फडणवीसांची विधाने बालबुद्धीला शोभणारी: पवारांचा हल्ला
मुंबई: बालकांनी काही विधानं केली तर ज्येष्ठांनी त्याकडे लक्ष देऊ नये. बालबुद्धीला शोभेल अशी विधानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. ते पुण्यात बोलत होते. देवेंद्र फडणवीस यांनी युतीला घाबरुन पवारांनी निवडणुकीतून माघार घेतल्याची टीका केली होती. त्याला शरद पवारांनी उत्तर दिलं. शरद पवार म्हणाले, “फडणवीस बालबुद्धीला […]
मुंबई: बालकांनी काही विधानं केली तर ज्येष्ठांनी त्याकडे लक्ष देऊ नये. बालबुद्धीला शोभेल अशी विधानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. ते पुण्यात बोलत होते.
देवेंद्र फडणवीस यांनी युतीला घाबरुन पवारांनी निवडणुकीतून माघार घेतल्याची टीका केली होती. त्याला शरद पवारांनी उत्तर दिलं.
शरद पवार म्हणाले, “फडणवीस बालबुद्धीला शोभेल अशी विधानं करत आहेत. बालकांनी काही विधानं केली तर ज्येष्ठांनी त्याकडे लक्ष देऊ नये. मी त्यांच्या पक्षातील नेत्याxविरोधात निवडणूक लढवल्या आहेत. त्यांची अनामत रक्कम जप्त झाली आहे, हे त्यांना कदाचित माहिती नसेल”
मुख्यमंत्री काय म्हणाले?
शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून माघार घेत असल्याची घोषणा 12 मार्चला केली. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा युतीचा पहिला विजय आहे, अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर आज युतीच्या पहिल्या पदाधिकारी मेळाव्यातही मुख्यमंत्र्यांनी पवारांवर निशाणा साधला. शिवसेना-भाजप ही युती फेव्हिकॉलच्या मजूबत जोडप्रमाणे आहे, युतीमुळे काही जणांनी माघार घेतली, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना टोला लगावला.
पवारांना भाजपमध्ये घेऊ नका – उद्धव ठाकरे
दरम्यान, याच पदाधिकारी मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख यांनीही पवारांवरुन भाजपवर निशाणा साधला. सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशावरुन उद्धव ठाकरे यांनी चिमटा काढला. “आता टीका करायची कोणावर हा प्रश्न आहे. कारण आज टीका करायची आणि उद्या तेच सेनेत नाहीतर भाजप मध्ये दिसायचे. पवारांवर टीका करायची की नाही हे कळत नाही, मात्र त्यांना भाजपमध्ये घेऊ नका”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
संबंधित बातम्या
सेना-भाजप फेव्हिकॉलचा जोड, युतीमुळे काहींची माघार : मुख्यमंत्री