Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाणीपट्टी वसूलीसाठी पालिकेची अभय योजना, 138 कोटी रुपये तिजोरीत जमा

नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहता 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. (BMC Abhay Yojana for water bill recovery) 

पाणीपट्टी वसूलीसाठी पालिकेची अभय योजना, 138 कोटी रुपये तिजोरीत जमा
Follow us
| Updated on: Nov 15, 2020 | 9:26 AM

मुंबई : कोरोना संकटामुळे अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे अनेकांचे पाणीपट्टी, वीजेचे बिल थकले आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने अभय योजना सुरु केली होती. या योजनेअंतर्गत पाणीपट्टी थकविणाऱ्या नागरिकांकडून 138 कोटींची वसुली करण्यात पालिकेला यश आले आहे. या योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहता 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. (BMC Abhay Yojana for water bill recovery)

मुंबईतील नागरिकांनी त्यांच्या जलदेयकांचे बील जलदेयकाच्या दिनांकापासून एका महिन्यात भरणे बंधनकारक आहे. मात्र एका महिन्याच्या आत देयकाचे पैसे न भरल्यास त्यावर दर महिन्याला दोन टक्के अतिरिक्त आकारणी केली जाते. या अतिरिक्त आकारामुळे थकबाकीची रक्कम वाढत जाते. या थकबाकीबाबत जल जोडणीधारकांना विशेष सूट देण्यासाठी पालिकेने 15 फेब्रुवारी 2020 पासून ‘अभय योजना 2020’ सुरु केली होती.

शासकीय, निमशासकीय आणि खासगी कार्यालयांकडे मोठ्या प्रमाणात पाणीपट्टी थकली आहे. ही थकीत रक्कम वसूल व्हावी आणि नागरिकांनी वेळेवर पाणीपट्टी भरावी यासाठी प्रशासनाने अभय योजना जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत दोन टक्के अतिरिक्त आकारणी शुल्क माफ केले जाते.

या योजनेला मिळत असलेला नागरिकांचा प्रतिसाद पाहून योजनेला 31 डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई पालिकेच्या जल अभियंता खात्यातर्फे करण्यात आले आहे.

30.55 कोटींची सूट

या योजनेअंतर्गत 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत 56 हजार 964 जलजोडणीधारकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेअंतर्गत जलजोडणी-धारकांकडून 138.19 कोटी रुपये कर पालिकेकडे जमा करण्यात आला. तर महानगरपालिकेद्वारे तब्बल 30.55 कोटी रुपयांची सूट जलजोडणीधारकांना देण्यात आली. (BMC Abhay Yojana for water bill recovery)

संबंधित बातम्या : 

मुंबईतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट, लोकलमधून प्रवासाची मुभा, रेल्वेचा राज्याच्या निर्णयाला ग्रीन सिग्नल

आता मुंबईकर वाचवणार मुंबईकरांचा जीव, महापालिकेकडून नागरिकांना विशेष प्रशिक्षण

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.