धारावीत ‘कोरोना’चा विळखा घट्ट, 15 नवे रुग्ण, एकूण 43 कोरोनाग्रस्त
धारावीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे प्रत्येक नागरिकाची चाचणी घेण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे (Dharavi new Corona virus positive cases)
मुंबई : आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत ‘कोरोना’चा विळखा आणखी घट्ट होताना दिसत आहे. कोरोनाची लागण झालेले 15 नवे रुग्ण धारावीत सापडले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणांची झोप उडाली आहे. (Dharavi new Corona virus positive cases)
धारावीत सापडलेल्या एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 43 वर पोहोचली आहे. इथे आतापर्यंत चौघा जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. धारावीत काल सहा, तर शुक्रवारी 5 नवे रुग्ण आढळले होते. धारावीतील रुग्णांमध्ये दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये तब्लिगी जमातीच्या मरकजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या तब्लिगींचाही समावेश आहे.
धारावीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यामुळे धारावीतील प्रत्येक नागरिकाची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेच्या वतीने घेण्यात आला आहे. या मोहिमेअंतर्गत महापालिका तब्बल साडेसात लाख लोकांच्या चाचण्या घेणार आहेत.
हेही वाचा : कल्याणमध्ये सहा महिन्यांच्या बाळाची कोरोनावर मात, सोसायटीत टाळ्या,थाळ्या वाजवत जंगी स्वागत
महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. हा आकडा 1761 वर पोहोचला आहे. त्यापैकी सर्वाधिक कोरोना रुग्ण हे मुंबईत आहेत. एकट्या मुंबईतच कोरोनाचे 1146 रुग्ण आढळले आहेत, तर शहरातील 76 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
Maharashtra: 15 new #Coronavirus positive cases have been reported in Dharavi area of Mumbai. A total of 43 cases and 4 deaths have been reported here so far.
— ANI (@ANI) April 12, 2020
(Dharavi new Corona virus positive cases)