कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहाचे दफन की दहन? आयुक्तांचा निर्णय मलिकांनी मागे घ्यायला लावला

राज्यात कोरोनाचा विषाणूंचा कहर दिवसेंदिवस वाढत (Corona Dead bodies disposal) आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या मृतदेहांचे दहन करण्यात येणार आहे.

कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहाचे दफन की दहन? आयुक्तांचा निर्णय मलिकांनी मागे घ्यायला लावला
Follow us
| Updated on: Mar 30, 2020 | 11:24 PM

मुंबई : राज्यात कोरोनाचा विषाणूंचा कहर दिवसेंदिवस वाढत (Corona Dead bodies disposal) आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या मृतदेहांचे दहन करण्यात येणार आहे. हा व्यक्ती कोणत्याही धर्माचा असला तरी त्याचे दहन होणार आहे, असा निर्णय मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी घेतला आहे. कोरोनाग्रस्तांच्या अंत्यसंस्कारासाठी मुंबई महापालिकेने नियमावली केली आहे.

मात्र प्रवीण परदेशींच्या या निर्णयावर कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी आक्षेप घेतला आहे. “कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी पालिकेने परिपत्रक जारी केले होते. मात्र मी त्यांच्याशी याबाबत बोललो. त्यांना या गोष्टी लक्षात आणून दिल्या. त्यानंतर पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी हे परिपत्रक मागे घेतलं आहे,” अशी माहिती नवाब मलिक यांनी ट्विटद्वारे दिली.

मुंबई महापालिकेच्या पत्रानुसार, कोरोना व्हायरसमुळे (Corona Dead bodies disposal) मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह दहन करण्यात येणार आहे. या दरम्यान कोणत्याही व्यक्तीच्या धर्माचा विचार करण्यात येणार नाही. त्यामुळे मृतदेह दफन करता येणार नाही, असा उल्लेख या नियमावलीत केला आहे.

तसेच जर मृताच्या नातेवाईकाने मृतदेह दफन करण्याची मागणी केली तर त्याला मुंबईच्या बाहेर जाऊन मृतदेह दफन करावा लागेल.यावेळी कोविड -19 च्या सर्व नियमांचे पालन करावे लागेल. तसेच याविषयी मुंबई महापालिकेला सर्व लिहून द्यावं लागेल, असेही यात म्हटलंं आहे.

त्याशिवाय फक्त पाच जणांना अंत्ययात्रेत सहभागी होण्याची परवानगी दिली जाईल, असेही पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी म्हटलं आहे.

तसेच कोणत्याही कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृतदेह घरी घेऊन जाता येणार नाही. कोरोनाग्रस्त रुग्णांचा अंत्यसंस्कार रुग्णालयाजवळील स्मशानभूमीत करण्यात येईल. कोरोनाचा संसर्ग पसरु नये म्हणून त्या मृतदेहाला स्पर्श करण्यास मनाई करण्यात आली (Corona Dead bodies disposal) आहे.

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....