Online Education | शाळेत, घरुन कसं काम करावं, शिक्षकांसाठी मुंबई महापालिकेची नियमावली
वर्क फ्रॉम होम कसं करायचं आणि नेमकं काय करायचं, यासंदर्भात मुंबई मनपा शिक्षणविभागाने काही आदेश जारी केले आहे.
मुंबई : महाराष्ट्र अनलॉक होण्याच्या दिशेने (BMC Orders To Schools) टप्प्याटप्प्याने वाटचाल करत आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने तूर्तास तरी शाळा ऑनलाईनच उघडण्यात आल्या आहेत. लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतर मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शाळा टप्प्या-टप्प्याने सुरु करण्यात आल्या आहेत. शिक्षकांनी शाळेत कसं आणि काय काम करायचं? तसेच, वर्क फ्रॉम होम कसं करायचं आणि नेमकं काय करायचं, यासंदर्भात मुंबई मनपा शिक्षणविभागाने काही आदेश जारी केले (BMC Orders To Schools) आहेत.
यामध्ये शाळा जरी प्रत्यक्षात सुरु झाल्या नाहीत तरी शिक्षण आणि शैक्षणिक वर्ष मात्र वेळेत सुरु करणे, तसेच विद्यार्थ्यांना शाळेत सुरक्षित कसे ठेवावे. शैक्षणिक वर्ष आणि शिक्षण हे ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने 15 जूनपासून सुरु करण्याबाबतही सूचना देण्यात आल्या होत्या.
स्थानिक आणि बदलत्या परिस्थितीनुसार शाळा सुरु करण्यापूर्वी त्या-त्या जिल्ह्याच्या कोव्हिड-19 आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी किंवा महानगरपालिका क्षेत्रांसाठी संबंधित महानगरपालिका आयुक्तांनी शाळा प्रत्यक्ष केव्हा सुरु कराव्यात याबाबत निर्णय घेण्याच्या सूचना केल्या आहेत.
शिक्षणासंदर्भात महापालिकेच्या सूचना
– शाळेमध्ये प्राप्त झालेल्या पाठ्यपुस्तकांचे वाटप पालकांना शाळेत टप्प्या-टप्प्याने बोलावून आणि आवश्यक सुरक्षित अंतर ठेवून करावे.
– जर काही विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळाली नाहीत तर त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून तातडीने अशा विद्यर्थ्यांना गेल्या वर्षीची पुस्तकं द्यावी (BMC Orders To Schools)
– शाळेमध्ये पाठ्यपुस्तकांचे वाटप पालकांना करावयाचे असल्यानं मुख्याध्यापकांनी गरजेनुसार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह शाळेत उपस्थित राहण्याचे आदेश, तसेच, आवश्यक भासल्यास शिक्षकांना कार्यालयात उफस्थित राहणे आवश्यक असेल
– पुढील आदेशापर्यंत म्हणजेच 30 जून 2020 पर्यंत ई-लर्निंग शैक्षनिक सुविधेनुसार शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घरात राहुनच ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने शिक्षण द्यावे
– 15 जून ते 30 जून दरम्यान घरात राहून शिक्षण द्यायचे असल्याने शिक्षकांच्या उपस्थितीची नोंद केली जाईल
15 जूनपासून वर्च्युअल शाळा उघडल्या
दरवर्षी 13 जूनला शाळेचा पहिला दिवस असतो. मात्र, यावेळी ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सगळं वेळापत्रकच बदललं. 15 जूनच्या मुहूर्तावर शाळा उघडल्या खऱ्या मात्र विद्यार्थ्यांना वर्गात नाही तर संगणकावर ‘एन्टर’चे बटण दाबून वर्च्युअल क्लासरुममध्ये हजेरी लावावी लागली.
काही बोर्डाच्या शाळा आधीच उघडल्या असल्या तरी महाराष्ट्रात एसएससीच्या शाळा 15 जूनपासून ऑनलाईन सुरु झाल्या आहेत. ई-स्कूलमुळे विद्यार्थांना शारीरिक ताण येण्याची शक्यता व्यक्त करत काही पालक आणि संघटनांनी विरोध दर्शवला होता, मात्र कुठल्याही परीस्थितीत विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये, ही भूमिका घेत राज्य सरकारने शाळांचे टाळे ऑनलाईन उघडले आहेत.
E-School Reopens | ना शाळेची घंटा, ना सवंगड्यांची भेट, वर्च्युअल शाळा उघडल्या, ई-शिक्षणाचा श्रीगणेशा https://t.co/unfjD2TPKO #MaharashtraSchools #VirtualClassroom
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 15, 2020
BMC Orders To Schools
संबंधित बातम्या :
HSC, SSC Result | दहावी आणि बारावीचा निकाल जुलैमध्ये : शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
Exam controversy | “उच्च शिक्षणमंत्री पांडूप्रमाणे इसरलंय” आशिष शेलारांच्या ‘कल्पक’ कानपिचक्या
मुख्यमंत्र्यांकडून शैक्षणिक वर्ष सुरु करण्यास परवानगी, शिक्षण विभागाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय