरकारी प्रकल्प, व्यापारी बँका आणि सार्वजनिक संस्थांना वित्तीय सहाय्य देते.

कर्ज तीन भागामध्ये मंजूर.

1) 345 दशलक्ष युरो इतकी रक्कम विकास कर्ज (Official Development Assistance) / कमी व्याजदर कर्ज (Reduce Interest Loan) म्हणून मंजूर. कर्ज 2 भागामध्ये वितरीत होणार. भाग 1 – 255 दशलक्ष युरो हे रोलिंग स्टॉक आणि स्वयंचलित भाडे प्रणालीच्या उभारणीसाठी. तसेच भाग 2 – 90 दशलक्ष युरो निधी बहुवाहतूक परिवहन एकत्रिकरणाकरीता (Multimodal Integration) उपलब्ध होणार आहे.

2) 200 दशलक्ष युरो इतकी रक्कम अतिरिक्त विकास सहाय्य कर्ज (official Development Assistance Plus) हे इतर रेल्वे प्रणालीसाठी उपलब्ध होणार आहे.

3) 2.2 दशलक्ष युरो हे परिचालन व परिरक्षण संस्था कार्यान्वित करण्याकरीता अनुदान म्हणून उपलब्ध होणार आहे.

कर्जाचे मुख्य वैशिष्ट

अ. 545 दशलक्ष युरो कर्ज हे KFW या संस्थेने मंजूर केलेले भारतातील सर्वात जास्त रक्कमेचे कर्ज आहे.

ब. प्राधिकरणाने वाटाघाटी करुन विकास कर्ज (Official Development Assistance) भाग 1 करीता 0.29 टक्के आणि भाग 2 करीता 0.07 टक्के इतका व्याजदर निश्चित. 200 दशलक्ष यूरोकरीता 0.82 टक्के इतका व्याजदर निश्चित.

भारतातील इतर प्रकल्पाकरीता दिलेल्या कर्जपुरवठयापैकी हे कर्ज सर्वात कमी व्याजदराचे आहे.

याकरीता त्रिपक्षीय कर्ज करार – भारत सरकार आणि केएफडब्ल्यू विकास बँक व प्रकल्प करार यांच्या दरम्यान. तसेच केएफडब्ल्यु विकास बँक, महाराष्ट्र शासन आणि एमएमआरडीए यांच्या दरम्यान आणि स्वतंत्र द्विपक्षीय करार हा केएफडब्ल्यु विकास बँक आणि एमएमआरडीए यांच्यात करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या :

‘फडणवीस सरकारने मुंबईकरांचा विश्वासघात केला, कागदोपत्री सिद्ध करुन दाखवणार’- सचिन सावंत

महाराष्ट्राच्या सातबाऱ्यावर दिल्लीचे नाव कसे?; संजय राऊतांचा केंद्र सरकारला सवाल

मुंबईची इंच इंच जमीन फक्त महाराष्ट्राचीच, विकास रोखण्याचे षडयंत्र एकजुटीने उधळून लावूया, संजय राऊतांचा घणाघात

संबंधित व्हिडीओ :

Biggest amount Loan Agreement of Thackeray Government with KFW Bank for Mumbai Metro Track 4

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.