Anant Chaturdashi 2020 | गणपती विसर्जनासाठी 445 ठिकाणी व्यवस्था, गर्दीवरील नियंत्रणासाठी मुंबई महापालिका सज्ज
यंदा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा होत असल्याने गणेश मुर्तींचे विसर्जन कमी प्रमाणात होण्याची शक्यता (Ganpati Visarjan Anant Chaturdashi Preparation) आहे.
मुंबई : गेल्या अकरा दिवसांपासून भक्तीभावे पुजा केल्यानंतर उद्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. दरवर्षी अनंत चतुर्दशीदिवशी मुंबईतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होती. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दीचे नियोजन करण्यासाठी मुंबई महापालिकेचे कसोटी लागणार आहे. गर्दीचे विभाजन व्हावे म्हणून पालिकेने 445 ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था केली आहे. (Ganpati Visarjan Anant Chaturdashi Preparation)
गेल्या वर्षी अनंत चतुर्दशीदिवशी 30 हजार 435 घरगुती गणेश मूर्ती, तर 7 हजार 700 सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. यंदा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा होत असल्याने गणेश मुर्तींचे विसर्जन कमी प्रमाणात केले जाण्याची शक्यता आहे.
मात्र तरीही विसर्जनासाठी होणारी गर्दी विभागली जावी यासाठी पालिकेने 445 ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था केली आहे. तसेच 23 हजार कर्मचारी, म्हणजेच दरवर्षीपेक्षा तिप्पट मनुष्यबळाची व्यवस्था केली आहे. यंदाच्या विसर्जनासाठी पालिकेने तिप्पट ते चौपट यंत्रणा तैनात ठेवली आहे.
दरवर्षी साडेसहा हजार कर्मचारी आणि 1400 अधिकारी या दिवशी कार्यरत असतात. या वर्षी ही संख्या तिप्पट करण्यात आली आहे. यंदा 10 हजार 503 कर्मचारी 3 हजार 969 अधिकारी असे एकूण 23 हजार 472 अधिकारी-कर्मचारी तैनात असणार आहेत.
त्याशिवाय अनेक नैसर्गिक विसर्जन स्थळांवर अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करून मूर्ती संकलनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
मुंबईत एकूण 70 नैसर्गिक विसर्जन स्थळे तयार करण्यात आली आहेत. तर महापालिकेच्या प्रत्येक विभागांतर्गत 7 ते 8 गणेशमूर्ती संकलन केंद्रे निर्माण करण्यात आली आहेत. तसेच कृत्रिम तलावांची संख्या 168 करण्यात आली आहेत. त्याशिवाय 170 मूर्ती संकलन केंद्रे, 37 फिरती विसर्जन स्थळे अशी एकूण 445 गणेश मूर्तींचे विसर्जन केंद्र तयार केली आहेत. (Ganpati Visarjan Anant Chaturdashi Preparation)
संबंधित बातम्या :
23 पारंपारिक, 135 कृत्रिम विसर्जन स्थळं, अनंत चतुर्दशीसाठी नवी मुंबई पालिकेची तयारी
प्रशासनाला साथ, औरंगाबादमध्ये 577 तर विरार परिसरात 181 मंडळांचा गणेशोत्सव रद्द