Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Malls | मुंबईतील मॉल्सची झाडाझडती, 29 मॉल्सना कारवाईचा इशारा, वाचा संपूर्ण यादी

अग्निसुरक्षेसंदर्भातील नियम धाब्यावर बसवणाऱ्या मुंबईतील 29 मॉल्सना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

Mumbai Malls | मुंबईतील मॉल्सची झाडाझडती, 29 मॉल्सना कारवाईचा इशारा, वाचा संपूर्ण यादी
मुंबईतील मॉल्स पुन्हा बंद ! सरकारच्या या निर्णयामुळे मालकांवर नामुष्की
Follow us
| Updated on: Nov 19, 2020 | 7:06 PM

मुंबई : नागपाडा येथील सिटी सेंटर मॉलमध्ये लागलेल्या आगीनंतर (Mumbai Nagpada City Centre Mall Fire) मुंबईतील 75 मॉल्समधील आग प्रतिबंधक उपाययोजनांची माहिती घेण्यात आली. अनेक मॉलमध्ये आग प्रतिबंधक उपाययोजना कागदावर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नियम धाब्यावर बसवणाऱ्या 29 मॉल्सना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्रुटी दूर न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिल्याचे अग्निशमन दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. (Fire brigade sends show cause notice to 29 Malls in Mumbai for no fire prevention system)

नागपाडा येथील सिटी सेंटर मॉलमध्ये लागलेल्या आगीवर तब्बल 56 तासांनंतर नियंत्रण मिळवण्यात मुंबई अग्निशमन दलाला यश आले होते. या भीषण घटनेनंतर मुंबईतील मॉल्समधील अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वरळी येथील आर्केडीया मॉलमध्येही अनधिकृत बांधकाम झाल्याचा ठपका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी ठेवला होता.

स्थायी समितीच्या बैठकीत सिटी सेंटर मॉलमधील आगीचा भडका उडाला होता. स्थायी समितीत आगीचे पडसाद उमटल्यानंतर मुंबईतील मॉल्स पालिकेच्या रडारवर आले होते. मॉल्समधील अग्निसुरक्षेसह अन्य काही बेकायदा बांधकाम झाले आहे का, हे पाहण्याची मोहीम हाती घेतली.

कोणकोणत्या मॉल्सना नोटीस?

1) सीआर 2 मॉल, नरिमन पॉईंट 2) सिटी सेंटर मॉल नागपाडा 3) नक्षत्र मॉल दादर 4) डी. बी. मॉल जुहू 5) रिलायन्स रिटेल लि. सांताक्रुझ 6) मिलन मॉल सांताक्रुझ (प.) 7) केनी वर्थ शॉपिंग सेंटर खार 8) ग्लोबल प्रा. लि. वांद्रे 9) सुब्रिया मॉल वांद्रे 10) टिंथ सेंटर मॉल कांदिवली 11) गोकुळ शॉपिंग सेंटर बोरिवली 12) देवराज मॉल बिल्डिंग दहिसर 13) रिलायन्स मॉल बोरिवली 14) सेंटर प्लाझा मॉल मालाड 15) के. स्टार मॉल चेंबूर 16) ठाकूर मूव्ही अँड शॉपिंग सेंटर कांदिवली (Fire brigade sends show cause notice to 29 Malls in Mumbai for no fire prevention system) 17) अॅनेक्स मॉल कम थिएटर कांदिवली 18) क्युबिक मॉल चेंबूर 19) द मॉल मालाड 20) हायको मॉल बिल्डिंग पवई 21) ड्रीम मॉल भांडुप 22) विष्णू शिवम मॉल कांदिवली 23) साई कृपा मॉल दहिसर 24) इस्टन प्लाझा मॉल मालाड 25) हाय लाईफ प्रिमाईसीस सांताक्रुझ, 26) द झोन मॉल बोरिवली, 27) गारुर अँड वेल इंडिया लिमिटेड कांदिवली 28) गोकुळ शॉपिंग आर्किडीया बोरिवली 29) रिलायन्स मॉल वांद्रे

गेल्या दहा दिवसांत तब्बल 71 मॉल्सची पाहणी करण्यात आली. यापैकी 29 मॉल्समध्ये अग्निप्रतिबंधक उपाययोजनांसह काही त्रुटी आढळून आल्या. या 29 मॉल्सना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. एका महिन्याच्या आत त्रुटी दूर न केल्यास परवाना रद्द करण्यासह कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मॉलधारकांना दिल्याचे मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

संबंधित बातम्या :

मुंबईच्या नागपाड्यातील मॉलमध्ये भीषण आग

(Fire brigade sends show cause notice to 29 Malls in Mumbai for no fire prevention system)

कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका.
'बर्फाच्या लादीवर झोपवून मारू', एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरें टोला
'बर्फाच्या लादीवर झोपवून मारू', एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरें टोला.
.. तेव्हा माझा मोठा विजय होईल - करुणा शर्मा
.. तेव्हा माझा मोठा विजय होईल - करुणा शर्मा.
आधी मुंबईत किती मराठी आहेत ते पाहा, सदावर्तेंचा राज ठाकरेंना सल्ला
आधी मुंबईत किती मराठी आहेत ते पाहा, सदावर्तेंचा राज ठाकरेंना सल्ला.
लातूरच्या मनपा आयुक्तांनी स्वत:वरच झाडली गोळी
लातूरच्या मनपा आयुक्तांनी स्वत:वरच झाडली गोळी.
करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?
करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?.
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा.
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?.
'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप
'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप.
'हे लोकं दलाल जे मुंडेंना दारू अन् मुली पुरवतात', करूणा शर्मांचा आरोप
'हे लोकं दलाल जे मुंडेंना दारू अन् मुली पुरवतात', करूणा शर्मांचा आरोप.