ऑक्सिजनअभावी नातेवाईकाला गमावलं, मित्राकडून गरजूंना मोफत ऑक्सिजन सिलेंडर, कारही विकली

अब्बास रिज़वी आणि  शाहनवाज शेख या दोघांनी गरजूंना ऑक्सिजन मिळावं यासाठी ऑक्सिजन सिलेंडर देण्यास सुरुवात (Provide Free Oxygen cylinder) केली.

ऑक्सिजनअभावी नातेवाईकाला गमावलं, मित्राकडून गरजूंना मोफत ऑक्सिजन सिलेंडर, कारही विकली
Follow us
| Updated on: Jun 21, 2020 | 7:06 PM

मुंबई : मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात बेड्स मिळणे कठीण झाले आहे. मुंबईतील एका रुग्णालयात ऑक्सिजनच्या अभावी कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर त्या मृत व्यक्तीच्या नातेवाईकाने स्वत: ची गाडी विकून मोफत ऑक्सिजनचे सिलेंडर वाटत गरजूंना मदत केली. (Mumbai Corona Patient relatives Provide Free Oxygen cylinder)

काही दिवसांपूर्वी मुंबईच्या मालाड भागातील मालवणीमध्ये राहणाऱ्या अब्बास यांच्या नातेवाईकाला कोरोनाची लागण झाली होती. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांना वेळीच ऑक्सिजन न मिळाल्याने त्या नातेवाईकाचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर अब्बास यांना मोठा धक्का बसला. अब्बास रिज़वी आणि  शाहनवाज शेख या दोघांनी गरजूंना ऑक्सिजन मिळावं यासाठी ऑक्सिजन सिलेंडर देण्यास सुरुवात केली. ऑक्सिजन विकत घेण्यासाठी त्यांनी स्वत: ची गाडी विकली.

“माझ्या एका जवळच्या नातेवाईकाचा ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्यू झाला. त्याच वेळी मी गरजूंना ऑक्सिजन सिलेंडर मोफत देण्याचा निश्चय केला. जेणेकरुन कोणत्याही व्यक्तीची ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्यू होऊ नये,” असे अब्बास म्हणाले.

मुंबईत कोणत्याही कोरोनाबाधित रुग्णाला ऑक्सिजन मिळत नसेल तर त्यांना आम्ही मोफत ऑक्सिजन देतात, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे सध्या मुंबईकरांसाठी शाहनवाज शेख आणि अब्बास रिज़वी हे दोन तरुण देवदूत बनले आहेत.

कोरोना रुग्णांना 24 तास ऑक्सिजनची गरज असते. ज्या रुग्णांना बेड्स उपलब्ध होत नाही, त्यांना घरीच ऑक्सिजन सिलेंडर मोफत सोय करुन देतात. त्यामुळे रुग्णांचा जीव वाचतो.

हे दोघंही युनिटी अँड डिग्निटी नावाचं NGO चालवतात. याद्वारे ते हे काम करतात. त्यांनी आतापर्यंत 300 रुग्णांना ऑक्सिजन सिलेंडर दिला आहे. तसेच जर कोणालाही ऑक्सिजन सिलेंडरची आवश्यकता असेल तर 9892012132 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. (Mumbai Corona Patient relatives Provide Free Oxygen cylinder)

संबंधित बातम्या :

आता ‘आशा’ फक्त मनसेकडूनच! विविध मागण्यांसाठी आशा कर्मचाऱ्यांचं अमित ठाकरेंना निवेदन

सलूनवाला कोव्हिड योद्धा, ड्युटीवरील पोलीस, डॉक्टरांचे केस कटिंग करुन सेवा

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.