मुंबईतील पाऊस आणि वारं याला चक्रीवादळच म्हणावे लागेल : आयुक्त इक्बाल चहल
वाऱ्याचा वेग काल ताशी 101 किमी होता, तर चार तासात 300 मिमी पाऊस झाला. याला चक्रीवादळ म्हणायला हरकत नाही, असं आयुक्त इक्बाल चहल म्हणाले.
मुंबई : मुंबईतील तुफानी पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी दक्षिण मुंबईतील पेडर रोड, कुलाबा परिसराची पाहणी केली. “मुंबईत काल जो पाऊस आणि वारा होता, ते एकप्रकारचं वादळच म्हणावं लागेल” असं इक्बाल चहल म्हणाले. (BMC Commissioner Iqbal Chahal reviews Rain condition in Mumbai)
ताशी 100 किमी वाऱ्याचा वेग
मुंबईत काल दुपारपासून विक्रमी पाऊस झाला. कुलाबा, नरीमन पॉईंट, हाजी अली परिसरात धुवाँधार पाऊस होता. काही तासात 300 मिमी पाऊस पडला. त्याशिवाय वाऱ्याचा वेग ताशी 101 किमी होता. जूनमध्ये जे वादळ आलं होतं, तेव्हा ताशी 100 ते 110 किमी वेगाने वारे वाहील असा इशारा दिला होता. वादळाची ती व्याख्या आहे. पण काल वाऱ्याचा वेग ताशी 101 किमी होता, तर चार तासात 300 मिमी पाऊस झाला. याला चक्रीवादळ म्हणायला हरकत नाही, असं आयुक्त इक्बाल चहल म्हणाले.
नरीमन पॉईंट, कुलाबा परिसरात इतका पाऊस कधीही पाहिला नाही, हा विक्रमी पाऊस होता, काल रेल्वेसेवा विस्कळीत झाली, ती पहाटे सुरु केली, प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढलं, रात्री 10 नंतर एकही प्रवासी रेल्वेत अडकला नाही, असं चहल यांनी सांगितलं.
LIVETV – मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल – पेडर रोड भागात एक झाड पाण्याच्या पाईपलाईनवर पडलं, त्यामुळे ती पाईपलाईन दुरुस्त करण्यासाठी 24 तास लागतील, तोपर्यंत आम्ही त्या भागात टँकरने पाणी पुरवू https://t.co/ImprYhMJl7 pic.twitter.com/DVmGdPUY0O
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 6, 2020
(BMC Commissioner Iqbal Chahal reviews Rain condition in Mumbai)
मी सुद्धा तीन वर्षे या भागात आहे, इतका पाऊस नरीमन पॉईंट भागात इतका पाऊस पाहिला नाही. 2005 च्या महापुरावेळीही या भागावर परिणाम झाला नव्हता, पण काल इतका मोठा पाऊस झाला, असं ते म्हणाले.
हेही वाचा : खतरों के खिलाडी, लोकल पाण्यात अडकल्या, NDRF कडून प्रवाशांची थरारक सुटका
कोव्हिड सेंटर जे जे रुग्णालयातील पाणी पंप लावून काढलं, पेडर रोड परिसरात अनेक झाडं पडली, तो परिसर दुपारपर्यंत रिकामं करण्याचा प्रयत्न करु. पेडर रोड भागात एक झाड पाण्याच्या पाईपलाईनवर पडलं. त्यामुळे ती पाईपलाईन दुरुस्त करण्यासाठी 24 तास लागतील, तोपर्यंत आम्ही त्या भागात टँकरने पाणी पुरवू, असं इक्बाल चहल यांनी नमूद केलं.
पहा व्हिडिओ :
(BMC Commissioner Iqbal Chahal reviews Rain condition in Mumbai)