Uddhav Thackeray | स्वत:च्या जीवाची पर्वा न करता लोकांसाठी काम करतो तो शिवसैनिक : उद्धव ठाकरे

एकता मंच तसेच 'चैतन्य ओंकार ट्रस्ट' यांच्या सहकार्याने 13 रुग्णवाहिकांचे, तर जाणीव ट्रस्ट तर्फे 12 रुग्णवाहिकांचे लोकार्पण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

Uddhav Thackeray | स्वत:च्या जीवाची पर्वा न करता लोकांसाठी काम करतो तो शिवसैनिक : उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Jul 25, 2020 | 9:40 PM

मुंबई : ‘कोव्हिड-19’च्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतःचा (CM Uddhav Thackeray Inaugurate Ambulance) वाढदिवस सामाजिक उपक्रमांसह साजरा करण्याचे आवाहन केले. याला प्रतिसाद देत परिवहनमंत्री अनिल परब आणि खासदार अरविंद सावंत यांनी आज मुंबईतील शिवसेनेच्या विभागांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिल्या. एकता मंच तसेच ‘चैतन्य ओंकार ट्रस्ट’ यांच्या सहकार्याने 13 रुग्णवाहिकांचे, तर जाणीव ट्रस्ट तर्फे 12 रुग्णवाहिकांचे लोकार्पण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले (CM Uddhav Thackeray Inaugurate Ambulance).

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

शिवसैनिकांची ओळख म्हणजे कुठल्याही संकटाला झोकून जायचं – मुख्यमंत्री

“शिवसैनिकांची ओळख म्हणजे कुठल्याही संकटाला झोकून जायचं आणि रुग्णवाहिका सेवा देणं हे शिवसेनेचं काम आहे. या रुग्णवाहिका अत्याधुनिक आहेत. या रुग्णवाहिकेत कोव्हिड-19 रुग्ण नेत असला, तरी त्यातून कोव्हिड-19 होणार नाही अशी काळजी घेतली गेली”, असं मुख्यमंत्री म्हणाले.

“बऱ्याच दिवसानंतर तोंडावरचा मास्क काढून बोलत आहे, बरं वाटतंय”, असं उद्धव ठाकरे म्हणाले. “स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लोकांसाठी काम करतो, तो शिवसैनिक. रुग्णवाहिकेने मदत ही शिवसेनेची ओळख. ज्या परिस्थितीतून जातोय त्याचा अभ्यास करुन या रुग्णवाहिका बनवल्या आहेत”, अशी माहितीही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.

राज्यासह मुंबईत झालेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णवाहिकांची लागणारी गरज ओळखत आज त्या उपलब्ध करुन देण्यात आल्या. कोरोनासारख्या आजारात शरीरातील ऑक्सिजनची मात्रा कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळेच या सर्व रुग्णवाहिका ऑक्सिजन सुविधेने सुसज्ज असून यात नवीन तंत्रज्ञानच्या स्ट्रेचरचा वापर करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली (CM Uddhav Thackeray Inaugurate Ambulance).

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील कौतुक करताना सांगितले, की शिवसेनेच्या पिढ्यांप्रमाणेच रुग्णवाहिका देखील अद्ययावत झाल्या आहेत. रुग्णवाहिका आणि शिवसेना हे नाते जुने असल्याचे ते म्हणाले.

गुगलसोबत शिक्षणाची सुरुवात करणारं महाराष्ट्र पहिलं राज्य – मुख्यमंत्री

“गुगलबरोबर शिक्षणाची सुरुवात केली आहे, असं करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे”, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

“सगळेसोबत असताना वाट खडतर असली तरी ती जाणवणार नाही, आपण किती ही संकट आली तरी थांबणार नाही. लोकांना वाचवलं पाहिजे, ते वाचले पाहिजे, पण यात आपण काही शिवसैनिक गमावले. त्यामुळे सर्व शिवसैनिकांनी काळजी घ्यावी”, असं आवाहन यावेळी उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना केलं.

CM Uddhav Thackeray Inaugurate Ambulance

संबंधित बातम्या :

सरकार आतलेच लोक पाडतात, बाहेरचे नाही : सुधीर मुनगंटीवार

मर्दानी आजीला 1 लाख आणि साडीचोळी, गृहमंत्री अनिल देशमुख थेट दारात

Chandrakant Patil | अजित पवार हेडमास्तर, उद्धव ठाकरेंनी त्यांच्याकडून काहीतरी शिकावं : चंद्रकांत पाटील

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.