नवरदेव पीपीई किट घालून बोहल्यावर, नवरीच्या डोक्यावर प्लास्टिक हेल्मेट, अनोखा विवाह सोहळा
नालासोपाऱ्यात नवरदेवाने चक्क पीपीई किट घालून तर नवरीने मास्क आणि प्लास्टिक हेलमेट घालून साताजन्माच्या शपथा घेतल्या आहेत
नालासोपारा : वसई-विरार-नालासोपऱ्यात कोरोनाने (Groom Wear PPE Kit On Wedding) थैमान घातलं आहे. नालासोपारा पूर्व हे तर कोरोनाचं हॉटस्पॉट बनलं आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेकांचं ठरलेलं लग्न लांबणीवर गेलं आहे. अनेकांनी विवाहकार्य पुढे ढकलले आहेत. तर काहींनी अगदी कमी लोकांच्या उपस्थितीत विवाह उरकला. मात्र, नालासोपाऱ्यात एक अनोखा विवाह सोहळा पार पडला. नालासोपाऱ्यात नवरदेवाने चक्क पीपीई किट घालून तर नवरीने मास्क आणि प्लास्टिक हेल्मेट घालून साताजन्माच्या शपथा घेतल्या आहेत (Groom Wear PPE Kit On Wedding).
नालासोपारा पूर्वेकडील बिलालपाडा परिसरात राहणारे 27 वर्षीय संजय गुप्ता आणि 23 वर्षीय बबिता गुप्ता यांचा अनोखा विवाहसोहळा पार पडला.
संजय गुप्ता आणि बबिता गुप्ता या दोघांचे लग्न एप्रिल महिन्यात ठरले होते. मार्चमध्ये लॉकडाऊनची घोषणा झाली. मात्र, हे लॉकडाऊन लवकरच संपेल आणि आपला विवाह होईल, अशी आशा या दोघांनाही होती. पण, कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत गेला. अखेर याच परिस्थितीत लग्न करण्याचा निर्णय या दोघांनी घेतला. (Groom Wear PPE Kit On Wedding).
दोन्ही परिवाराच्या संमतीने त्यांनी घरातल्या घरात अगदी 20 ते 25 नातेवाईकांच्या उपस्थितीत विवाह करण्याच ठरवलं. नालासोपारा पूर्व बिलालपाडा परिसरात राहत्या घरातच 14 जून रोजी त्यांनी हा विवाह उरकला.
मात्र, यावेळी नवरदेवाने लग्नासाठी छान साजेसा पोशाख परिधान करण्याऐवजी चक्क पीपीई किट परिधान केलं. पीपीई किट घालूत तो बोहल्यावर चढला. सुरुवातीला सर्वांना हे अजब वाटलं. मात्र, नंतर सर्वांनी त्याच्या या निर्णयाचे कौतुक केले. अशा प्रकारे विवाह करत असताना सुरक्षित वावर आणि मास्क परिधान करत अगदी सरकारी नियम पाळूनच हा विवाह उरकल्याचं संजय गुप्ता यांनी सांगितलं.
कोरोनाच्या कालावधीत अनेकांनी काहीतरी वेगळं करत विवाह करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संजयचा हा अनोखा उप्रकम इतरांना प्रेरणा देणारा आहे. सध्या परिसरात पीपीई किट परिधान केलेल्या नवरदेवाची सर्वत्र जोरदार चर्चा (Groom Wear PPE Kit On Wedding) आहे.
हॉल-लॉनमध्ये नाही, घरीच लग्न लावा, तुकाराम मुढेंकडून ‘विवाहनियम’https://t.co/xPWqHPgoP3 #Nagpur
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 13, 2020
संबंधित बातम्या :
आता नागपुरातील लग्नात ‘बँडबाजा बारात’, बँडवाल्यांचं आर्थिक संकट पाहून पोलिसांचा निर्णय
बीडमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची लग्नात हजेरी, बीड ते हैदराबाद प्रवास, 49 जणांवर गुन्हा दाखल