बेड-व्हेंटिलेटरच्या कमतरतेमुळे कोरोनाग्रस्त दगावल्याचा आरोप, भाजपचं मूक आंदोलन

कोरोना रुग्णांना सक्षम रुग्णसेवेसाठी शुक्रवारी भाजपा नगरसेवकांनी महापौर, पालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांच्या दालनाबाहेर तोंडावर काळी पट्टी आणि मास्क बांधून मूक धरणं आंदोलन केलं.

बेड-व्हेंटिलेटरच्या कमतरतेमुळे कोरोनाग्रस्त दगावल्याचा आरोप, भाजपचं मूक आंदोलन
Follow us
| Updated on: Jun 05, 2020 | 5:46 PM

मुंबई : मुंबईत कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव (BJP Protest) वाढत आहे. अशा परिस्थितीत रुग्णांना रुग्णायलात खाटांसाठी वणवण भटकावे लागत आहे. खाटा, आयसीयू आणि व्हेंटिलेटर मिळाले नाही, म्हणून आतापर्यंत शेकडो कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. याच्या निषेधार्थ आणि कोरोना रुग्णांना सक्षम रुग्णसेवेसाठी शुक्रवारी भाजपा नगरसेवकांनी महापौर, पालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांच्या दालनाबाहेर तोंडावर काळी पट्टी आणि मास्क बांधून मूक धरणं (BJP Protest) आंदोलन केलं.

राज्य सरकारने 21 मे रोजी परिपत्रक काढून खासगी हॉस्पिटल मधील 80 टक्के बेड ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते. मात्र, 14 दिवस झाल्यानंतरही आजपर्यंत खाजगी हॉस्पिटलमधील रुग्ण बेड, अतिदक्षता – व्हेंटिलेटर बेड मुंबईकरांना उपलब्ध झालेले नाहीत.

याच्या निषेधार्थ मुंबई महापालिकेतील भाजप गटनेते प्रभाकर शिंदे, पक्षनेता विनोद मिश्रा आणि प्रवक्ता भालचंद्र शिरसाट, नगरसेवक अतुल शाह, कमलेश यादव, अभिजित सामंत, सुनिल यादव, ऍड मकरंद नार्वेकर, सुषम सावंत, अनीस मकवानी, नगरसेविका उज्ज्वला मोडक, रिटा मकवाना यांच्यासह इतर नगरसेवकांनी सहभाग घेतला. या नगरसेवकांनी मुंबईच्या महापौर, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांच्या दालनाबाहेर तोंडावर काळी पट्टी आणि मास्क बांधुन एक तास मूक धरणे आंदोलन केले (BJP Protest).

कोरोनामुळे त्रस्त रुग्ण बेडसाठी वणवण भटकत आहेत. बेड, आयसीयु आणि व्हेंटिलेटर मिळाले नाही, म्हणून आजपर्यंत शेकडो गंभीर रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप प्रभाकर शिंदे यांनी केला. भाजप गटाने सातत्यपूर्ण पत्रव्यवहार, व्हॉट्सअॅप, ई मेल, ट्विट आणि प्रत्यक्ष भेटीत चर्चा केल्यानंतरही मुंबई महापालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनाने अद्याप खाजगी हॉस्पिटलमधील बेड ताब्यात घेतले नाहीत.

मुंबईतील खाजगी हॉस्पिटलमधील 80 टक्के बेड म्हणजेच 16 हजार बेड्सबाबत महापालिकेने श्र्वेतपत्रिका काढावी. हे बेड 24 तासात ताब्यात घ्यावेत, त्याची माहिती महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या डॅशबोर्डवर आणावी. हा डॅशबोर्ड मोबाईल ॲपवर सामान्य मुंबईकरांना उपलब्ध करुन द्यावा. खाजगी हॉस्पिटलमधील कोव्हिड रुग्णांच्या उपचाराचे दरपत्रक प्रसिद्ध करावे. या मागण्यांसह कोरोनाग्रस्त रुग्णांप्रती महापालिकेची संवेदनहीनता उजेडात आणण्यासाठी आणि सत्ताधीशांना जागे करण्यासाठी भाजप नगरसेवकांनी धरणे आंदोलन केल्याचे भाजपा प्रवक्ता भालचंद्र शिरसाट यांनी सांगितले.

14 दिवसांनी कोरोनाग्रस्त रुग्णांचा विलगीकरण कालावधी संपतो, पण महापालिकेतील सत्ताधारी, राज्यातील सरकार आणि प्रशासनाचा हा कालावधी कधी संपणार? असा सवाल शिरसाट यांनी (BJP Protest) केला आहे.

संबंधित बातम्या :

सोनू सूदच्या कामाने रोहित पवार भारावले, घरी जाऊन कौतुकाची थाप

लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत स्थान, उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया

राज्यसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला दुसऱ्यांदा धक्का, गुजरातमध्ये दोन आमदारांचा राजीनामा

मुंबईत कोरोना चाचण्या 50 टक्क्याहून कमी, मृतांची संख्या वाढली, फडणवीसांचं मुख्यंत्र्यांना पत्र

'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.