दगडी चाळीत डॅडीची दानत, पॅरोलवर बाहेर आलेल्या अरुण गवळीची गरजूंना मदत

लॉकडाऊनच्या काळात विस्कळीत झालेल्या कुटुंबांच्या जीवनाला आधार देण्यासाठी अरुण गवळी आणि त्याची पत्नी आशा गवळी यांनी मदतीचा हात दिला. (Gangster Arun Gawli Help During Lockdown)

दगडी चाळीत डॅडीची दानत, पॅरोलवर बाहेर आलेल्या अरुण गवळीची गरजूंना मदत
Follow us
| Updated on: Apr 24, 2020 | 12:24 PM

मुंबई : पॅरोलवर बाहेर आलेला कुख्यात डॉन अरुण गवळी याने लॉकडाऊनच्या काळात गरजू कुटुंबाना मदतीचा हात दिला. मुंबईतील भायखळा परिसरात असलेल्या दगडी चाळीत अनेक कुटुंबांना त्याने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. (Gangster Arun Gawli Help During Lockdown)

‘कोरोना’ विषाणूच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य माणसांचं जगणं विस्कळीत झालं आहे. रोजंदारी करणारे चाळीतील रहिवाशी, भूमीहीन किंवा हातावर पोट असणारे गोरगरीब हतबल आहेत. अनेक जणांवर उपासमारीची वेळ आली आहे.

लॉकडाऊनच्या काळात विस्कळीत झालेल्या कुटुंबांच्या जीवनाला आधार देण्यासाठी अरुण गवळी आणि त्याची पत्नी आशा गवळी यांनी मदतीचा हात दिला. लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून त्याने मदत केली.

दगडी चाळ भागातील 60 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या गरीब आणि गरजू व्यक्तींना एक महिना पुरेल इतके जीवनावश्यक वस्तूंचे किट गवळी कुटुंबाने दिले. डॅडी आणि मम्मी अशा नावाने ओळखल्या जाणाऱ्या गवळी कुटुंबाच्या मदतीमुळे गरजू कुटुंबांना आधार मिळत असल्याचं इथले रहिवाशी सांगतात.

लॉकअपमधून बाहेर पडलेला अरुण गवळी लॉकडाऊनमध्ये घरी अडकला आहे. काही आठवड्यापूर्वी कॅरम खेळतानाचा त्याचा व्हिडीओ त्याची मुलगी योगिताचा पती आणि अभिनेता अक्षय वाघमारेने सोशल मीडियावर शेअर केला होता. (Gangster Arun Gawli Help During Lockdown)

View this post on Instagram

?? #stayhome #staysafe

A post shared by Akshay Waghmare (@akshayswaghmare) on

अरुण गवळीला पॅरोल

कुख्यात डॉन अरुण गवळीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 27 फेब्रुवारीला पॅरोल मंजूर केला आहे. अरुण गवळी नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. पत्नी आजारी असल्याच्या कारणास्तव गवळीने 30 दिवसांची पॅरोल रजा मागितली होती. नागपूर विभागीय आयुक्तांनी आधी अरुण गवळीचा पॅरोलचा अर्ज फेटाळला होता. त्यामुळे गवळीने उच्च न्यायालयात धाव घेतली. अखेर उच्च न्यायालयाने गवळीला दिलासा देत पॅरोल मंजूर केला.

अरुण गवळी शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. याआधी, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अरुण गवळीला 28 दिवसांची संचित रजा मंजूर केली होती. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांचा टप्पा पार पडल्यानंतर, म्हणजेच 30 एप्रिल 2019 रोजी गवळी पॅरोलवर मुंबईत आला होता.

(Gangster Arun Gawli Help During Lockdown)

दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.