Bigg Boss Controversy | बिग बॉस वादानंतर कलर्सची माघार, मुख्यमंत्र्यांना इंग्रजीत, राज ठाकरेंना मराठीत माफीनामा

कलर्स वाहिनीच्या बिग बॉस या रियालिटी शोमध्ये मराठी भाषा आणि महाराष्ट्राचा अपमान झाल्याप्रकरणी वायकॉम 18 ने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना माफीनामा सादर केलाय.

Bigg Boss Controversy | बिग बॉस वादानंतर कलर्सची माघार, मुख्यमंत्र्यांना इंग्रजीत, राज ठाकरेंना मराठीत माफीनामा
Follow us
| Updated on: Oct 28, 2020 | 10:37 PM

मुंबई : कलर्स वाहिनीच्या बिग बॉस या रियालिटी शोमध्ये मराठी भाषा आणि महाराष्ट्राचा अपमान झाल्याप्रकरणी वायकॉम 18 ने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना माफीनामा सादर केलाय. विशेष म्हणजे याआधी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील याबाबत माफीनामा दिला होता. मात्र, उद्धव ठाकरेंना दिलेला माफीनामा इंग्रजीत, तर राज ठाकरे यांना दिलेला माफीनामा मराठीत आहे (Colors Marathi Viacom18 apologies MNS Chief Raj Thackeray in Jan Kumar Sanu Bigg Boss Controversy ).

बिग बॉस शोमध्ये एका स्पर्धकाने मराठी भाषेचा अपमान केल्याप्रकरणी आज राज्यभरात तीव्र पडसाद उमटले होते. मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी 24 तासांच्या आत माफी मागण्याची मागणी केली होती. अन्यथा चित्रिकरण बंद पाडण्याची धमकी दिली होती. यानंतर कलर्स या मनोरंजन वाहिनीने माफीनामा दिलाय.

हेही वाचा : जान कुमार सानूला ‘बिग बॉस’मधून हाकला, अन्यथा कार्यक्रम चालू देणार नाही! : प्रताप सरनाईक

दरम्यान, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनीही कलर्स वाहिनीच्या अधिकाऱ्यांना मराठी भाषेचा अपमान करणाऱ्या स्पर्धकाची शोमधून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती. अन्यथा चित्रीकरण बंद पाडण्याचा इशारा दिला होता. यानंतर काही तासांपूर्वी कलर्स वाहिनीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील या प्रकरणी माफीनामा सादर केला आहे. मात्र मुख्यमंत्र्यांना सादर केलेला माफीनामा इंग्रजी भाषेत होता. मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या इंग्रजी भाषेतील पत्रात अपोलॉजी (Apology) हा शब्द वापरण्यात आला आहे.

कलर्स वाहिनीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीत माफी मागितली आहे. मराठीचा अवमान करणारे वक्तव्य वाहिनीच्या एका कार्यक्रमात व्यक्त झाले होते, याबद्दल आम्ही दिलगीरी व्यक्त करत आहोत, असे वाहिनीकडून म्हटले गेले आहे.

कलर्स टीव्हीचा माफीनामा!

या प्रकरणी माफी मागताना, कलर्स टीव्हीने यां पत्रात म्हटले की, ‘कलर्स वाहिनीवर 27 ऑक्टोबरला प्रसारित करण्यात आलेल्या एपिसोडमध्ये मराठी भाषेसंदर्भात आम्हाला अनेक तक्रारी मिळाल्या.

आम्ही या आक्षेपांची नोंद केली आहे आणि आम्ही ते ज्या ठिकाणी बोललं गेलं आहे तो भाग प्रसारित होणाऱ्या सर्व एपिसोड्समधून काढतो आहोत.

मराठी भाषेसंदर्भातील वक्तव्याने महाराष्ट्रातील जनतेची मनं दुखवली गेली, याबाबत आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आमच्यासाठी आमचे प्रेक्षक अमूल्य आहेत. शिवाय सगळ्या भाषा सन्मानीय आहेत.’(Jaan Kumar Sanu Controversy Colors TV apologies)

काय आहे प्रकरण?

‘बिग बॉस’च्या (Bigg Boss 14) खेळादरम्यान झालेल्या वादात जान कुमार सानूने निक्की तंबोलीशी बोलताना मराठी भाषेची चीड येत असल्याचे म्हटले होते. ‘बिग बॉस’च्या घरात मराठमोळा गायक राहुल वैद्य स्पर्धक म्हणून सामील झाला आहे. या कार्यक्रमात जान कुमार सानू आणि निक्की तंबोली यांच्या दरम्यान घनिष्ठ मैत्री दाखवण्यात आली होती. काही कारणाने या दोघांमध्ये बिनसल्याने निक्कीने जानची साथ सोडत, राहुल वैद्यचा हात धरला आहे. राहुलशी ती मराठीत संवाद साधण्याच्या प्रयत्न करताना दिसत असते. याच दरम्यान तिने जानशी देखील मराठीत बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जानने तिला माझ्याशी मराठीत बोलायचा प्रयत्न करू नको. बोलायचे असल्यास हिंदीत बोल. मला मराठी ऐकून चीड येते, असे तो म्हणाला होता.

संबंधित बातम्या :

Jaan Kumar Sanu Controversy | महाराष्ट्राच्या भावना दुखावल्याप्रकरणी माफी, कलर्स वाहिनीचा मुख्यमंत्र्यांकडे माफीनामा

Jaan Kumar Sanu Controversy | आता कुमार सानूची ‘जान’ वाचणं कठीण : शालिनी ठाकरे

Jaan Kumar Sanu | मराठीला विरोध; कोण आहे जान कुमार सानू?

Colors Marathi Viacom18 apologies MNS Chief Raj Thackeray in Jan Kumar Sanu Bigg Boss Controversy

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.