26/11 च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून आदरांजली

26/11 च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला आज 12 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांच्या पवित्र स्मृतीस आदरांजली वाहिली.

26/11 च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून आदरांजली
Follow us
| Updated on: Nov 26, 2020 | 11:39 AM

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी दहशतवाद्यांनी हल्ला (26/11 Mumbai terror attack) केला होता. पाकिस्तानातून आलेल्या 10 दहशतवाद्यांनी मुंबईतील ताज हॉटेलसह सहा ठिकाणी हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये 160 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याला आज 12 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांच्या पवित्र स्मृतीस आदरांजली वाहिली. (CM Uddhav Thackeray pays homage to martyrs of 26/11 Mumbai terror attack)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाने याबाबत ट्विट केले आहे. त्यामध्ये महटले आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज 26/11 च्या हल्ल्यात दहशतवाद्यांशी लढताना प्राणार्पण केलेल्या शहीद पोलिसांच्या पवित्र स्मृतीस मुंबई पोलिस आयुक्तालय येथे आदरांजली वाहिली. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, गृहमंत्री अनिल देशमुख, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह, पोलिस अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

दहशतवादाविरोधातील लढा तीव्र करण्याचा निर्धार करूया : शरद पवार

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार यांनी ट्विटरवरुन शहिदांना आदरांजली वाहिली आहे. शरद पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या पोलीस व सुरक्षा दलातील सर्व शहीदांना विनम्र आदरांजली. या हल्ल्यात आपल्या जवळच्या व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांप्रती आज संवेदना व्यक्त करताना दहशतवादाविरोधातील आपला लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार करूया.

दहा ठिकाणी दहशतवादी हल्ले

26 नोव्हेंबर 2008 च्या रात्री दहशतवाद्यांनी मुंबईत एकूण दहा ठिकाणी एकत्रित हल्ले चढविले. यामध्ये आठ हल्ले दक्षिण मुंबई येथी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, हॉटेल ताज महाल पॅलेस अँड टॉवर, हॉटेल ओबेरॉय ट्रायडेंट, लियोपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरीमन हाउस, मेट्रो सिनेमा, आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या परिसरात हल्ले झाले. या सर्व ठिकाणी दहशतवाद्यांनी लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला आणि हातबॉम्ब फेकले. याव्यतिरिक्त माझगांव डॉक येथे एक बॉम्बस्फोट व विलेपार्ले येथे एका टॅक्सी मध्ये स्फोट घडवून आणला होता.

हल्ले करणाऱ्या 10 पैकी 9 दहशतवाद्यांना मुंबई पोलीस आणि एनएसजीच्या कमांडोंनी कंठस्नान घातले तर अजमल आमीर कसाब हा दहशतवादी पोलिसांच्या तावडीत जिवंत सापडला. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सर्व हल्लेखोर पाकिस्तानी होते आणि या हल्ल्यांमागे लष्कर-ए-तोयबा या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा हात होता.

संबंधित बातम्या

मुंबईवरील 26 /11 दहशतवादी हल्ल्याची 12 वर्षे, पाकिस्तानची पोलखोल करणारे ‘सात मुद्दे’

मुंबई हल्ल्यामागचा सूत्रधार हाफिज सईदला 10 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा

(CM Uddhav Thackeray pays homage to martyrs of 26/11 Mumbai terror attack)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.