Cabinet Meeting: बैठकीआधी ठाकरे-पवार भेट, मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतील अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले (Maharashtra Cabinet Meeting decisions).
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज (23 जुलै) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतील अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले (Maharashtra Cabinet Meeting decisions). यात निसर्ग चक्रीवादळाने कोकणात केलेल्या फळबागांच्या वाढीव मदतीपासून नांदेडच्या महापौर, उपमहापौर निवडणुकीपर्यंतच्या निर्णयांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या बैठकीआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली होती.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत निसर्ग चक्रीवादळाने उद्ध्वस्त झालेल्या सुपारी, नारळ या फळ झाडांना विशेष बाब म्हणून वाढीव दराने मदत देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. नांदेड महापौर, उपमहापौर निवडणूक आणखी 3 महिने पुढे ढकलण्याचाही निर्णय घेतला. तसेच पीक पाणी परिस्थितीविषयी देखील निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळाच्या या बैठकीत कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कालावधीला आणि लेखा परीक्षणास मुदतवाढ देण्यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील विविध कलमांमध्ये सुधारणा करण्यास देखील मान्यता देण्यात आली.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
#मंत्रिमंडळनिर्णय#COVID_19 च्या पार्श्वभूमीवर वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कालावधीस आणि लेखा परीक्षणास मुदतवाढ देण्यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील विविध कलमांत सुधारणा करण्यास मान्यता.
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 23, 2020
दरम्यान, अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी मदरशांमधील शिक्षकांच्या वेतनाबाबत निर्णय घेतल्याची माहिती दिली. ते म्हणाले, “डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेंतर्गत राज्यातील 121 मदरशांमधील शिक्षकांच्या वेतनासाठी 1 कोटी 80 लाख रुपयांचा निधी देणार आहोत. धार्मिक शिक्षण घेणाऱ्या मुलांना क्रमिक अभ्यासक्रम शिकण्यासह समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यास या योजनेतून प्रोत्साहन मिळेल.”
आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेले महत्त्वाचे निर्णय..@CMOMaharashtra @AjitPawarSpeaks #CabinetDecisions #Cabinetmeeting pic.twitter.com/S6LfbqhU9t
— NCP (@NCPspeaks) July 23, 2020
मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार भेट
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. दोघांमध्ये जवळपास अर्धातास चर्चा झाली. या बैठकीत राज्यातील पुढील निवडणुका एकत्र लढवण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कोकणातील शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये रायगडच्या पालकमंत्री पदावरुन मतभेद आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (23 जुलै) बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक येथे बैठक बोलावली. या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह कोकणातील शिवसेनेचे आमदार आणि खासदार उपस्थित होते. तर राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनील तटकरे, उद्योग आणि पर्यटन राज्यमंत्री आणि रायगडच्या पालकमंत्री मंत्री आदिती तटकरे उपस्थित होत्या.
या बैठकीत उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्याकडून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील मतभेद दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यापुढे आपल्याला महाविकास आघाडी म्हणून एकत्र राहायचं आहे. तसेच पुढील निवडणुकाही एकत्र लढवायच्या आहेत, असं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं, अशी माहिती सूत्रांनी दिली.
हेही वाचा :
विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा नको, अमित देशमुख यांच्या कुलगुरुंना सूचना
पहिली, दुसरी रोज 30 मिनिटं, तिसरी ते आठवी 45 मिनिटे 4 सत्रं, शाळांचं वेळापत्रक जाहीर
व्हिडीओ पाहा :
Maharashtra Cabinet Meeting decisions