‘आरे’प्रकरणी सर्व याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळल्या
आरे कॉलनीतील मेट्रो कारशेड प्रकरणीच्या सर्व याचिका मुंबई हायकोर्टाने (Bombay HC dismisses all Aarey pleas) फेटाळल्या आहे. यामुळे आरे कॉलनीत मेट्रो कारशेडचा मार्ग मोकळा झाला (Bombay HC dismisses all Aarey pleas) आहे.
मुंबई : आरे कॉलनीतील मेट्रो कारशेड प्रकरणीच्या सर्व याचिका मुंबई हायकोर्टाने (Bombay HC dismisses all Aarey pleas) फेटाळल्या आहे. यामुळे आरे कॉलनीत मेट्रो कारशेडचा मार्ग मोकळा झाला (Bombay HC dismisses all Aarey pleas) आहे. पर्यावरणप्रेमी झोरू भथेना (Zoru Bhathena) व ‘वनशक्ती’ (Vanshakti) स्वयंसेवी संस्थेने कारशेडबाबत दाखल केलेल्या सर्व याचिका हायकोर्टाने फेटाळल्या (Bombay HC dismisses all Aarey pleas) आहेत. त्यामुळे मेट्रो कारशेड आरे कॉलनीमध्येच होण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.
मुंबई वृक्ष प्राधिकरणाने वृक्षतोडीसाठी दिलेली परवानगी वैध आहे का? आरे कॉलनी हे वनक्षेत्र आहे का? तसेच मेट्रो कारशेडची उभारणी मिठी नदीच्या पूरक्षेत्रात होत आहे की नाही? अशाप्रकारच्या चार याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आल्या होत्या. गेल्या 2 महिन्यांपासून याप्रकरणी कोर्टात सुनावणी सुरु होती. याप्रकरणी 30 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार होती. मात्र त्यावेळी कोर्टाना निकाल राखून ठेवत 4 ऑक्टोबरला सुनावणी केली जाईल असे स्पष्ट केले होते.
याप्रकरणी शुक्रवारी झालेल्या सुनावणीत कोर्टाने चारही याचिका फेटाळून लावल्या आहेत. एका प्रकरणी कोर्टाने याचिकाकर्ते यांना दंडही ठोठावला आहे. तसेच नगरसेवक यशवंत जाधव यांनाही याप्रकरणी (Bombay HC dismisses all Aarey pleas) दंड ठोठावला आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून आरे कॉलनीतील वृक्षतोडीवरुन चांगलंच राजकारण तापलं आहे. मेट्रो कारशेडसाठी वृक्ष तोडीसाठी अनेकांनी विरोध केला होता. त्यानंतर कोर्टाने सुनावणीदरम्यान 30 सप्टेंबरपर्यंत मेट्रो कारशेडसाठी आरेतील एकही झाड कापू नये असे आदेश दिले होते.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरे कॉलनीतील वृक्षतोडीला शिवसेनेने विरोध दर्शवला होता. जे नाणारचं झालं तेच आरे चं होणार अशा कठोर शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आरेबाबत आपली भूमिका (Bombay HC dismisses all Aarey pleas) स्पष्ट केली होती. त्यानंतर सर्व पर्यावरण प्रेमी याबाबत एकवटले होते. स्थानिक रहिवाशांनीही आंदोलने करत वृक्षतोडीला विरोध केल्याने एमएमआरसी आणि पालिकेची कोंडी झाली होती.
नेमकं प्रकरण काय?
कुलाबा ते सीप्झ मेट्रो 3 प्रकल्पासाठी आरे कॉलनीत कारशेड बनवले जाणार आहे. याचे कंत्राट दिल्लीतील सॅम बिल्टवेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला देण्यात आले आहे. या कारशेडसाठी 328 कोटींचा खर्च येणार आहेत. आरे कॉलनीतील 25 हेक्टर जमिनीवर हे कारशेड उभं राहणार आहेत. यासाठी 3130 झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. या कारशेडमध्ये मेट्रो गाड्या पार्क होणार आहेत. तसेच याठिकाणी या गाड्या धुतल्या जाणार असून त्यांच्या दुरुस्तीचे कामही या कारशेडमध्ये होणार आहे. या सर्व झाडांच्या कत्तलीविरोधात पर्यावरण प्रेमी आक्रमक झाले होते. अनेक ठिकाणी पर्यावरण प्रेमींनी मेट्रो कारशेडसाठी आरेच्या जंगलतोडीला विरोध दर्शवला होता.