राजकारण ते बॉलिवूड, अमित ठाकरेंच्या लग्नाला या दिग्गजांची हजेरी

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे यांचं रविवारी लग्न आहे. राज ठाकरेंचं निवासस्थान कृष्णकुंज या राहत्या घरी हळदीच्या कार्यक्रमाचं दुपारी आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ठाकरे कुटुंबीय आणि जवळचे नातेवाईक उपस्थित होते. स्वतः राज ठाकरेही हळदीमध्ये उपस्थित होते. अमितला हळद लागल्यानंतर राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे उष्टी हळद घेऊन आपली होणारी सून […]

राजकारण ते बॉलिवूड, अमित ठाकरेंच्या लग्नाला या दिग्गजांची हजेरी
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:34 PM

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे यांचं रविवारी लग्न आहे. राज ठाकरेंचं निवासस्थान कृष्णकुंज या राहत्या घरी हळदीच्या कार्यक्रमाचं दुपारी आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ठाकरे कुटुंबीय आणि जवळचे नातेवाईक उपस्थित होते. स्वतः राज ठाकरेही हळदीमध्ये उपस्थित होते. अमितला हळद लागल्यानंतर राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे उष्टी हळद घेऊन आपली होणारी सून मितालीच्या घरी गेल्या. मिताली बोरुडे या हाजी अली येथील लाला लजपतराय कंपाऊंड इमारत क्र. 3 मध्ये राहतात.

या लग्नाच्या निमित्ताने ठाकरे कुटुंबीय एकत्र आलेले दिसतील. कारण, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या शिवसेना-मनसेचं राजकीय नातं वेगळं सांगण्याची गरज नाही. पण उद्धव ठाकरे आणि त्यांचे बंधू जयदेव ठाकरे हे सहकुटुंब सकाळपासूनच हजर असतील.

रविवारी दुपारी लग्नाला अगदी कमी पाहुण्यांना बोलवून विवाह सोहळा पार पडणार आहे. यात राजकीय मंडळी, उद्योगपती, पक्षाचे काही पदाधिकारी उपस्थित असतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार, अशोक चव्हाण, सुधीर मुनगंटीवार, नितीन गडकरी, आशिष शेलार, प्रसाद लाड यांची उपस्थिती असेल. शिवाय अंबानी परिवार आणि रतन टाटा हे देखील उपस्थित असतील.

संध्याकाळी रिसेप्शनला मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकार, बॉलिवुड कलाकार, शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, जावेद अख्तर, सोहेल खान, लता मंगेशकर, आशा भोसले, महेश मांजरेकर यांच्यासह इतर पाहुणे उपस्थित असतील. जवळपास 400 पेक्षा जास्त व्हीव्हीआयपी गेस्ट या लग्नाला येण्याची शक्यता आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.