पोलीस दलातली मुख्यमंत्र्यांची मोठी बहीण मुंबईची आयुक्त होणार?
मुंबई : राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यास केंद्र सरकारने नाकारल्यानंतर आता त्यांच्या जागी मुंबईचे पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तांचा शोध सुरू आहे. राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस महासंचालक संजय बर्वे, कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त महासंचालक परमबीर सिंग या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव […]
मुंबई : राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यास केंद्र सरकारने नाकारल्यानंतर आता त्यांच्या जागी मुंबईचे पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तांचा शोध सुरू आहे. राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस महासंचालक संजय बर्वे, कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त महासंचालक परमबीर सिंग या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव चर्चेत होती. मात्र, आता राज्याच्या गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांचं नावही चर्चेत आहे. रश्मी शुक्ला या पोलीस दलात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी बहीण म्हणून ओळखल्या जातात.
पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांची पोलीस महासंचालक पदावर नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या जागी सुबोध जयस्वाल यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर पडसलगीकर हे 31 ऑगस्ट 2018 रोजी निवृत्त होणार होते. मात्र, त्यांना सुरुवातीला तीन महिने मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर पुन्हा तीन महिन्याची मुदतवाढ देण्यात आली. या दरम्यान, त्यांना देण्यात आलेल्या मुदतवाढी विरोधात आर. आर. त्रिपाठी यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. त्यावेळी राज्य सरकारने आम्ही पोलीस महासंचालक यांना पूर्ण कालावधी मिळावा म्हणून दोन वर्षे कालावधी देणार असल्याचं प्रतिज्ञापत्र दिल होतं. मात्र, केंद्र सरकारने पडसलगीकर यांना पुन्हा मुदतवाढ देण्यास काही दिवसांपूर्वी नकार दिला. यामुळे पडसलगीकर यांना 28 फेब्रुवारी रोजी निवृत्त व्हावं लागणार आहे.
पडसलगीकर यांच्यानंतर सेवा ज्येष्ठतेत दुसऱ्या क्रमांकावर असलेले सुबोध जयस्वाल यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती होणार आहे. मात्र, पोलीस आयुक्तीपदी कोणाची नियुक्ती होणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालक संजय बर्वे आणि कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक यांची नावं चर्चेत आहेत. मात्र,या नावात आता आणखी एका नावाची भर पडली आहे.
सेवा ज्येष्ठतेनुसार पडसलगीकर यांच्या निवृत्तीनंतर जयस्वाल यांचा क्रमांक लागतो. तर त्यांच्यानंतर दोन नंबरवर असलेले होमगार्डचे पोलीस महासंचालक संजय पांडे हे दुसऱ्या क्रमांकावर येतील. तेही पोलीस महासंचालकपदाचे दावेदार होऊ शकतात. पण त्यांची नियुक्ती होणार नसल्याचं बोललं जातंय. पांडे यांच्यानंतर क्रमवारीत असलेले संजय बर्वे आणि परमबीर सिंग यांच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र, आता रश्मी शुक्ला यांचंही नाव स्पर्धेत आहे.
रश्मी शुक्ला या सध्या गुप्त वार्ता विभागात आयुक्त आहेत. हे पद अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाचं आहे. तर मुंबईचं पोलीस आयुक्त पद हे पोलीस महासंचालक दर्जाचं आहे. पोलीस आयुक्तीपदी पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करायची झाल्यास संजय पांडे किंवा संजय बर्वे यांची नियुक्ती करावी लागेल आणि परमबीर सिंग अथवा रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करायची झाल्यास पोलीस आयुक्तपद हे अतिरिक्त महासंचालक दर्जाचं करावं लागेल. सरकार असं आपल्या सोईसाठी करत असतं. यापूर्वीही अनेकदा तसं केलं आहे.