मुंबईत इलेक्ट्रॉनिक्स आणि हार्डवेअरची दुकानं उघडण्यास परवानगी, एका रस्त्यावर एकालाच मुभा
मुंबई महापालिका क्षेत्रातील इलेक्ट्रॉनिक्स आणि हार्डवेअरची दुकाने सुरु ठेवण्यास महापालिकेने परवानगी दिली (Electronic-Hardware Shop Open Mumbai) आहे.
मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 16 हजार 758 वर पोहोचली (Electronic-Hardware Shop Open Mumbai) आहे. तर मुंबईतही कोरोना रुग्णांचा आकडा आता 10 हजारांच्या पार गेला आहे. मुंबईत रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे फक्त अत्यावश्यक वस्तूंची दुकान सुरु राहतील. इतर कोणतीही दुकान सुरु ठेवण्यात येणार नाहीत, असे निर्देश दिले होते. मात्र यात बदल करुन मुंबई महापालिका क्षेत्रातील इलेक्ट्रॉनिक्स आणि हार्डवेअरची दुकाने सुरु ठेवण्यास महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी परवानगी दिली आहे.
सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे वैद्यकीय उपकरणांचा वापर वाढला आहे. मात्र काही वेळा जीवरक्षक वैद्यकीय उपकरणे, वैद्यकीय सुविधांसाठी आवश्यक आयटी सिस्टीम यांचा बिघाड होतो. त्यातच इलेक्ट्रीक आणि हार्डवेअरची दुकानं बंद असल्यानेही उपकरणं दुरुस्त करण्यास अडचणी येतात. या वस्तू तात्काळ दुरुस्ती करणे गरजे असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
या आदेशानुसार मुंबई महापालिका क्षेत्रातील प्रत्येक वॉर्डमध्ये एका रस्त्यावरील एकच इलेक्ट्रॉनिक्स आणि हार्डवेअरची दुकानं सुरु ठेवण्यात येणार आहे. प्रत्येक वॉर्डमधील सहाय्यक आयुक्तांना एका रस्त्यावरील एकच दुकान सुरु ठेवण्यास परवानगी देण्याचे आदेश दिले आहे.
मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा 10 हजार पार
राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 16 हजार 758 वर पोहोचली आहे. तर मुंबईतही कोरोना रुग्णांचा आकडा आता 10 हजारांच्या पार गेला आहे. मुंबईत काल (6 मे) 769 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा 10 हजार 714 वर पोहोचला आहे. तर 374 जण ठणठणीत बरे झाले आहेत.
तर दुसरीकडे गेल्या 24 तासात मुंबईत 25 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता मुंबईत कोरोनामुळे एकूण 412 जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत दारुची दुकानं बंद
लॉकडाऊनचे नियम शिथील करत अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी 4 मेपासून रेड झोनमधील कंटेनमेंट झोन वगळता इतर भागात दारुची दुकानं उघडण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, दारु घेण्यासाठी नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला. अखेर मुंबई महापालिकेने कडकडीत संचारबंदीचा निर्णय घेतल्यानंतर मुंबईतील दारुची दुकान बंद राहणार (Electronic-Hardware Shop Open Mumbai) आहेत.
संबंधित बातम्या :
Mumbai Corona | मुंबईत 24 तासात 25 कोरोनाबळी, रुग्णांचा आकडा 10 हजार 714 वर
मुंबईत काम करणाऱ्यांची प्रवेशबंदी रद्द, नोकरदारांची मुंबईत सोय होईपर्यंत निर्णय स्थगित