कोरोना लढ्यासाठी टास्क फोर्स, डॉ. संजय ओक यांची अध्यक्षपदी नियुक्ती
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील तज्ज्ञ डॉक्टरांच्या टास्क फोर्सची निर्मिती केली (Corona Virus Maharashtra Specialist Doctors Task Force) आहे.
मुंबई : महाराष्ट्रात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला (Corona Virus Maharashtra Specialist Doctors Task Force) आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील तज्ज्ञ डॉक्टरांच्या टास्क फोर्सची निर्मिती केली आहे. या कोविड 19 च्या टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी डॉ. संजय ओक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ. संजय ओक हे आरोग्य तज्ज्ञ आहेत. त्यांनी आज केईएम रुग्णालयात पदभार (Corona Virus Maharashtra Specialist Doctors Task Force) स्विकारला. ते केईएम रुग्णालयाचे माजी डीनही होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांच्या पातळीवर मुंबईतील नामवंत आणि तज्ज्ञ डॉक्टरांना टास्क फोर्स तयार केला आहे. यातील डॉक्टर हे राज्यातील कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
A Task Force of Specialist Doctors to suggest measures to minimise the death rate, for clinical management & treatment of critically ill COVID-19 patients particularly in specialised designated Hospitals has been constituted by the State Government.#WarAgainstVirus pic.twitter.com/QYrDrkQGUq
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 13, 2020
या टास्क फोर्समध्ये डॉ. संजय ओक, कुलगुरू, डॉ. डी वाय पाटील विद्यापीठ, डॉ. झहीर उडवाडिया, हिंदुजा रुग्णालय, डॉ. नागांवकर, लिलावती रुग्णालय, डॉ . केदार तोरस्कर , वोक्हार्ट रुग्णालय, डॉ . राहुल पंडित, फोर्टीस रुग्णालय, डॉ. एन. डी. कर्णिक, सायन रुग्णालय, डॉ . झहिर विरानी, पी.ए.के. रुग्णालय, डॉ . प्रविण बांगर, केईएम रुग्णालय, डॉ . ओम श्रीवास्तव, कस्तुरबा रुग्णालय या नऊ डॉक्टरांचा समावेश आहे.
या टास्क फोर्समधील डॉक्टरांशी मुख्यमंत्र्यांनी काल (13 एप्रिल) संवाद साधला. या टास्क फोर्सचे कामाबाबतच्या सूचना ऐकून त्याप्रमाणे कार्यवाहीचे प्रशासनाला निर्देश दिले. ही टीम राज्य शासनाला वैद्यकीय उपचारांबाबतही योग्य ते मार्गदर्शन करेल.
विशेष म्हणजे हे टास्क फोर्स एखादं ठराविक कोविड रुग्णालय सुरु करणे, या रुग्णालयातील वैद्यकीय व्यवस्था, प्रत्येक रुग्णाला तो कोविडग्रस्त समजून उपचार सुरु करणे, चांगल्या सुसज्ज रुग्णवाहिका, आयसीयूतील उपचार यावरही ही टीम देखरेख ठेवणार (Corona Virus Maharashtra Specialist Doctors Task Force) आहे.
कोण आहेत डॉ. संजय ओक?
- डॉ. संजय ओक हे मुंबईसह महाराष्ट्रातील तसेच भारतातील वैद्यकीय क्षेत्रातील एक अग्रगण्य व्यक्ती आहेत.
- ते उत्तम सर्जन, शल्यचिकित्सक, प्रशासक आणि धोरणात्मक सल्लागार आहेत.
- संजय ओक हे आरोग्य तज्ज्ञ आहेत.
- त्यांनी केईएम रुग्णालयाचे माजी डीन म्हणूनही काम पाहिलं आहे.
- संजय ओक यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1959 साली झाला.
अर्थव्यवस्थेसाठी अकरा तज्ञ सदस्यांची समिती
तर दुसरीकडे कोरोनामुळे ठप्प झालेल्या अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी अकरा तज्ज्ञ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.
यात श्री. जे. एस. सहानी (सेवानिवृत्त आयएएस), सुबोधकुमार (सेवानिवृत्त आयएएस), रमानाथ झा (सेवानिवृत्त आयएएस), उमेशचंद्र सरंगी (सेवानिवृत्त आयएएस), जयंत कावळे (सेवानिवृत्त आयएएस), सुधीर श्रीवास्तव (सेवानिवृत्त आयएएस), नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव, उद्योग विभागाचे प्रधान सचिव, वित्तीय सुधारणा विभागाचे प्रधान सचिव आणि कृषी विभागाच्या सचिवांचा समावेश आहे. वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव हे या समितीचे समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत.
ही समिती कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्याची अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित करणे. तसेच राज्याला पुन्हा आर्थिक सुस्थितीत आणण्याच्या दृष्टीने ही समिती उपाययोजना सूचवेल.