Share Market Live | त्सुनामीनंतर शेअर बाजाराची भरारी, सेन्सेक्समध्ये 500 अंकांची वाढ

मुंबई शेअर मार्केटमध्ये ऐतिहासिक पडझड झाल्यामुळे बाजाराचे व्यवहार एक तासासाठी बंद करण्याची वेळ ओढावली होती. BSE Closed Sensex fell

Share Market Live | त्सुनामीनंतर शेअर बाजाराची भरारी, सेन्सेक्समध्ये 500 अंकांची वाढ
Follow us
| Updated on: Mar 13, 2020 | 11:01 AM

मुंबई : मुंबई शेअर मार्केटमध्ये ऐतिहासिक पडझड झाल्यामुळे व्यवहार एक तासासाठी बंद करण्याची वेळ ओढावली . शेअर बाजार उघडताच निर्देशांकात 3100 अंकांनी घसरण होऊन तो 30 हजारांच्या खाली गेल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. शेअर बाजार उघडतास सेन्सेक्स 3100 अंकांनी कोसळून 30 हजारांच्या खाली गेला होता. निफ्टीमध्येही 900 अंशांपेक्षा जास्त घसरण पाहायला मिळाली.सेन्सेक्स नियंत्रणाबाहेर पडल्यामुळे सकाळी सव्वादहा वाजेपर्यंत ‘बीएसई’मधील सर्व व्यवहार बंद करण्यात आले .(BSE Closed Sensex fell)

Share Market Live Update

11.00 AM : सेन्सेक्समध्ये 334.53 अंकांची वाढ, निर्देशांक 33,112.67 अंकावर

10. 50 AM : सकाळी 10.20 वाजता पुन्हा एकदा शेअर बाजारातील ट्रेडिंग सुरु करण्यात आली. आधी तब्बल 3300 अंकांनी कोसळलेला मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक हळूहळू उभारी घेताना दिसला. शिवाय राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात निफ्टीतही वाढ होताना दिसत आहे. सकाळी 10.30 वाजता सेन्सेक्समधील घसरणीचा आकडा 3300 वरुन 1300 वर पोहोचला. मग सकाळी 10.50 वाजता सेन्सेक्सने भरारी घेत 568 अंकांनी उसळी घेतली. म्हणजेच कोसळलेला निर्देशांक पुन्हा वर आला. सर्किट लागलं तेव्हा सेन्सेक्स 29687.52 इतका होता, त्यामध्ये वाढ होऊन 11 च्या सुमारास तो 33112 अंकांवर गेला.

मुंबई शेअर बाजारात लोअर सर्किट

गेल्या दोन आठवड्यांपासून मुंबईसह आशियाई शेअर बाजारात कोरोनाचा प्रभाव पाहायला मिळत आहे. जपान, अमेरिकेतील शेअर बाजारही कोसळलेले आहेत. परिणामी मुंबई शेअर मार्केटही 10 टक्क्यांनी कोसळला. त्यामुळे शेअर मार्केटचे व्यवहार बंद करण्यात आले.

त्याचा परिणाम सोन्याच्या दरावरही पाहायला मिळाले. सोन्याचे दर 2600 रुपयांनी घटून 41 हजार 600 वर गेले आहेत. दुसरीकडे डॉलरच्या तुलनेत रुपयाचा भावही 16 टक्क्यांनी घसरला आहे.

45 मिनिटांसाठी ट्रेडिंग थांबवली

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टी 10 टक्क्यांपेक्षा खाली घसरली. जेव्हा मार्केट 10 टक्क्यांपेक्षा जास्त कोसळतं त्यावेळी लोअर सर्किट लावलं जातं म्हणजेच शेअर मार्केटचे व्यवहार काही काळासाठी थांबवले जातात. या आधी मे 2008 मध्ये अशाच पडझडीमुळे शेअर मार्केट काही काळासाठी बंद करण्यात आला होता. त्यावेळी जागतिक मंदीचं सावट भारतीय बाजारात दिसत होतं.

शेअर बाजाराच्या इतिहासात याआधी दोन वेळा मार्केट बंद करण्याची वेळ आली होती, अशी माहिती शेअर मार्केट विषयातील तज्ज्ञांनी दिली आहे. नजीकच्या काळात शेअरचे भाव पुन्हा वधारतील, त्यामुळे गुंतवणूकदारांनी घाबरुन जाण्याचं कारण नाही, असं आवाहन शेअर मार्केट तज्ज्ञ विश्वास उटगी यांनी केलं आहे.

सध्या मार्केट कोसळल्यामुळे ट्रेडिंग 45 मिनिटांसाठी रोखण्यात आलं. यानंतर आता व्यवहार 10.15 नंतर सुरु करण्यात येतील. शेअर बाजारात 10 टक्क्यांपेक्षा जास्त घसरण झाली तर तातडीने लोअर सर्किट लावून खरेदी-विक्री थांबवली जाते. गेल्या 12 वर्षात पहिल्यांदाच शेअर मार्केटचं ट्रेडिंग रोखण्यात आलं.

व्यापार बंद का केला जातो?

गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीचे संरक्षण करण्यासाठी व्यापारावर बंदी घालण्यात येते. यामुळे गुंतवणूकदारांचे नुकसान होण्याचे संकट अधिकच गहिरे होण्यास चाप बसतो. जेव्हा व्यवहार थांबले, तेव्हा सेन्सेक्स 3090.62 अंकांनी खाली येऊन 29,687.52 वर बंद झाला. निफ्टी 966.10 च्या घसरणीसह 8,624.05 अंकांवर पडला.

सेबीचे नियम काय?

SEBI म्हणजे Securities and Exchange Board of India किंवा भारतीय सुरक्षा आणि विनिमय मंडळाने निर्देशांकाबाबत काही नियम ठरवले आहेत. ‘सेबी’च्या नियमानुसार –

  • निर्देशांक (सेन्सेक्स किंवा निफ्टी) एक वाजण्याआधी 10 टक्क्यांनी घसरले, तर व्यवहार 45 मिनिटांसाठी थांबवण्यात येतो.
  • दुपारी एक ते अडीच वाजताच्या दरम्यान पडला, तर हा कालावधी 15 मिनिटांचा असतो. तर दुपारी अडीचनंतर पडल्यास व्यवहार थांबत नाहीत.

कोरोना व्हायरसमुळे आर्थिक विकासाला फटका बसण्याची भीती गुंतवणूकदारांमध्ये आहे, या नैराश्यामुळेच मुंबई शेअर बाजार कोसळला. निफ्टीने 10 टक्क्यांचा नीचांक (लोअर सर्किट) गाठल्यामुळे शेअर बाजारातील सर्व व्यवहार 45 मिनिटांसाठी थांबवण्यात आले.

BSE Closed Sensex fell

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.