कर्जमाफीचा लाभ मिळण्यात शेतकऱ्यांना अडचणी येऊ देऊ नका : मुख्यमंत्री

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील 21 लाख 82 हजार शेतकऱ्यांची दुसरी यादी आज सहकार विभागाने प्रसिद्ध केली.

कर्जमाफीचा लाभ मिळण्यात शेतकऱ्यांना अडचणी येऊ देऊ नका : मुख्यमंत्री
Follow us
| Updated on: Feb 29, 2020 | 8:21 PM

मुंबई : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती (Farmers Loan Waiver 2nd list) योजनेतील 21 लाख 82 हजार शेतकऱ्यांची दुसरी यादी आज सहकार विभागाने प्रसिद्ध केली. या यादीतील शेतकऱ्यांनाही व्यवस्थित लाभ मिळेल आणि त्यांच्या काही अडचणी असतील तर त्या तत्काळ सोडविण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. आतापर्यंत 1 लाख 25 हजार 449 शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण झाले असून उद्या रविवार (1 मार्च) सुट्टी असल्यामुळे सोमवारपासून (2 मार्च) त्यांच्या बँकेत पैसे जमा होतील, अशी माहिती सहकार प्रधान सचिव आभा शुक्ला यांनी दिली.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत पहिली प्रायोगिक (Farmers Loan Waiver 2nd list) तत्वावरील यादी 24 फेब्रुवारी रोजी लावण्यात आली होती. त्यात 658 गावांतील 15 हजार 358 कर्ज खाती जाहीर करण्यात आले होते. या दुसऱ्या यादीनंतर राज्यात आतापर्यंत 21 लाख 82 हजार खात्यांच्या याद्या गावनिहाय जाहीर करण्यात आल्या आहेत.

राज्यात 15 जिल्ह्यात पुर्णांशाने तर ग्रामपंचायत निवडणुकांची आचारसंहिता लागू असल्याने 13 जिल्ह्यात अंशतः याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

अशा रितीने महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 मधील अपेक्षित अशा 36 लाख 45 हजार कर्जखात्यांपैकी पोर्टलवर 34 लाख 98 हजार खात्यांची माहिती अपलोड करण्यात आली आहे. त्यापैकी गावनिहाय यादी प्रसिध्द केलेल्या खात्यांची संख्या 21 लाख 82 हजार इतकी आहे. शासनाने या खात्यांच्या कर्जमुक्तीसाठी 14 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहितेमुळे सहा जिल्ह्यातील गावांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या नसल्याचे सहकार विभागाने सांगितले आहे. या प्रमाणीकरणानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर व्यापारी बँका 24 तासांमध्ये तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका 72 (Farmers Loan Waiver 2nd list) तासांमध्ये रक्कम जमा करणार आहेत.

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 

1. एकूण अपेक्षित कर्जखती 36.45 लाख

2.पोर्टलवर अपलोड झालेल्या खात्यांची संख्या 34.98 लाख खाती

3. यादी प्रसिध्द केलेल्या खात्यांची GB संख्या 21.82 लाख खाती, त्यासाठी लागणारी रक्कम 14,000 कोटी रुपये

4. शासनाने यासाठी तरतूद केली आहे.

5. संपूर्ण यादी प्रसिध्द केलेल्या जिल्ह्याची संख्या 15

6. ग्रामपंचायत निवडणूक आचरसंहिता लागू असल्याने अंशतः यादी प्रसिध्द केलेल्या जिल्ह्याची संख्या 13

7. ग्रामपंचायत निवडणूक आचरसंहिता लागू असल्याने यादी प्रसिद्ध न केलेल्या जिल्ह्याची संख्या 6

8. आत्तापर्यंत प्रमाणीकरण झालेले कर्जखाती 72,947

9. प्रमाणीकरणनंतर व्यापारी बँका 24 तासांमध्ये आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका 72 तासांमध्ये संबंधित लाभार्थ्यांना त्यांच्या कर्ज खात्यावर लाभ देणार आहेत.

संबंधित बातम्या :

68 गावांतील 15 हजार शेतकरी, कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर

1 लाख 37 हजाराचं कर्ज, मात्र शेतकऱ्याच्या खात्यात 1 लाख 17 हजारच जमा

ना अट, ना कटकट, केवळ एक अंगठा आणि कर्जमाफी, शेतकऱ्यांचा मुख्यमंत्र्यांशी संवाद

15 एप्रिलआधी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आदेश

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.