‘राज्य सांभाळता येत नसल्याने उद्धव ठाकरेंचा तोल सुटतोय; राज्यपालांशी अहंकाराने बोलणे शोभते का?’

कोरोनामुळे राज्यातील परिस्थिती हाताबाहेर गेल्याने उद्धव ठाकरे यांना सध्या प्रत्येक गोष्टीचा राग येत आहे. Kirit Somaiya take a dig on CM Uddhav Thackery

'राज्य सांभाळता येत नसल्याने उद्धव ठाकरेंचा तोल सुटतोय; राज्यपालांशी अहंकाराने बोलणे शोभते का?'
Follow us
| Updated on: Oct 13, 2020 | 1:03 PM

मुंबई: कोरोनामुळे राज्यातील सर्व परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. ही सर्व परिस्थिती हाताळताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा गोंधळ उडत आहे. त्यामुळे ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. परिणामी त्यांचा तोल जाऊ लागला आहे. मला त्यांच्याविषयी सहानुभूती वाटते, असे वक्तव्य भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली. (Kirit Somaiya take a dig on CM Uddhav Thackery )

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पाठवलेल्या चोख भाषेत प्रत्युत्तर दिले. माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, असे त्यांनी राज्यपालांना ठणकावून सांगितले. या मुद्द्यावरुनही किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी खूप मोठी तडजोड केली. अशातच कोरोनामुळे राज्यातील परिस्थिती हाताबाहेर गेल्याने उद्धव ठाकरे यांना सध्या प्रत्येक गोष्टीचा राग येत आहे. त्यामुळेच राज्यपालांच्या पत्राला उत्तर देताना त्यांचा तोल गेला. मला मुख्यमंत्र्यांविषयी सहानुभूती आहे. मात्र, राज्यपालांसारख्या वयस्कर व्यक्तीशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी अहंकारी भाषेचा वापर करणे, कितपत योग्य आहे, असा सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला.

माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, उद्धव ठाकरे राज्यपालांवर बरसले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील मंदिरे उघडण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले होते. यामध्ये त्यांनी राज्य सरकारच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली होती. या पत्राला मुख्यमंत्र्यांकडूनही चोख भाषेत प्रत्युत्तर देण्यात आले.

माझ्या हिंदुत्वाचा आपण जो उल्लेख केला, तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही. माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे, हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना लगावला.

संबंधित बातम्या:

माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, उद्धव ठाकरे राज्यपालांवर बरसले

LIVE: भाजप नेत्यांचा सिद्धिविनायक मंदिरात घुसण्याचा प्रयत्न; पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड

(Kirit Somaiya take a dig on CM Uddhav Thackery )

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.