30 एप्रिलनंतर लॉकडाऊन संपणार का? मुख्यमंत्री म्हणतात…

30 एप्रिलनंतर तरीही हा लॉकडाऊन संपणार का? असा प्रश्न अनेकजण न उपस्थित करत आहे. या प्रश्नाचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं.

30 एप्रिलनंतर लॉकडाऊन संपणार का? मुख्यमंत्री म्हणतात...
Follow us
| Updated on: Apr 11, 2020 | 6:07 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगनंतर महाराष्ट्रातील जनतेशी (CM Uddhav Thackeray Maharashtra lockdown Extension) संवाद साधला. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी राज्याला संबोधित केलं. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील लॉकडाऊन 14 एप्रिलनंतरही कायम ठेवणार असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन कायम असणार आहे.

मात्र 30 एप्रिलनंतर तरीही हा लॉकडाऊन संपणार का? असा प्रश्न अनेकजण न उपस्थित करत आहे. या प्रश्नाचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं. “हे किती दिवस चालणार असं अनेकजण विचारतात, तर मी त्यांना सांगेन की जितकी आपण शिस्त पाळाल, तितका तो लवकर संपेल. 30 एप्रिलपर्यंत हा लॉकडाऊन राहणार आहे. त्यादरम्यानच्या काळात काय नियोजन आहे आणि काय करायचं आहे या सुचना देण्यासाठी मी पुन्हा तुमच्याशी बोलेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. 

मुंबई, पुण्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढते आहे. त्यामुळे हे करणं आवश्यक आहे. महाराष्ट्र नेहमीच देशाला आणि जगाला दिशा दाखवत आला आहे. या कोरोनाच्या स्थितीत देखील आपण देशाला आणि जगाला दिशा दाखवणार आहोत, असेही उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

आपण कोरोना संसर्गाचा वेग मंद राखण्यात यशस्वी झालो आहोत. मात्र, मला ही रुग्णांची संख्या शून्य करायची आहे. आता कोरोना रुग्णांची साखळी तोडण्याचा प्रयत्न करतो आहे. जगभरात यासाठी प्रयत्न केले जात आहे. पंतप्रधानांच्या बैठकीत मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला पहिल्यांदा बोलण्याची संधी दिली. त्यावेळी मी सर्व माहिती देताना शेवटी हेच सांगितलं आहे की देशात लॉकडाऊन वाढो अथवा नाही, पण मी महाराष्ट्रात 14 एप्रिलनंतर महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढवणार, असेही उद्धव ठाकरे म्हणाले

आजपर्यंत आपण जे धैर्य दाखवलं आणि आपल्या सरकारवर विश्वास दाखवला त्याबद्दल मी आभारी आहे. सर्व देशात वेगवेगळ्या पक्षांचे मुख्यमंत्री आहेत, मात्र ते एकत्र येऊन कोरोनाशी लढत आहेत. मोदीजी आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत आहे. यात राजकारण नको. राजकारण आपल्या पाचवीलाच पुजलं आहे, मात्र, यास्थितीत राजकारण नको. पक्षीय राजकारणाला येथे जागा नाही. यातून बाहेर पडून नक्कीच आपण जागतिक महासत्ता बनू शकतो, असेही उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले.

ज्याला ज्याला वर्क फ्रॉम करणं शक्य आहे त्याने त्याने वर्क फ्रॉम सुरु करा. आपल्याला 14 एप्रिलपासून किमान 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवावा लागणार आहे. किमान या शब्दावर मी मुद्दाम जोर देतो आहे. या काळात काही प्रमाणात निर्बंध करण्याबाबत सूचना दिल्या जातील. हा विचित्र व्हायरस आहे त्यामुळे तुम्ही शिस्त पाळा, असेही उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray Maharashtra lockdown Extension) म्हणाले.

संबंधित बातम्या : 

Maharashtra Extends Lockdown | 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवला, मुख्यमंत्र्यांच्या लाईव्ह प्रसारणातील 10 महत्त्वाचे मुद्दे

Maharashtra Lockdown | महाराष्ट्रात लॉकडाऊन 16 दिवसांनी वाढवला

Maharashtra extends lockdown : वाढवलेल्या लॉकडाऊनमधून कुणाकुणाला सूट?

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.