Shivsena Bhavan : ज्येष्ठ शिवसैनिकाला कोरोनाची लागण, शिवसेना भवनातील दैनंदिन व्यवहार काही दिवस बंद

शिवसेना भवनातील दैनंदिन व्यवहार काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार (Shivsena Bhavan close due to Corona) आहे.

Shivsena Bhavan : ज्येष्ठ शिवसैनिकाला कोरोनाची लागण, शिवसेना भवनातील दैनंदिन व्यवहार काही दिवस बंद
Follow us
| Updated on: Jun 23, 2020 | 9:17 AM

मुंबई : शिवसेना भवनातील दैनंदिन व्यवहार काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार (Shivsena Bhavan close due to Corona) आहे. शिवसेना भवनात नियमित येणाऱ्या एका ज्येष्ठ शिवसैनिकाला कोरोनाची लागण झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाची लागण झालेला शिवसैनिक पक्षाच्या एका खासदाराचा निकटवर्तीय (Shivsena Bhavan close due to Corona) आहे.

कोरोनाची लागण झालेला शिवसैनिक नियमित शिवसेना भवनमध्ये येत असतो. शिवसैनिकाला कोरोनाची लागण झाल्यानंतर कालपासून निर्जंतुकीकरणासाठी पुढचे काही दिवस शिवसेना भवनातील दैनंदिन व्यवहार बंद ठेवण्यात आले आहे.

नेते-पदाधिकारी-कार्यकर्त्यांना काही दिवस शिवसेना भवनात न येण्याच्या सूचनाही पक्षाकडून देण्यात आल्या आहेत.

नुकतेच शिवसेना भवनमध्ये पक्षाचा 54 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला होता. यावेळी पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक नेते आणि पदाधिकारीही उपस्थित होते.

दरम्यान, आतापर्यंत शिवसेनेतील अनेक नगरसेवकांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. आता तर थेट शिवसेना भवनमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने आतमध्य़े काम करणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे.

संबंधित बातम्या :

Maharashtra Corona Update | दिवसभरात 1,962 रुग्ण कोरोनामुक्त, बाधितांचा आकडा 1 लाख 35 हजार 796 वर

मिरा भाईंदरमध्ये शिवसेना नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू

45 खोल्यांचे अलिशान हॉटेल कोरोनाशी लढा देणाऱ्यांना खुलं, सोलापूरच्या शिवसेना नगरसेवकाची दानत

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.