Corona Death | मुंबई आणखी एका महिलेचा मृत्यू, कोरोनाबाधित मृतांची संख्या 5 वर
महाराष्ट्रातील कोरोनाचा विळखा वाढताना दिसत आहे. कारण महाराष्ट्रात पाचव्या कोरोनाबाधिताचा (Maharashtra corona death toll increase) मृत्यू झाला आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील कोरोनाचा विळखा वाढताना दिसत आहे. एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या (Maharashtra corona death toll increase) वाढत असताना, दिवसेंदिवस मृतांची संख्याही वाढताना दिसत आहे. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात एका 63 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. या महिलेला कोरोनाची लागण झालील होती. तिच्यावर कस्तुरबा रुग्णलयात उपचार सुरु होते.
त्याआधी तिकडे नवी मुंबईतही एका 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याचं वृत्त आज सकाळीच समोर आलं होतं. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधित मृतांची संख्या 5 वर पोहोचली. (Maharashtra corona death toll increase) नवी मुंबईतील पीडित महिला वाशी इथली रहिवासी होती. तिच्यावर आधी खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यानंतर तिला कोरोनावरील उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
या महिलेमध्ये कोरोनाची लक्षणे दिसल्याने तिचे स्वॅब घेऊन ते तपासणीसामठी पाठवण्यात आले. या महिलेचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट २४ मार्चला आला होता. आज अखेर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या 125 वर
महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 125 वर पोहोचली आहे. मुंबई-ठाण्यात प्रत्येकी एका नव्या रुग्णाला ‘कोरोना’ची लागण झाली आहे. तर तिकडे नागपुरातही एक नवा रुग्ण आढळला आहे. काल दिवसभरात 15 नवे रुग्ण आढळल्यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या 122 वर गेली होती. (Maharashtra Corona Case Update)
सांगली जिल्ह्यात एकाच कुटुंबातील 9 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं काल समोर आलं होतं. या कुटुंबातील चौघांना आधीच कोरोना झाला होता. त्यानंतर कुटुंबातील आणखी पाच सदस्यांचे अहवालही पॉझिटिव्ह आले. मुंबईत आणखी 9 जणांना, तर ठाण्याच्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं.
पुण्याच्या नायडू रुग्णालयातून काल (बुधवार 25 मार्च) पाच रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
महाराष्ट्रात कुठे किती कोरोनाबाधित रुग्ण?
कोरोनाचे कुठे किती रुग्ण?
मुंबई – 51 पुणे – 19 पिंपरी चिंचवड – 12 सांगली – 9 कल्याण – 5 नवी मुंबई – 5 नागपूर – 4 यवतमाळ – 4 अहमदनगर – 3 ठाणे – 5 सातारा – 2 पनवेल – 1 उल्हासनगर – 1 वसई विरार – 1 औरंगाबाद – 1 सिंधुदुर्ग – 1 रत्नागिरी – 1
एकूण 125 (Maharashtra Corona Case Update)
महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?
पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च – कोरोनामुक्त पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) – 10 मार्च पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)– 10 मार्च पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)– 10 मार्च मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च नागपूर (1) – 12 मार्च पुणे (1) – 12 मार्च पुणे (3) – 12 मार्च ठाणे (1) – 12 मार्च मुंबई (1) – 12 मार्च नागपूर (2) – 13 मार्च पुणे (1) – 13 मार्च अहमदनगर (1) – 13 मार्च मुंबई (1) – 13 मार्च नागपूर (1) – 14 मार्च यवतमाळ (2) – 14 मार्च मुंबई (1) – 14 मार्च वाशी (1) – 14 मार्च पनवेल (1) – 14 मार्च कल्याण (1) – 14 मार्च पिंपरी चिंचवड (5) – 14 मार्च औरंगाबाद (1) – 15 मार्च पुणे (1) – 15 मार्च मुंबई (3) – 16 मार्च नवी मुंबई (1) – 16 मार्च यवतमाळ (1) – 16 मार्च नवी मुंबई (1) – 16 मार्च मुंबई (1) – 17 मार्च पिंपरी चिंचवड (1) – 17 मार्च पुणे (1) – 18 मार्च पिंपरी चिंचवड (1) – 18 मार्च मुंबई (1) – 18 मार्च रत्नागिरी (1) – 18 मार्च मुंबई (1) – 19 मार्च उल्हासनगर (1) – 19 मार्च अहमदनगर (1) – 19 मार्च मुंबई (2) – 20 मार्च पुणे (1) – 20 मार्च पिंपरी चिंचवड (1)- 20 मार्च पुणे (2) – 21 मार्च मुंबई (8) – 21 मार्च यवतमाळ (1) – 21 मार्च कल्याण (1) – 21 मार्च मुंबई (6) – 22 मार्च पुणे (4) – 22 मार्च मुंबई (14) – 23 मार्च पुणे (1) – 23 मार्च मुंबई (1) – 23 मार्च कल्याण (1) – 23 मार्च ठाणे (1) – 23 मार्च सातारा (2) – 23 मार्च सांगली (4) – 23 मार्च पुणे (3) – 24 मार्च अहमदनगर (1) – 24 मार्च सांगली (5) – 25 मार्च मुंबई (9) – 25 मार्च ठाणे (1) – 25 मार्च मुंबई (1) – 26 मार्च ठाणे (1) – 26 मार्च नागपूर (1) – 26 मार्च सिंधुदुर्ग (1) – 26 मार्च
एकूण – 125 कोरोनाबाधित रुग्ण
कोरोनामुळे आतापर्यंत भारतात कुठे किती मृत्यू?
कर्नाटक – 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 11 मार्च दिल्ली – 69 वर्षीय महिलेचा मृत्यू (1) – 13 मार्च मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 17 मार्च पंजाब – एका रुग्णाचा मृत्यू (1) – 19 मार्च मुंबई – 63 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1) – 22 मार्च पाटणा – 38 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1) – 22 मार्च गुजरात – 67 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 22 मार्च मुंबई – फिलिपाईन्सच्या 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 23 मार्च (कोरोना निगेटिव्ह, मृत्यूचं कारण अन्य) पश्चिम बंगाल – 55 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1) – 23 मार्च मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 23 मार्च
अन्य एकाचा मृत्यू -25 मार्च
मुंबई – वाशीतील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू – 26 मार्च
मुंबई – 63 वर्षीय महिलेचा कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू – 26 मार्च
गुजरात – दोघांचा मृत्यू – 26 मार्च
देशात मृत्यूचा आकडा : 16 महाराष्ट्रात मृत्यूचा आकडा : 4 देशात कोरानाबाधित रुग्ण : 687 राज्यात कोरोना बाधित रुग्ण : 126 जगात मृत्युचा आकडा : 21,191
जिल्हा | रुग्ण | बरे | मृत्यू |
---|---|---|---|
मुंबई | 343962 | 318995 | 11535 |
पुणे | 439562 | 405696 | 8144 |
ठाणे | 293052 | 274816 | 5873 |
पालघर | 49872 | 47852 | 939 |
रायगड | 72974 | 69761 | 1613 |
रत्नागिरी | 12336 | 11646 | 425 |
सिंधुदुर्ग | 6777 | 6359 | 180 |
सातारा | 60722 | 57120 | 1858 |
सांगली | 51829 | 49294 | 1800 |
नाशिक | 137449 | 128167 | 2093 |
अहमदनगर | 79880 | 76380 | 1171 |
धुळे | 18870 | 16902 | 337 |
जळगाव | 69604 | 63098 | 1542 |
नंदूरबार | 11448 | 10157 | 229 |
सोलापूर | 59754 | 56379 | 1859 |
कोल्हापूर | 50144 | 48056 | 1684 |
औरंगाबाद | 59429 | 50987 | 1289 |
जालना | 16713 | 15779 | 394 |
हिंगोली | 5342 | 4497 | 100 |
परभणी | 9332 | 7943 | 313 |
लातूर | 26927 | 25245 | 716 |
उस्मानाबाद | 18533 | 17413 | 576 |
बीड | 20796 | 18513 | 577 |
नांदेड | 26170 | 22710 | 692 |
अकोला | 20302 | 16111 | 404 |
अमरावती | 43318 | 38752 | 567 |
यवतमाळ | 21989 | 18875 | 497 |
बुलडाणा | 20865 | 17605 | 270 |
वाशिम | 11352 | 10120 | 169 |
नागपूर | 173547 | 152959 | 3584 |
वर्धा | 16143 | 14254 | 325 |
भंडारा | 14604 | 13711 | 315 |
गोंदिया | 14858 | 14440 | 175 |
चंद्रपूर | 25987 | 24485 | 422 |
गडचिरोली | 9325 | 8994 | 103 |
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु) | 146 | 0 | 91 |
एकूण | 2314413 | 2134072 | 52861 |
संबंधित बातम्या
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या 124 वर, मुंबई-ठाण्यात नवे रुग्ण
हुश्श! पुण्याच्या दाम्पत्यासोबत दुबईला गेलेले पिंपरी-चिंचवडचे तिघेही ‘कोरोना’मुक्त