मुंबईत चित्रकार रामचंद्र कामत यांची आत्महत्या, बाथटबमध्ये मृतदेह सापडला
रामचंद्र कामत यांच्या घरी सुसाईड नोट सापडल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
मुंबई : प्रसिद्ध चित्रकार रामचंद्र उर्फ राम इंद्रनील कामत यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मुंबईतील माटुंगा भागात राहत्या घरी बाथटबमध्ये ते काल बेशुद्धावस्थेत आढळले होते. (Famous artist Ram Indranil Kamat committed suicide at his home in Matunga)
रामचंद्र कामत यांच्या घरी सुसाईड नोट सापडल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आपल्या मृत्यूसाठी कोणीही जबाबदार नसल्याचं त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. 41 वर्षीय रामचंद्र यांच्या अपघाती मृत्यूची नोंद पोलिसांनी केली आहे.
रामचंद्र कामत काल (बुधवारी) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास माटुंग्यातील राहत्या घरी बाथटबमध्ये बेशुद्धावस्थेत आढळले होते. उपचारासाठी त्यांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले.
रामचंद्र कामत चित्रकार आणि छायाचित्रकार म्हणून प्रसिद्ध होते. माटुंग्यात आपल्या आईसोबत ते राहत होते. रामचंद्र यांनी टोकाचे पाऊल उचलण्यामागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.
Famous artist Ram Indranil Kamat committed suicide at his home in Matunga on 19th August. A suicide note was also found. Matunga Police has registered ADR & investigation is going on: N Ambika, Spokesperson, Mumbai Police pic.twitter.com/hDjS4pATn1
— ANI (@ANI) August 20, 2020
कोणीही जबाबदार नसल्याचा उल्लेख सुसाईड नोटमध्ये असला तरी पोलिस आत्महत्येचं कारण शोधण्यासाठी कुटुंबीय आणि मित्रांचा जबाब नोंदवणार असल्याचं सांगितलं जात आहे.