मुंबई महापालिकेत भाजपचे फेरबदल, शिवसेनेतून आलेला आक्रमक चेहरा विरोधीपक्ष नेतेपदी

प्रभाकर शिंदे यांनी दोन वर्षांपूर्वी शिवसेनेला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता त्यांच्याकडे बीएमसीमध्ये विरोधीपक्ष नेतेपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेत भाजपचे फेरबदल, शिवसेनेतून आलेला आक्रमक चेहरा विरोधीपक्ष नेतेपदी
Follow us
| Updated on: Feb 27, 2020 | 2:05 PM

मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत आपला महापौर बसवण्याचा निर्धार केलेल्या भाजपने बीएमसीमध्ये नव्याने नियुक्ती केल्या आहेत. भाजप नगरसेवक प्रभाकर शिंदे हे आता मुंबई महापालिकेत विरोधी पक्षाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळणार आहेत. (BMC BJP Opposition Leader)

मनोज कोटक यांची खासदारपदी निवड झाल्यानंतर बीएमसीमध्ये भाजपला आक्रमक नेतृत्व गवसलेलं नव्हतं. त्यातच शिवसेनेच्या साथीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी आल्यामुळे भाजप विरोधी बाकावर जात ‘पहारेकऱ्यां’च्या भूमिकेत शिरली. त्यानंतर मुलुंडचे नगरसेवक प्रभाकर शिंदे यांच्याकडे विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

प्रभाकर शिंदे यांनी दोन वर्षांपूर्वी शिवसेनेला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर बीएमसीमध्ये प्रभाकर शिंदेंची तोफ सत्ताधारी शिवसेनेविरोधात धडाडताना पाहायला मिळणार आहे.

उज्ज्वला मोडक आणि रिटा मकवाना यांची महापालिकेत उपनेतेपदी निवड झाली आहे. विनोद मिश्रा यांची गटनेतेपदी वर्णी लागली आहे. तर सुनील यादव यांची मुख्य प्रतोद म्हणून भाजपने नियुक्ती केली आहे.

शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात झालेल्या महापौर निवडणुकीत भाजप उमेदवार देण्याची चर्चा होती. मात्र भाजपने मुंबई महापौरपदाची निवडणूक न लढण्याची घोषणा केली होती. परंतु 2022 मध्ये मुंबईत भाजपचा महापौर असेल, असा दावाही खासदार मनोज कोटक यांनी केला होता.

मुंबई महापालिका संख्याबळ –

  • शिवसेना – 96
  • भाजप – 82
  • काँग्रेस – 29
  • राष्ट्रवादी काँग्रेस – 8
  • समाजवादी पार्टी – 6
  • एमआयएम – 2
  • मनसे – 1
  • अभासे – 1

मुंबई महापालिकेतील चित्र

गेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप शिवसेनेसोबत सत्तेत थेट सहभागी झाली नव्हती. शिवसेनेला मुंबई महापौरपदावर दावा करण्यासाठी बहुमताचा जादुई आकडा 113 होता. त्यासाठी भाजपने शिवसेनेला मदत केली होती.

BMC BJP Opposition Leader

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.