CM Uddhav Thackeray | भूमिपुत्रांनी पुढे या, आपला महाराष्ट्र आपल्या पायावर उभा करु – मुख्यमंत्री

लॉकडाऊनमुळे परराज्यातील मजूर त्यांच्या त्यांच्या गावी गेले आहेत. त्यामुळे ग्रीन झोनमध्ये मजूर कमी पडले तर तिथे मला भूमिपुत्रांची गरज आहे.

CM Uddhav Thackeray |  भूमिपुत्रांनी पुढे या, आपला महाराष्ट्र आपल्या पायावर उभा करु - मुख्यमंत्री
Follow us
| Updated on: May 18, 2020 | 9:50 PM

मुंबई : महाराष्ट्रातील लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्यात (CM Uddhav Thackeray On Lockdown-4.0) आला. आजपासून लॉकडाऊन 4 ची सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील ग्रीन झोनमधील तरुणांना कामासाठी पुढे येण्याचं आवाहन केलं. लॉकडाऊनमुळे परराज्यातील मजूर त्यांच्या त्यांच्या गावी गेले आहेत. त्यामुळे ग्रीन झोनमध्ये मजूर कमी पडले तर तिथे मला भूमिपुत्रांची गरज आहे. त्यामुळे महाराष्ट्राला पुन्हा एकदा उभं करण्यासाठी राज्यातील तरुणांनी स्वत: आत्मविश्वासाने पुढे यावं, असं मुख्यमंत्री म्हणाले (CM Uddhav Thackeray On Lockdown-4.0).

तसेच, मुंबई-पुण्याहून कोकणात जाणाऱ्या नागरिकांनी अधीर होऊ नये, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मुंबई-पुण्याहून कोकणात गेलेले नागरिक तेथे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे संसर्ग वाढण्याची भीती आहे. म्हणून नागरिकांनी थोडा धीर धरावा, सरकार तुम्हालाही घरी पाठवेल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

याशिवाय, यंदाचं शैक्षणिक वर्ष वाया जाऊ द्यायचं नाही, त्यामुळे हे कोरोनाचं संकट जून महिन्यापूर्वी संपवायचं आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले. तसेच, महाराष्ट्रातील जनतेने आतापर्यंत जसं सहकार्य केलं, तसं यापुढेही करतील, अशी आशा मुख्यमंत्र्यांनी वर्तवली आहे.

CM Uddhav Thackeray Live Updates 

  • आतापर्यंत जसं सहकार्य केलं तस यापुढेही कराल याची आशा बाळगतो – मुख्यमंत्री
  • आता आपल्याला जनजीवन पुन्हा सहजतेने जगायला सुरुवात करायची आहे, मात्र हे सुरळीत करायला अजून वेळ लागणार आहे – मुख्यमंत्री
  • हे संकट आपल्याला परतवून लावायचं आहे, जनजीवन आपण पूर्वपदावर आणायचं आहे, पण हे सुरळीत होण्यास वेळ लागेल, आपण जेवढी खबरदारी घेऊ तेवढं लवकर आपण या बंधनातून मुक्त होऊ – मुख्यमंत्री
  • आपल्याला हे जून महिन्यापूर्वी संपवायचं आहे, कारण नंतर शाळा कॉलेज सुरु होणार, अॅडमिशन करायचे आहेत, हे सर्व गरजेचे आहे – मुख्यमंत्री
  • शैक्षणिक वर्ष वाया जाऊ द्यायचं नाही, अॅडमिशन, निकाल आहेत, हे संकट आपल्याला पावसाळ्यापूर्वी संपवायचं आहे – मुख्यमंत्री
  • कोणतीही गोष्ट सुरु करण्यापूर्वी तुम्हाला कल्पना द्यायची असं ठरवलं आहे. कारण एकदा सुरु केलेली गोष्ट पुन्हा बंद करायचं नाही – मुख्यमंत्री
  • ग्रीन झोनमध्ये आपण दुकानं सुरु ठेवण्यास परवानगी दिली, यापुढे खबरदारी घेऊन ही दुकानं बंद करावी लागू नयेत, म्हणून काळजी घ्यावी – मुख्यमंत्री
  • जी शिस्त पाळली ती अजून जास्त हवी आहे, कडक पाळली पाहिजे, धार्मिक सण उत्सव साजरे करण्यास परवानगी नाही – मुख्यमंत्री
  • इतकी दिवस शिस्त पाळली, आता कडक शिस्त पाळा, कंटेन्मेंट झोनमध्ये लोक बाहेर पडत आहेत, पण बाहेर पडू नका, धार्मिक कार्यक्रमही आपण थांबवले आहेत – मुख्यमंत्री
  • घरात राहा सुरक्षित राहा हे आतापर्यंत पाळलं, यापुढे घराबाहेरही सावध राहा, हात सतत धुवत राहा, तोंडाला रुमाल, मास्क लावा, हात वारंवार चेहऱ्यावर फिरवू नका, हे आपल्याला पुढील काही महिने पाळावं लागेल – मुख्यमंत्री (CM Uddhav Thackeray On Lockdown-4.0)
  • घरात रहा सुरक्षित राहा सोबतच सावध राहा, हात सतत धुवत राहा, तोंडाला शक्यतो हात लावू नका – मुख्यमंत्री
  • परदेशातूनही लोक आपण आणत आहोत, मात्र विलगीकरण हे आवश्यक आहे, तुम्हाला काही लक्षण नसली तरी तुम्ही वाहक होऊ नका – मुख्यमंत्री
  • तुम्ही गावी जाण्याऐवजी धीर धरला तर सर्वांसाठी बरं होईल, काही ग्रीन झोनमध्ये मुंबई-पुण्यातून गेलेले लोक पॉझिटिव्ह आढळले, त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचाही तुम्ही विचार करा, थोडा धीर धरा – मुख्यमंत्री
  • कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांकडूनही विचारणा होत आहे, बाहेरच्यांना पाठवलं आम्हाला कधी पाठवणार? पण तुम्ही तर आमचे आहात, तुम्हालाही पोहोचवू, कृपा करुन तुम्ही चालत जाऊ नका – मुख्यमंत्री
  • मजूरांकडून तिकीट घेतलेले नाही, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून खर्च केला आहे. मुंबईत राहणारी पश्चिम महाराष्ट्र, कोकणातील लोकांनाही घरी पाठवणार, पण अस्वस्थ होऊ नका – मुख्यमंत्री
  • ज्या मजुरांना पाठवलं, त्या मजुरांकडून तिकीटाचे पैसे घेतले नाहीत, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पैसे दिले – मुख्यमंत्री
  • जे मजूर रस्त्याने चालत जात आहेत, त्यांनी कृपा करुन तो मार्ग पत्करु नये, तुमच्यासाठी रेल्वे, बसची सुविधा केली आहे, आहे तिथेच थांबा, तुम्हाला पूर्ण सुरक्षितपणे तुमच्या राज्यात पाठवू – मुख्यमंत्री
  • इतर राज्यातील मजूर रस्त्यात का चालताय, तुमच्यासाठी आधीच ट्रेनची सोय केली आहे, तुमच्या प्रत्येकासाठी बस, ट्रेनची सोय केली आहे, ते तुमची सोय करत आहेत – मुख्यमंत्री
  • मजुरांची आपण काळजी घेतली, 5-6 लाख मजुरांची जेवणा खाणाची सोय केली, त्यांना घरी जायचं होतं, त्यासाठी प्रयत्न केले, जवळपास 5 लाख मजुरांना त्यांच्या त्यांच्या राज्यात पाठवले – मुख्यमंत्री
  • मी जर समजा हा लॉकडाऊन उठवला तर इतर देशांसारखे महाराष्ट्राचे होईल – मुख्यमंत्री
  • मी महाराष्ट्रासाठी टीकेचा धनी होईन, मात्र मला जे योग्य वाटेल ते ते मी करणारच – मुख्यमंत्री
  • लॉकडाऊन जर उठवला तर इटली, ब्राझीलमध्ये जे काही होतंय ते इथे होईल, त्यामुळे लॉकडाऊन हटवणार नाही, माझ्यावर टीका झाली तर होऊदे, महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी टीका सहन करेन, रेड झोनमध्ये तूर्तास सूट नाही – मुख्यमंत्री
  • रुग्णवाहिका, व्हेंटिलेटर्स इतर आरोग्य सोयी सुविधा वाढवत आहे – मुख्यमंत्री
  • राज्यभर आरोग्य सुविधा वाढवत आहोत, शक्य ती सर्व पावलं उचलत आहोत – मुख्यमंत्री
  • आज मुंबईत आज १९ हजार रुग्ण पॉझिटिव्ह आहे, त्यातील ५ हजार रुग्ण बरे झाले आहेत, दुर्देवाने काहींचा मृत्यू झाला. याचा अर्थ वेळेत आलात तर बरे होता येते – मुख्यमंत्री
  • मुंबईत 19 हजार रुग्ण आहेत, मात्र त्यापैकी 5 हजार बरं होऊन घरी परतले आहेत, त्यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे – मुख्यमंत्री
  • डॉक्टर, नर्स, पोलिसांना त्या त्या वेळी विश्रांती देणे गरजेचे आहे, त्यामुळे मला कोव्हिड योद्ध्यांची गरज आहे, ज्यांना कुणाला मदतीला यायचं आहे त्यांचं स्वागत आहे – मुख्यमंत्री
  • मला अजूनही कोविड योद्धा हवे आहेत, पोलीस थकतात, आजारी पडतात, गडचिरोलीत नक्षलवाद्यांशी लढताना दोन पोलीस शहीद झालेत – मुख्यमंत्री
  • संकट आहे, काही ठिकाणी बेड मिळत नाही अशा तक्रारी आहेत, पण त्या सुद्धा दूर होतील, नवीन सुविधा करतोय, मला कोविड योद्धे डॉक्टरांची आणखी गरज आहे – मुख्यमंत्री
  • ऑक्सिजनची सुविधा असणाऱ्या बेडची सुविधा जास्तीत जास्त करत आहे, रुग्णालयाबाहेर जर इतरत्र सेंटर्समध्ये सोयी सुविधा दिल्या आहेत – मुख्यमंत्री
  • आयसीयू बेड वाढवत आहोत, इतरत्र कुठे नसेल तशी आरोग्य व्यवस्था उभी करायची आहे – मुख्यमंत्री
  • मुंबईत ठिकठिकाणी बीकेसी, गोरेगाव, वरळी, रेसकोर्ट, मुलुंड, ठाणे अशा ठिकाणी केवळ कोव्हिड सेंटर नसेल तर जम्बो फॅसिलिटीचा प्रयत्न करु, सर्वांना व्हेंटिलेटरची गरज नाही पण ऑक्सिजन लागतो, त्याची व्यवस्था करतोय – मुख्यमंत्री
  • मी माझा महाराष्ट्र पुन्हा उभा करणार, या निश्चियाने बाहेर पडा, ग्रीन झोनमध्ये मजूर कमी पडले तर तिथे मला भूमिपुत्रांची गरज आहे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  • कामगार परराज्यात गेले आहेत, आता भूमिपुत्रांना आवाहन आहे, जिथे जिथे ग्रीन झोनमध्ये, तिथे आत्मनिश्चयाने बाहेर पडा, महाराष्ट्राला वाचवण्याचा निर्धार करा – मुख्यमंत्री
  • आपल्यासमोर दोन मोठी आवाहन आहे, ग्रीन झोन कोरोना विरहित ठेवायचा आहे, या ठिकाणी कोरोना रुग्ण आढळला नाही. तर दुसरं रेड झोनला ग्रीन झोन करणे – मुख्यमंत्री
  • ग्रीन झोमध्ये एकही रुग्ण वाढू द्यायचा नाही आणि रेड झोन ग्रीनमध्ये आणायचा आहे – मुख्यमंत्री
  • महाराष्ट्रात ४० हजार एकर पेक्षा जास्त जमीन उद्योगांसाठी राखीव, जे लोक नवीन ग्रीन उद्योग सुरु करु इच्छित असतील, जे कोणतेही प्रदूषण करणार नाही, त्यांना कोणत्याही अटी नाही – मुख्यमंत्री
  • जगात पॉझचं बटण दाबलं आहे, आपल्याला भरारी घ्यायची आहे ती नक्की घेऊ – मुख्यमंत्री
  • आजपर्यंत आपण 50 हजार उद्योग सुरु करण्यास परवानगी दिली आहे, त्यामध्ये साधारण 5 लाख कामगार काम करत आहेत – मुख्यमंत्री
  • ग्रीनझोनमध्ये शिथीलता आणली आहे, ऑरेंजझोनमध्ये खबरदारी घेत आहोत, मात्र रेडझोनमध्ये नाहीच – मुख्यमंत्री
  • मुंबई, पुणे, नाशिक, मालेगाव, औरंगाबादमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. मात्र जर लॉकडाऊन केलं नसतं हे आकडे जास्त असते – मुख्यमंत्री
  • आपण मार्चमधून खबरदारी घेतली नसती तर रुग्णसंख्या किती वाढली असती आणि किती मृत्यू झाले असते, याचा विचार करुन अंगावर काटा येतो, लॉकडाऊनचा नक्कीच उपयोग झाला – मुख्यमंत्री
  • युद्ध शस्त्राने लढतात, पण या युद्धात शस्त्र नाही, सोशल डिस्टन्सिंग हेच शस्त्र, राज्यात रुग्णसंख्या वाढत आहे – मुख्यमंत्री
  • जेव्हा विशेषत: या युद्धात, आपल्याकडे याचे काहीही उत्तर नाही, फक्त अंतर ठेवणं एवढंच उत्तर आहे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाराष्ट्रातील लॉकडाऊनमध्ये 31 मेपर्यंत वाढ

महाराष्ट्रातील लॉकडाऊनमध्ये 31 मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. लॉकडाऊन भाग 3 च्या शेवटच्या दिवशी रविवारी  (17 मे) लॉकडाऊन 4 ची घोषणा करण्यात आली. त्यामुळे आता आणखी 14 दिवसांसाठी लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊनबाबत महाविकास आघाडीच्या मंत्र्यांची गुरुवारी बैठक पार पडली होती. या बैठकीत लॉकडाऊन वाढवण्याविषयी निर्णय झाल्याची माहिती आहे. ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील सवलती अधिक वाढण्याचे संकेत आहेत. तर रेड झोनमध्ये ‘कोरोना’बाबत अधिक काळजी घेतली जाणार आहे.

लॉकडाऊन वाढवताना राज्याचे आर्थिक चक्र सुरु राहण्याची काळजी राज्य सरकार घेणार आहे. यापूर्वी राज्यात काही अटी आणि नियमांसह उद्योगधंदे सुरु करण्यात आले आहेत. आणखी काही उद्योगधंदे सुरु करण्याबाबत सरकार आराखडा आखण्याची शक्यता आहे.

लॉकडाऊन कसा वाढत गेला?

  • पहिला लॉकडाऊन – 25 मार्च ते 14 एप्रिल (21 दिवस)
  • दुसरा लॉकडाऊन – 15 एप्रिल ते 3 मे (19 दिवस)
  • तिसरा लॉकडाऊन – 4 मे ते 17 मे (14 दिवस)
  • चौथा लॉकडाऊन – 18 मे ते 31 मे (14 दिवस)

CM Uddhav Thackeray On Lockdown-4.0

संबंधित बातम्या :

वाद कशाला, मोदींनी आधीच ‘त्या’ स्किमने 20 टन सोनं गोळा केलंय : पृथ्वीराज चव्हाण

केंद्राच्या दहा तुकड्या राज्यात दाखल, प्रत्येक तुकडीत 100 पोलीस : अनिल देशमुख

लॉकडाऊनमध्ये कोकणच्या पोरांची आयडिया, ग्राम पंचायतीचं टेंडर घेऊन 5 लाखाचं काम मिळवलं

Lockdown 4 | लॉकडाऊन 4 बाबत नियम काय असू शकतात? राजेश टोपे म्हणतात…..

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.