शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर मुंबईच्या महापौरपदी विराजमान
शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर या मुंबईच्या (Kishori Pednekar Mumbai mayor ) महापौरपदी विराजमान झाल्या आहेत. किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar Mumbai mayor ) यांची बिनविरोध निवड झाली आहे.
मुंबई : शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर या मुंबईच्या (Kishori Pednekar Mumbai mayor ) महापौरपदी विराजमान झाल्या आहेत. किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar Mumbai mayor ) यांची बिनविरोध निवड झाली आहे. उपमहापौरपदासाठी सुहास वाडकर (Suhas Wadkar Mumbai deputy mayor) यांचे नाव निश्चित आहे.
किशोरी पेडणेकर या मुंबई महापालिकेच्या (191 G/S) वरळीतील गांधीनगर-डाऊन मिलमधील नगरसेविका आहेत. त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण झाले आहे. त्या वरळीतील बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल या शाळेत शिकल्या आहेत.
किशोरी पेडणेकर या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका आहेत. कायम विरोधकांना परखड उत्तर देणाऱ्या नेत्या अशी किशोरी पेडणेकर यांची ओळख आहे. वरळीला शिवसेनेचा गड बनवण्यात किशोरी पेडणेकर यांचा मोठा वाटा (Kishori Pednekar Information) आहे.
मुंबईच्या महापौरपदासाठी अनेक ज्येष्ठ नगरसेवकांनी दावा केला होता. यशवंत जाधव, मंगेश सातमकर यांसारख्या स्थायी समितीच्या सदस्यांनी महापौरपदासाठी दावा केला होता. मात्र शेवटच्या क्षणी शिवसेनेकडून महापौरपदासाठी किशोरी पेडणेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं होतं.
मुंबई महापालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांची बिनविरोध निवड तर उपमहापौरपदी सुहास वाडकर, शिवसेनेचा जल्लोष pic.twitter.com/mPYSnCKuWO
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 22, 2019
कोण आहेत किशोरी पेडणेकर?
- किशोरी पेडणेकर या मुंबई महापालिकेच्या (191 G/S) वरळीतील गांधीनगर-डाऊन मिलमधील नगरसेविका आहेत.
- त्यांचे शिक्षण 10 वी पर्यंत झाले आहे.
- किशोरी पेडणेकर यांचे शिक्षण वरळीतील बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल या शाळेत झाले आहे.
- किशोरी पेडणेकर या सलग तीन वेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत.
- आतापर्यंत त्यांनी एकही मोठ पद भूषवलेले नाही.
- काही काळासाठी त्यांनी एका वर्षासाठी स्थापत्य शहर समितीच्या अध्यक्षा होत्या.
- पेडणेकर यांना पालिका कामकाजाचा दांडगा अनुभव आहे.
- किशोरी पेडणेकर यांना 2017-18 वर्षीचा प्रजा फाऊंडेशनतर्फे सर्वोत्कृष्ट नगसेवक म्हणून पुरस्कारही पुरस्कार मिळाला आहे.
बीएमसीतील संख्यागणित –
- शिवसेना – 94
- भारतीय जनता पार्टी – 83
- काँग्रेस – 29
- राष्ट्रवादी काँग्रेस – 8
- समाजवादी पार्टी – 6
- एमआयएम – 2
- मनसे – 1
- अभासे – 1
मुंबई महापालिकेतील चित्र
मुंबई महापालिकेत भाजप शिवसेनेसोबत सत्तेत थेट सहभागी नाही. मात्र, भाजपला 2014 मध्ये राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा दिल्याने भाजपने बीएमसीत महापौर पदावर दावा केला नव्हता. शिवसेनेला मुंबई महापौरपदावर दावा करण्यासाठी बहुमताचा जादुई आकडा 113 होता. त्यासाठी भाजपनं शिवसेनेला मदत केली होती. मात्र, देशाची आर्थिक राजधानी असलेलं मुंबई महापौरपद कायम ठेवण्यासाठी शिवसेनेला भाजपने आव्हान दिल्यास इतर पक्षांची मदत घ्यावी लागणार होती. मात्र आता भाजपने उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे.
संबंधित बातम्या
मुंबईच्या महापौरपदासाठी शिवसेनेकडून किशोरी पेडणेकर यांची निवड निश्चित
एकही मोठं पद नाही, नगरसेविका ते थेट महापौर, किशोरी पेडणेकरांचा प्रवास